ती अजूनही दिसते (भाग 3)
( माघील भागात आपण पाहिले मुक्ता ला मेहदी दिसल्यावर तरी काहितरी वाटेल म्हणून चिऊ ला मेहदी लावून बसवण्यात आले पण त्याचा काही उपयोग झाला नाही,
आता पुढे....
असे करत करत चार दिवस निघून गेले ताई रोज पोथी ला बसायची, आई मुद्दाम तिच्याकडून सगळी कामे करून घ्यायची, पण ताई ला काहीच होत नव्हते,
घरातील कुणालाच काही कळेना,
पण आजी ची मोठी बहीण होती त्या देखील आमच्या गावातच राहत असे,
आजी ने त्यांना निरोप पाठवला व बोलावून घेतले,
आजी च्या तोंडातून सगळी हकीकत ऐकून मोठ्या आजी म्हणाल्या,
मला पूर्ण दिवस पोरगी फक्त माझ्या डोळ्यासमोर पाहिजे व झालेही तसेच पूर्ण दिवस ताई आजी च्या डोळ्यासमोर च होती
पण आज ताई थोडी अस्वस्थ जाणवत होती,
ताई सारखी सारखी कुठल्या ना कुठल्या कारणाने बाहेर जाण्याचा प्रयत्न करत होती पण तिचा प्रत्येक प्रयत्न आजी हाणून पाडत होती,
शेवटी संध्याकाळ झाली आता थोड्या वेळात पोथी चालू होणार होती पण आज ताई आई चे काहीच ऐकत नव्हती
ती छोट्या छोट्या गोष्टीवरून चिडत होती
आज तिचे मन ठिकान्यावर नव्हते,
ती सारखी काहितरी शोधत होती,
तितक्यात मोठ्या आजी ने तिच्या केसात एक सेप्टि पिन अडकवली
का केले
माहीत नव्हते
पण ताई च्या नकळत आजी ने हे केले होते,
आई ताई ला पोथी जवळ रांगोळी काढ म्हणाली,
रोज मीच काढते,
कधीतरी दुसरे कुणी काढत
मी माहेरी काय काम करायला नाही आले
जिकडे बघावं तिकडे फक्त काम काम आणि काम,
मी नाही काढणार जा,
मी झोपायला जातेय,
व मला उठवू नको
ताई चे डोळे
तो राग
तो उंच चढलेला आवाज
मी आज पहिल्यांदा बघितला होता,
कधीच कुणाला मोठ्या आवाजात न बोलणारी ताई आज उलटून बोलत होते,
आजी ने समजून घेतले काय ते
व आजी तिला प्रेमाने घरात बस म्हणून समजावू लागली
पण ती कुणाचेच
ऐकत नव्हती ती फक्त बाहेर जाण्याचा प्रयत्न करत होती,
शेवटी मोठ्या आजी ने काका च्या मदतीने ताई ला जिथे पोथी चालू होणार होती तिथे बसवले,
ताई शरीराने तर बसली होती पण मनाने कुठेतरी च होती,
ती सारखी काहितरी शोधत होती
पोथी चालू झाली,
आता ताई ची अस्वस्थता वाढली होती,
देवा नि वाचायला चालू केले
त्यांनी एक पान वाचले
व दुसरे पान चालू करण्यापूर्वी ते जोरात
ओम नवनाथाय नमः
असे म्हणाले
व त्यांचे शब्द कानावर पडताच
ताई जोरात किंचाळली
तिने पळत जाऊन पोथी जवळील कलश खाली पाडला,
बंद करा हे सगळं
बंद करा म्हणते ना
का त्रास देताय मला
मी काय वाईट केलं तुमचं
झाड माझं आहे माझं
फक्त माझं मी ते घेऊन जाणार
तुम्ही मध्ये येऊ नका,
बाजूला ह्या सगळे,
असे म्हणत ताई ओरडू लागली कुणाचेच काही ऐकत नव्हती,
फक्त बाहेर पळत होती,
काका, बाबा, दादा, आई सगळे तिला पकडत होते पण ती त्यांना सर्वाना भारी भरत होती,
तेवढ्यात कुणीतरी तिला पोथी समोरील भस्म लावला व ती अचानक शांत झाली,
ताई शांत झाल्यावर
तिला सगळ्यांच्या मध्ये बसवण्यात आले
सर्वांचे लक्ष फक्त ताईवर
मोठी आजी तिला विचारू लागली
कोण आहेस साग
व इथे का आलीस
काय पाहिजे,
ताई शांतच होती
काहीच बोलेना फक्त बघत होती
तेवढ्यात मोठी आजी जवळ काठी घेऊन बसली व ती पुन्हा पुन्हा काठी वाजवायची व ताई ला प्रश्न विचारायची
ताई थरथर कापू लागली
आजी ने काठी वाजवली की त्या काठी च्या आवाजाने ताई दचकायची
घाबरायची
ओरडायची
हे असेच चालू होते दहा मिनिटं
काय असेल मुक्ता ला झालेले जाणून घेण्यासाठी सोबत राहा
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा