ती आणि तिचं कुटुंब भाग - 50 अंतिम
डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घ कथा लेखन स्पर्धा
विषय - कौटुंबिक
वास्तववादी कथा मालिका आहे. विनंती वाचून नक्की कमेंट करा.
दहा वर्षानंतर..
स्वानंदी मोठया कंपनीत मोठी एच. आर. ची अधिकारी असते.
राहुलची मोठी सॉफ्टवेअर कंपनी असते. राहुल त्या कंपनीचा मालक असतो.
स्वानंदी आणि राहुलला स्वतःचा एक मुलगा होतो. त्याचे नाव सुयश ठेवले. एक मुलगी दत्तक घेतात.तिचं नाव सुकन्या ठेवतात.
लीला स्वतःचे अन्नपूर्णा हॉटेल टाकते. त्याच्या परदेशात सुद्धा शाखा काढते. खास लीला स्पेशल पदार्थ पुरणपोळी, उकडपेंडी, गुळपापडी, दडपे पोहे, दही पोहे, भजीचे अनेक उत्तम प्रकार, चिवडा, बेसनाचे लाडू, केशरी गोड भात उत्तम तिथेच मिळतात. खूप यशस्वी उद्योजिका म्हणून पुरस्कार प्राप्त झाले. हॉटेल काढा म्हणून मागे स्वानंदी लागते. घरातली सगळी जण पाठीशी उभी आहे असे लीला आवर्जून सांगते.
दत्ता ची बँकेची नोकरी चालू असते. काही वर्षांनी रिटायर होणार आहे.
उत्कर्ष, स्वरा, गार्गी मोठे होतात. उत्कर्ष मोठा क्रिकेटीअर होतो. शिकत ही असतो. स्वरा गायिका होण्यासाठी शास्त्रीय गाणे शिकते रियालिटी शो जिंकते. शिक्षण चालू असते. गार्गी कॉलेज मध्ये असते तिला वैज्ञानिक व्ह|यचे आहे. रेवा शाळेत असते.
नीता, गणेश ला तिसरा मुलगा होतो. दोन मुली मोठया होतात.मुलगा लहान असतो.
मुलगी सूनिता, जावई सागर, ईरा ची फॅमिली असते. सूनिता आता डेंटिस्ट म्हणून स्वतःचे क्लिनिक उभे करते. ईरा थोडी मोठी होते. जावई डॉक्टर म्हणून कामं करत असतो.
सगळे एकत्र कुटुंबात त्याच घरात राहतात अजूनही. घर तसेच आहे. स्वानंदी, लीला, निताने नवीन काही झाडे लावली आहे. त्या झाडांना काही फळे लागली, काही फुलांची झाडे आहेत.
नीताच्या शिक्षक भावाचे लग्न अजून जमले नाही. आई, वडील स्थळ शोधत असतात. मुली हो म्हणत नाही. सारखे क्षमस्व, योग नाही.
दत्ताचे, गणेशचे, राहुलचे, सुनीताचे आई (मालती), बाबा परवाच चार धाम यात्रा करून परतले. आई, बाबा आहे तसेच आहे ठणठणीत. आज घरी माऊंद कार्यक्रम आहे. सगळे एकत्र आहे. नातेवाईक आले खूप जण, मोठा सोहळा आहे रांगोळ्या आहे. फुलांची सजावट आहे. छान आत्ताराचा सुगंध आहे. फोटो काढणे चालू आहे. विधी कार्यक्रमाचे चालू आहे. जेवणाच्या पंगती चालू आहे. स्वयंपाक कार्यक्रमाचा उत्तम झाल्याची पावती सगळे देतं आहे. आज सगळ्यांचे मोबाईल बंद दिवस आहे.. सगळ्या जणी आज नऊवारी रेडिमेड घालून, नटून थटून खूप छान दिसत आहे. पुरुष कुर्ती, धोतर रेडिमेड घालून जोडया सगळ्याच छान दिसत आहेत. सगळ्या एकत्र कुटुंबाचा एक ग्रुप फोटो काढला. स्माईल प्लीज न म्हणता सगळे खळखळून हसत आहे. अशी कथा सुफळ संपूर्ण. गोड मानून घ्या.
समाप्त.
सौ. भाग्यश्री चाटी - सांबरे
©®
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा