भाग ३..
हृदय, यकृत, मूत्रपिंड, बाकी सगळे अवयव व्यवस्थित कार्य करतात आहेत त्याचे. त्या अवयवांना, कृत्रिम श्वासोच्छ्वास देवून जीवंत ठेवण्याचा प्रयत्न केलाय डॉक्टरांनी. कृत्रिम ऑक्सिजन आहे तोवर तो आहे.. ते काढलं की!! संपलं सगळं!" त्यांनी लांब उसासा घेतला.
डॉक्टर म्हणतात, आता त्याचा मेंदू यापुढे काहीच कार्य करणार नाही. तशी शक्यता नाही. आठ दिवस झाले कृत्रिम श्वास घेतोय तो...
"लहान होता, तेव्हा खूप गोंडस होता. दुध पिताना एक दिवस ठसका लागला. अर्धमेला झाला होता. आठ दिवस नव्हताच तो. कोमात गेला होता. पुढे सगळं उशिरा उशिरा. उठण,चालणं बसणं, रांगण, चालणं, बोलणं.. सगळचं उशिरा!!"
"त्याच्या तोंडुन आई हा एक शब्द ऐकायला. किती प्रयत्न करावे लागले असतील. सात आठ वर्षाचा झाला तेव्हा त्याने मला आई म्हटल. हळू हळू तोतरं बोलायचा नंतर अडखळत बोलायला लागला. आमच्यासाठी तो असणं जास्ती महत्वाचं होतं."
"त्याच मेंदूने आज काम करायचं बंद केलं. साथ सोडली त्यांची. नेहमीसाठी!"
वयापेक्षा, सात आठ वर्षांने मोठा दिसायचा सिद्धार्थ.
पण मेंदू मात्र सहा सात वर्षांने मागे राहिला नेहमी.
आम्ही आमच्या हट्टासाठी त्याला शाळेत घातलं. स्पेशल मुलांसाठी पण होत्या शाळा पण आपला मुलगा आपल्यातलाच एक आहे हे मनाने हेरल होतं.
चाल ढक्कल करत कसा बसा आठवी पास झाला. नववी आणि दहावी, बोर्डाची परीक्षा टिकाव लागणार नव्हता.
"सिद्धार्थच्या या वह्या,
पर्समधली एक वही काढून, त्यांनी मधुराच्या हाती दिली.
"मधुरा... म्हणू की मधू..
मधुराणी तुला मी कुठे शोधू!!
पहिल्या दोन ओळी वाचूनच, मधुराला आश्चर्याचा धक्का बसला होता..."
पहिल्या दोन ओळी वाचूनच, मधुराला आश्चर्याचा धक्का बसला होता..."
"या ओळी.. ?" कसं शक्य आहे.
सिध्दार्थ च्या आईने हळूच, होकारार्थी मान डोलावली.
माय बेस्ट फ्रेंड.... मधू
"मधू तू कुठे गेली ग?"
"तू माझी किती छान मैत्रीण होतीस."
"सगळे मला चिडवायचे पण तू, चिडवल नाही कधीच. उलट कुणी काही बोलायचं तर, त्यांना रागवायचीस.
कॅप्टन होती ना तू....
वर्गात मॅडम नसल्या की, सगळे गडबड करायचे..
तू सगळ्यांचे नाव फळ्यावर लिहायची..
माझं नाही लिहिलं कधीच..
"मधू, मला तुझी खूप आठवण येते
नेहमी च येते.
अगदी दररोज येते
तुला नाही का ग माझी आठवण येत.
हुशार होतीस तू.
दर वर्षी पास व्हायची
मला सगळे नापास घोडा म्हणायचे.
तुझ्यासारख हुशार व्हायचं होतं मला ही. का ग नसेल मी हुशार तुझ्यासारखा ?
"मी असा गब्बु.. म्हणून नाही का गं तू भेटायला आलीच कधीच"
"एकदा, माझा पाय लागला होता तुला. पण तू रागावली नाहीस. तूझ्या ट्टपोऱ्या कंच्या सारख्या डोळ्यातून रागाने बघितलं माझ्याकडे. ते डोळे आठवतात अजूनही मला.
वसु ताई, शिकवायची .. तुला लवकर कळायचं..
तू पटापटा उत्तर द्यायची.
मी तुझ्याकडे बघत राहायचो.
"मधू... एकदा मी सिनेमा बघत होतो..
एक मुलगा आणि एक मुलगी.. , एकमेकांचा हात हातात घेऊन झाडाखाली बसले होते."
सिनेमातल्या मुलीने मुलाच्या खांद्यावर डोकं ठेवलं.
तसा आधार मला तुला द्यायचा होता.
त्या दिवसापासून, तू माझ्या खांद्यावर डोकं ठेऊन डोळे मिटून बसली आहेस, ते स्वप्न मला रोज पडायचं.
दाट घनदाट झाड दिसलं की मला तू आठवयचीस.
तुझा हात हातात घेऊन मी तुझ्या मऊ, नाजूक हाताशी खेळतोय असं वाटायचं. आतल्या आत गुदगुल्या व्हायच्या. खूप काही काही व्हायचं.
पाऊस पडायचा तेव्हा. मी तूझ्या आठवणीत चिंब भिजायचो.
मला गाडी चालवता आली असती तर, मी तुला खूप दूर लाँग ड्राईव्हला घेऊन गेलो असतो. एका छत्रीत आपण भुरभुर पावसात भिजलो असतो. गरमागरम मक्याचं कणीस दोघांत वाटून खाललं असतं.
उष्ट खाललं की प्रेम वाढतं म्हणतात. आपलं ही प्रेम वाढलं असतं मग!
मधू... मी मोठा होत होतो ना, तेव्हा तू मला माझ्यासोबत प्रत्येक क्षणाला हवी हवीशी वाटत होती. हातात हात घेऊन माझ्या सोबत चालायला. बोलायला. हव्या नको त्या वेळी तू हवी होतीस.
"आई आमच्या मिराला म्हणायची".. प्रत्येक मुलीच्या आयुष्यात एक राजकुमार असतो. जो घोड्यावरून तिला घ्यायला येतो. आणि तिला घेऊन जातो.
मधू, माझ्या स्वप्नातली राजकुमारी बनून रोज यायचीस तू मला भेटायला.. एका एका पानावर लिहिलेला एक एक शब्द, त्याच्या मनाच्या गाभाऱ्यात त्याने हळूवार जपलेल्या प्रेमाचं अत्तर होता जणू.
मनाच्या गाभाऱ्यात प्रज्वलित झालेलं हे पाहिल प्रेम निर्मळ होतं स्वच्छ वाहणाऱ्या झऱ्यासारखं... एक एक शब्द वाचताना, मधुराच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. तिला हुंदका आवरेनासा झाला.
"आई म्हणते, हॉटेल मध्ये गेल्यावर, आवडते तेच ऑर्डर करावं.. मला आवडत ते मला तर कधी मिळालं च नाही."
"आई हे ही म्हणते, की देव बाप्पाकडे मनापासून काही मागितलं तर तो ते देतोच. मी देवाकडे, तुझ्याशिवाय काहीच मागत नाही. मग देव माझं कधीच ऐकून घेत नाही.
हुशार लोक नोकरी करतात, फॉरेन मध्ये जातात. बिझी असतात खूप. त्यांना भेटायला वेळच नसतो. त्याने शब्दातून हुरहूर व्यक्त केली होती.
शब्दाशब्दातून रीत केलेलं मन मधुरा वाचत होती. डोळ्यात फक्त अश्रुंच्या धारा वाहत होत्या. ती निःशब्द झाली होती.
आज मधू आली होती. सिद्धार्थला भेटायला.. त्याची शेवटची इच्छा पूर्ण करायला.
"मधू तू आलीस!" त्याची शेवटची इच्छा मी पूर्ण करू शकले." समाधान मिळालं खूप. सिद्धार्थच्या आईने मधूचे दोन्ही हात हातात घेतले.
"छान वाटल ग बाळा".... Thank you म्हणत, तिच्या दोन्ही हातांच्या पाप्या घेतल्या. तिला मिठीत घेतलं.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा