यावेळी केतकीच्या लग्नाच्या निमित्ताने मला ते सुख अनुभवण्याची संधी मिळाली होती. मला ती संधी सोडायची नव्हती. माझ्या कडे फार काही सेविंग नव्हते. म्हणजे नणंद बाईच्या लग्नात खर्च करण्यासाठी पैसे कमी पडत होते तेव्हा मी माझे बऱ्या पैकी सेविंग्ज पूढे केले होते. सासरी दिले होते. त्यामुळे फार पैसे जवळ नव्ह्ते.
पण पैसे , नंतर पण , कमावता येतील.मी माझ्या कडे असलेले पैसे खर्च करून तिला तिच्या आवडीची साडी घेऊन दिली. लग्नात नेसायला तर आईने मला साडी घेऊन दिलीच होती. त्यामुळे काळजी नव्हती.
साहिल ने मला एकदाही एका शब्दाने देखील विचारलं नव्हत, मला लग्नात साडी घ्यायला पैसे हवे आहेत का ? आहेर करायला माझ्या कडे पैसे आहेत का ? याचं मला नवल वाटले होते.
मला वाटतं आजच्या वर्किंग वुमन ना वाटतं त्यांच्या कडे पैसे असतात. पण खरी परिस्थिती तशी असते का ? ती जॉब करते तर तिच्या कडे पैसे असतातच. तिला कशाला पैशांची गरज असेल ? अशीच काहीशी विचारसरणी माझ्या सासरच्या मंडळींची होती. म्हणूनच कदाचित त्यांनी मला पैसे हवे आहेत का ? आम्ही येताना आहेर देण्यासाठी सामान घेऊन येवू का ?
तर त्यावेळी तर मी माझे कानातले सोनारा कडे जावून मोडले. त्यात पाच हजार रुपयांची भर घालून छान छोटे सोन्याचे कानातले खरेदी केले. लग्नात दागिने घालायला माझ्या कडे काही मॅचिंग इमीटेशन ज्वेलरी होती. मंगळ सूत्र आणि हार तर साहिल ने येताना आणला होता. त्यामुळे काही चिंता नव्हती.
लग्नाच्या विधीच्या वेळीं जेव्हा कन्यादान विधी चालु होता. तेंव्हा गुरुजींनी घरचा आहेर आणायला सांगितला. मी आतून रुम मधून आहेराच सामान आणलं. ते बघून साहिल आणि सासू बाईंनी माझ्या कडे बघितलं. त्यांचे चेहरे लाल बुंद झाले होते. ते दोघं चिडले होते. लग्न विधी चालु होते. सगळी नाते वाईक मंडळी जमली होती. त्यामूळे तेव्हा ते गप्प बसले होते.
त्यामूळे तेव्हा काही नाही झालं. केतकीच लग्न छान झालं. कालच ती दोघं मुंबईला निघून गेले. दोघांचे पासपोर्ट रेडी होतें. हनिमून साठी परदेशात जायच होत. त्यामुळे त्यांनी आधीच तयारी केली होती. त्यामूळे तत्काळ मधे सगळं काही करावं लागलं. केतकी आणि वृषभ महिना भर मुंबई मध्ये राहणार होते. नंतर ते पाच वर्षांच्या साठी परदेशात जाणार होते.
केतकीची पाठवणी करून मी काल सासरी आली होती. आणि सकाळी सासू बाईंनी विषय छेडलाच,
" किर्ती तुला काही अक्कल आहे का नाही ? तु कोणाला विचारून सोन्याचं कानातलं आहेर म्हणून दिलं ? " सासू बाईनी विचारलं.
" किर्ती तुला नकार दिला होता ना ? इतका मोठा आहेर द्यायला ? पैसे काय झाडाला लागलेत का ? " साहिल म्हणाला.
" थोडे पैसे कमी खर्च केले असते तर माहेरी तुझी इज्जत काही कमी नसती झाली ? "
" पैशाचं झाड नाही लावलं जे तू असा आहेर केलास ? मी तुला सांगितलं होत ना, काय आहेर द्यायचा तो ? मग स्वतः च डोकं कशाला लावलं ? आम्हाला धोका देताना लाज कशी नाही वाटली ? " सासू बाई म्हणाल्या. सासु बाईंनी केलेला आरोप ऐकुन माझं डोक सुन्न झालं होत.
" मी कधी धोका दिला ? " किर्ती ने विचारलं.
" मग सोन्याचं कानातलं घ्यायला पैसे कुठून आणले ? साहिल ने दिलेले पैसेच खर्च केलेस ना ? " सासु बाईंनी विचारलं.
" अहो आई, साहिल ने मला काहिही पैसै दिले नाहीत. मी माझे सोन्याचे कानातले मोडले आणि नवीन कानातले केतकी साठी खरेदी केले." किर्ती म्हणाली.
" याला धोका देणं म्हणत नाही तर काय म्हणतात ? तुला मी सांगितलं होत ना असं काही करायची गरज नाही म्हणून ? मग तू असं का वागलीस ? काय गरज होती घर लुटण्याची ? " सासू बाई मनाला येईल ते बडबड करत होत्या.
" काय माहिती या घरातुन काय काय लुटून नेलं आहे. नी माहेरच घर भरलं आहे ते ! आमचं घर लुटण्यासाठी नाही आहे ! कोणालाही काही द्यायच्या आधी विचारावं इतकी पण अक्कल नाही. मोठ्यांनी सांगितलेलं ऐकावं हे संस्काच नाहीत ना ! " सासू बाई नी विशेष टीपणी केली.
" आई तुम्ही तर मला काहीच पैसे दिले नाहीत. मग कशाला असे आरोप करता आहात ? " किर्ती ने विचारलं.
" पण पैसै खर्च करायला तर मनाई केली होती ना ? कशाला असं पैसे असल्याचं ढोंग करायचं ? काय गरज होती श्रीमंत असण्याचा टेंभा मिरवण्याची ? "
" आणि काय ग, हे तुझे पैसे माझे पैसे असं का म्हणते ? आता काय तुझं माझं करायला पण लागलीस की काय ! मला तूझ्या कडून असल्या धोक्याची अपेक्षा नव्हती." यावेळी साहिल म्हणाला.
साहिल ने केलेला आरोप माझ्या जिव्हारी लागला होता. नवऱ्या कडून असलं बोलण ऐकुन मी गप्पच बसले. मला काय बोलाव ? कसं रिॲक्ट करावं ? परिस्थिती कशी सांभाळावी ? ते समजत नव्हत. त्याला सांभाळू ? त्याच्या सोबत वाद घालु ? की स्वतः ला सांभाळू ? त्या आरोपांनी माझं मन रक्त बांबाळ झालं होत. माझ्या कडे नापसंतीचा कटाक्ष टाकून साहिल ऑफिसला निघून गेला. तो गेल्यावर सासू बाईंनी उरली सुरली कसर पण भरून काढली.
" असं काय बघत बसली आहेस. काम कर. महिनाभर माहेरी राहायला गेली होती. चांगलाच आराम झाला असेल."
" आई आई ग्. माझे गुढगे दुखतात ग बाई." असं म्हणत त्या टेबलचा आधार घेत खुर्चीवरून उठल्या.
" आमच्या वेळीं असल काही करण्याची आमची हिंमत नव्हती ग बाई ! घरात काय खर्च केला , काय आणलं, दिलं घेतलं या सगळ्याचा हिशोब द्यावा लागायचा ! प्रत्येक पैशाचा हिशोब द्यावा लागायचा ?
नाही तर आजकालच्या मुली ! स्वतः च्या नवऱ्याला लुबडतात ! धोका देतात." सासू बाई तिच्या कडे संतापाने बघत त्यांच्या रुम मध्ये गेल्या.
नाही तर आजकालच्या मुली ! स्वतः च्या नवऱ्याला लुबडतात ! धोका देतात." सासू बाई तिच्या कडे संतापाने बघत त्यांच्या रुम मध्ये गेल्या.
क्रमशः
सदर कथा अष्टपैलू महासंग्राम २०२५ या स्पर्धेसाठी लिहिली आहे.
सामाजिक जलद कथा फेरी
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा