भाग ४
"काळजी घ्या काकू? सिद्धार्थ होईल बरा" तिने आधार देण्याचा प्रयत्न केला.
"नाही ग मधू बाळा... उद्या अमेरिकेवरून त्याची बहिण मिरा आली की डॉक्टर व्हेंटिलेटर काढणार." डोळ्यात आलेल्या अश्रूंना वाट मोकळी करून देत त्या बोलल्या.
मम्मा.. मम्मा, आतापर्यंत शांत बसलेल्या सिध्दीने गोड आवाजात मम्माला हाक मारली.
सिद्धी धावत आईजवळ आली, तिने आईच्या पायांना घट्ट पकडुन घेतलं.
"बाळा नाव काय ग तुझं?" सिद्धार्थच्या आईने विचारलं.
"सिध्दी!! छोटूल्या सिद्धिने तिचं नाव सांगितलं.
"छान आहे हा नाव.... सिध्दी!" आणि त्यांच्या चेहऱ्यावर हसू दरवळलं.
"आमच्या.... मीराला सुद्धा एक मुलगीच आहे. तिचा जन्म झाला तेव्हा, तिने तिच्या मुलीचं नावं मिहिरा ठेवलं. एकदा सिद्धार्थ म्हणाला. मीराच बाळ मिहिरा तर सिद्धार्थच बाळ सिध्दी...... सिध्दी!" बोलताना, सिद्धार्थच्या आईंने हुंदका गिळला.
सिद्धार्थच्या आईने... सिद्धीला जवळ बसवलं... कितीतरी वेळ त्या तिच्या केसांवरून हात फिरवत होत्या.
'सिद्धार्थला दररोज घडलेल्या गोष्टी लिहायची सवय होती. आम्हीच लावली होती ती. अक्षर चांगल नव्हतंच, काय लिहितो, समजायचं नाहीच. सुरवातीला नाटक करायचा लिहायला. पण नंतर नंतर लिखाणात रमायला लागला. लिखाण सुधारेल, शुद्धलेखनात चुका कमी होतील वगैरे हेतू फारसा साध्य झाला नाही. पण तो लिहितोय, हेच आमच्याच्यासाठी महत्वाचं होतं.
"पुढे बरच काही शिकवण्याचा प्रयत्न केला. गार्डनिंग मध्ये तासनतास रमायचा, म्हणून शहराबाहेर त्याच्या नावे शेती घेऊन फुलांची शेती केली."
"मधुराणी फॉर्मस गार्डनिंग अँड नर्सरी"
"आपल्या नंतर, त्याच कसं? आम्हाला प्रश्न पडायचा खूप. पण म्हणतात ना, प्रत्येक जण आपलं नशिब घेऊन जन्माला येतो तेव्हा आम्ही सिद्धार्थ सारख्या स्पेशल मुलांसाठी त्यांचं पालनपोषण व्यवस्थित होऊ शकेन अशी शाळा आणि वसतिगृह काढलं. तो तिथे ही खूप रमायचा. आमच्या मागे त्याचं संगोपन व्यवस्थित होईल आम्ही सगळी तरतूद करून ठेवली होती."
पण... देवाच्या मनात काही वेगळं प्रयोजन होतं!!
मनात खूप प्रश्न घेऊन.... अनुत्तरीत उत्तरांसह मधूरा घरी परतली होती.
दुसऱ्या दिवशी, मीरा भारतात पोहचली होती.
वसुधाताईसोबत मधुरा पण हॉस्पिटलमध्ये जाणार, ठरलं होतं.
ठरल्याप्रमाणे, मधू वसुधा ताईसोबत हॉस्पिटलमध्ये पोहचली.
ठरल्याप्रमाणे, मधू वसुधा ताईसोबत हॉस्पिटलमध्ये पोहचली.
"मधू," आपल्या सिद्धार्थच्या मनावर राज्य करणारी मधू. सिद्धार्थच्या आईने, मधूचा हात हाती घेतला. हळूवार शब्दात, त्यांनी मधूची ओळख मीराला करून दिली. मिराच्या डोळ्यात ही आसवांनी दाटी केली होती.
शेवटचं एकदा बघून झाल्यानंतर. डॉक्टरांनी कृत्रिम श्वास देणारी यंत्रणा बंद केली आणि सिद्धार्थने अखेरचा श्वास घेतला.
बाकी सगळे सोपस्कार, पार पाडण्यासाठी खूप मोठी डॉक्टरांची टीम हॉस्पिटलमध्ये दाखल झाली होती.
हॉस्पिटलमध्ये, आज जरा जास्तीच धावपळ सुरू होती.
सिद्धार्थ जाता जाता अनेकांचे प्राण वाचवून गेला होता. अवयवांचे दान करून त्याने अनेकांना जीवनदान दिलं होतं.
अवयव दान करून त्याच्या जन्माच सार्थक झालं होतं. त्याचे सगळे अवयव वेळेत कुणाच्या तरी कामी यावे म्हणून शहरात आज ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यांत आला होता...
मीराने तिच्या पर्स मधून एक फाईल काढली. त्यातले काही पेपर्स सिद्धार्थच्या आईने, मधुराच्या हाती सोपवले.
"हे काय काकू?" आश्चर्यचकित होऊन मधुराने हातातल्या पेपर्स वर नजर फिरवली. ही फाईल कसली? मधुराने पुन्हा विचारलं.
"बाळा.. तुझा हक्क आणि सिद्धार्थची इच्छा."
"माझ्या सिद्धार्थला ना मित्र होते ना मैत्रिणी.. तूच त्याची बाल मैत्रिण.. कधीकाळी बोलायचा तो माझ्याशी तुझ्याबद्दल पण... ही वेडी आई त्यामागच्या भावना समजू शकली नाही कधीच."
"माझ्या सिद्धार्थच्या मनात, क्षणभर का होईना कधीतरी प्रेमाची ज्योत प्रज्वलित झाली होती. बालपणापासून मनात जपलेली तीच प्रेमाची ज्योत आहेस तू."
"त्याच्या लिखाणात, त्याच्या मनात घर करून होतीस तू. जे काही तो कधी बोलू शकला नव्हता तेच सगळं त्याने शब्दात उतरवलं होतं.
"आजवर लहान समजत आले होते त्याला. तो तर मोठा झाला होता, मागच्या दहा दिवसात कळलं. पण उपयोग काय? सिद्धार्थच्या आईने डोळे पुसले. पण आता मरणोपरांत उशीर नाही होऊ द्यायची ही आई...!"
"असो!!"म्हणत आवंठा गिळला त्यांनी.
" मधू मधू!! आणि फक्त मधू...."
त्याच्या आयुष्यात, आभास म्हणून का होईना पण तू होतीस म्हणून तो होता.
आज तो नाही पण....
जाता जाता माझा सिद्धार्थ अवयव दान करून गेला. त्याच्या भवितव्यासाठी म्हणून आम्ही केलेली तरतूद, आज मी त्याच्या पहिल्या प्रेमाच्या नावे करतोय. आता जे त्याच होतं ते सगळं तुझं आहे. सिद्धार्थच्या आईने डोळे पुसले.
"काकू हे कसं शक्य आहे?"
"सॉरी...!" म्हणत मधुरा निघणार तोच मिरा ने अडवलंच.
" सॉरी, मी हे घेऊ शकत नाही."
ह्यावर माझा अधिकार नाही?"
ऐकून घ्या, प्लीज! मधुरा शांतपणे बोलली.
ह्यावर माझा अधिकार नाही?"
ऐकून घ्या, प्लीज! मधुरा शांतपणे बोलली.
हातातली फाईल सिद्धार्थच्या आईच्या हातात सोपवत असताना, त्यातून एक कागद उडत मधूराच्या पायापाशी आला.
त्यावर लिहिलेलं होतं
मधू.... तू माझी
मी तुझा....
मी कृष्ण
तू माझी राधा.......
मी तुझा....
मी कृष्ण
तू माझी राधा.......
त्याच्या अक्षरात लिहिलेली ही फक्त चारोळी नव्हती तर... सिद्धार्थच्या पहिल्या वहिल्या पवित्र प्रेमाची साक्ष होती..
आणि.... मधुरा मात्र, एका अनोख्या अनपेक्षित वळणावर उभी होती एकटीच!!
आणि.... मधुरा मात्र, एका अनोख्या अनपेक्षित वळणावर उभी होती एकटीच!!
समाप्त..
-©®शुभांगी मस्के...
-©®शुभांगी मस्के...