Login

ती अजूनही दिसते( अंतिम भाग 5)

Horror

ती अजूनही दिसते अंतिम (भाग 5) 

( माघील भागात आपण पाहिले मुक्ता च्या हातात पेटता कापूर दिला व ती शांत झाली ) 

आता पुढे ........................


पोथी संपली व सगळे आपापल्या घरी गेले, 
मी अजूनही ताई चा विचार करत होते विचारू का तिला 
ताई तुला खरच कळत नाही का ग तू काय बोलतेस 

तुला काहीच जाणवत नाही का ??? 
पण नको वाटलं व मी झोपी गेले 

दुसऱ्या दिवशी ताई नेहमी प्रमाणे उठली व वागू लागली 
पण मी आता ताई जवळ जायला देखील घाबरत होते 
ती मुलगी म्हणत होती की मी त्या पोथीजवळ येऊ शकत नव्हते म्हणून मी सारखी इकडे तिकडे बघायचे मला वाटायचं की असेल इथे कुठे बसलेली व मला लागली मग 

कधी कधी माझे मला हसू देखील यायचे, 

आज पुन्हा ताई ला पोथी त बसवण्यात आले 

पुन्हा ती बोलू लागली, 

बोला काय विचारायचे ते 

तू च सांग तुझ्यासोबत काय झालं 
आजी 

ती पुन्हा रडू लागली 
मी एका मुलावर प्रेम करत होते 
पण माझ्या घरी ते मान्य नव्हत मुलगा दुसऱ्या जातीचा होता म्हणून 
शेवटी आम्ही पळून जाण्याचा ठरवले पण बेत फसला 
तो आलाच नाही व मी वाट बघत बसले त्याची पण जेव्हा हे दादा ला समजले तेव्हा 
मला माझ्या बाबा व भावाने घरात फाशी दिली व मी घेतली असे बाहेर सांगितले 
खुप वेदना झाल्या मला मारायचे नव्हते 
मान्य आहे मी चुकले होते पण मला सुधारण्याची संधी मिळाली नाही, 

मग तू त्या मुलाकडे का नाही जात आजी 

कशी जाणार ना 
तो लोखंडावर बसतो  नेहमी 
व जवळ पण लोखंड बाळगतो 
ती 


मग तुझ्या भावाला व बाबा ला धडा शिकव ना आजी 

केला होता प्रयत्न पण तो माझ्यावर च उलटला 
त्यांनी बंदोबस्त केला आहे त्याचा मला त्यांच्या आसपास ही जाता नाही येत, ती 


मग वाहिनि जवळ का आली 
तुला खुप सोपी मिळाली का ती आजी 

नाही 
वहिनी खुप चांगल्या आहेत

मला त्यांच्या सासू कडे जायचे होते 
पण मी आवाज दिला त्या बाहेर देखील आल्या पण त्याच्या गळ्यात तुळशी ची माळ होती
मग मला जाता नाही आले 
तेवढ्यात वहिनी बाहेर आल्या व मग मी त्यांच्यात सामावून गेले, 
ती 


मग आता वहिनी ला सोडणार की नाही आजी 

सोडेल ना 
मलाच सोडायचे आहे पण ते माझ्या हातात नाही 
मी सांगेल तसे करा 
मग माझे पण मार्ग मोकळे होतील 
ती 

हो चालेल सांग 
आजी 

येणाऱ्या अमावस्या ला 
तिला डोक्यावरून अंघोळ घाला 
अंघोळीच्या पाण्यात लिंबाचे पान हळदीत बुडवून टाका। 


रात्री बारा वाजता 
माझ्या तोंडात एक चप्पल द्या व हातात हिरव्या रंगाची साडी त्या साडीवर सगळे ओटी चे सामान ठेवा व तुळशीची पाने बुडवून मी चालेल त्या मार्गाने दह्यात लिंबू पिळून ते टाकत चला 


कुणीही माघे बघू नका 
मी चालेल त्या मार्गाने चला मला अडवू नका
मी गावापासून बाहेर काही अंतर गेल्यावर ज्या ठिकाणी ही मुलगी कोसळून पडेल त्या ठिकाणी तिच्या हातात दिलेली हिरव्या रंगाची ती साडी जाळून टाका 
व ते ओटीचे सामान पण त्यात टाका, 
येताना ही कुणी माघे बघू नका 
उद्या नंतर या मुलीची थोडी तब्बेत बिघडेल पण घाबरू नका तिला काही होणार नाही, 
माझा तिच्यातील अंश निघून जाईल म्हणून तिला परिस्थिती शी जुळून घेताना थोडा त्रास होईलच बाकी काही नाही 
ती 


पण तू पुन्हा वहिनी कडे येऊ नको 
किंवा इथेच कुणाला लागू नको 
आजी 

नाही येणार 
मी एकदा का या गावाच्या वेशी बाहेर गेले मग मला माझ्या मर्यादा असतात मी असा कुठेही प्रवेश करू शकत नाही 
ती 

मग तू कुठे जाणार 
आजी 


तो माझा प्रश्न आहे 
तुमचा नाही 
जे सांगितले ते करा 
व उद्यापासून

तिला पोथीमध्ये बसवू नका 
थेट अमावस्या च्या दिवशी बसवा 
व तिला झोपू देऊ नका 12 वाजेपर्यंत पोथी वाचन चालू च ठेवा आणि 12 वाजले की तिला बाहेर काढा, 
ती 

असे बोलून ताई पुन्हा शांत झाली 

अमावस्या तीन दिवसावर आली होती 
आई ने हिरवी साडी आणून ठेवली 
ठरल्या प्रमाणे अमावस्या च्या दिवशी ताई ला पोथीमध्ये बसवण्यात आले 
रात्री चे 12 वाजले व ताई तिच्या मनाने उठून उभा राहिली, 
काका , दादा, व आणखी गावातील काही लोक घेऊन ती बाहेर पडली तिने सांगितले त्या प्रमाणे च सगळे केले 
गावापासून काही अंतरावर ताई कोसळली 
तेथील सर्व आटोपून सगळे घरी आले, 
ताई ला तसेच झोपवण्यात आले, 
नंतर ताई हळू हळू बरी झाली 
आता माझी ताई पूर्णपणे ठीक आहे, 
डोळ्यातील पाण्याने मी भानावर आले, 
पण खरंच डोळ्यांनी बघितलेल्या गोष्टी वर विश्वास ठेवावा की विज्ञानावर हाच मोठा प्रश्न आहे, 
शेवटी
मुक्ता ला मुक्ती मिळाली हे च  खरे

@कथेचे सर्व अधिकार लेखिका गीता सूर्यभान उघडे यांच्याकडे राखीव असून तुम्ही ती नावसाहित शेअर करू शकता पण साहित्य चोरी नको कारण  
कारण लेखन हा लेखिकेच्या आत्मा असते , 
कथेचा मूळ हेतू फक्त मनोरंजन असून कुणाच्या भावना दुखावणे नाही.
धन्यवाद 
आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा त्या लेखनास प्रोत्साहन देतात

🎭 Series Post

View all