मी तर सासू बाईंच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघतच बसले. एक स्त्री असुन पण त्यांना असं म्हणताना काहीच कसं वाटलं नाही. डोळे तर केव्हाच वाहू लागले होते. आता किचन मधे माझे अश्रू बघणारे कोणी नव्हते आणि पुसायला देखील कोणीच येणारं नव्हत. समोरच सगळं धूसर धूसर दिसत होत.
आज ऑफिस मध्ये जायची गडबड नव्हती. मी सोमवार पासुन ऑफिस पुन्हा जॉईन करणारं होते. त्यामुळे आज निवांत वेळ होता. घरातली काम मी पटा पट आवरून घेतली. डोक्यात साहिल आणि सासु बाईंच बोलणं घुमत होते. मनाशी काही तरी पक्क केलं होतं.
" सासू बाई बरोबर बोलत होत्या. नवऱ्याला पै अन् पै चा हिशोब सांगायला हवा."
दुपारचं जेवण पण असच झालं. सासू बाईंनी एक घास सुखाने खाऊ दिला नाही. जेवताना सतत ऐकवत होत्या.
त्यांना असं वाटतं होत मी त्याचं घर लुटून माझं माहेरच घर भरत आहे. माहेर श्रीमंत करत आहे.
दुपारी पाऊस सुरू झाला. म्हणून बाल्कनीत वाळत घातलेले कपडे घरात आणून स्टँड वर सुकत घातले. पाऊस पडून गेल्यावर बाहेरच वातावरण प्रसन्न झालं होतं. तर मी माझी डायरी आणि पेन घेउन बाल्कनीत हिशोब लिहायला बसली होती.
पण डायरी मधली अक्षर धूसर धूसर झाली होती. मन अशांत होत तर हिशोब लिहायला त्रास होत होता. ऑफिस मध्ये सहज हिशोब लिहिणारी मी, खऱ्या आयुष्यातील हिशोब मांडताना गोंधळत होती.
मनाला दटावत, मनाचा निग्रह करून मी हिशोब पूर्ण केला. मनाला थोडी शांतता मिळाली. खरं तर जीव भांड्यात पडला होता. हे काम करायला मला बराच वेळ लागला होता. संध्याकाळ झाली होती.
साहिल पण ऑफिस मधून परत आला होता. बाहेर हॉल मध्ये साहिल आणि सासु बाईंच्या बोलण्याचा आवाज ऐकू येत होता. राखी पौर्णिमा जवळ आली होती. तर माझी नणंद माहेर पणाला राहायला येणारं होती. त्या बद्दलच बोलत होते ते दोघं. पण मी समोर दिसताच त्यांचा विषय बदलला.
" किर्ती मला कॉफी आणि काही तरी खायला घेउन ये. " साहिल म्हणाला.
" मी चहा बनवून आणते. तो पर्यंत तू हे वाच." अस म्हणत मी माझी हिशिबाची डायरी त्याच्या समोर ठेवली.
" हे सगळं काय चालू आहे किर्ती ? हा कुठला तमाशा ? "
" अग आता तो घरी आला आहे. दमला आहे. त्याला थोडा श्वास तरी घेऊ दे. आता तू इतका मोठा आहेर केलास तर नुकसान झालं आहे. ते भरून काढायला नको का ? आधी स्वतःच घर लुटायच आणि मग हे असले तमाशे करायचे ! " सासू बाई फणकारल्या. त्यांनी पुन्हा एकदा टोमणा मारला.
" आई मी काहीचं तमाशा करत नाही. मी तुम्ही म्हणल्या तसचं वागत आहे. तुम्ही सांगत होता ना तुमच्या काळात स्त्रीया नवऱ्याला पै अन् पै चा हिशोब देत होतात. मी पण नवऱ्याला हिशोब देत आहे. अगदीं पै अन पै चा."
किर्ती ताठ मानेनं बघत कणखर स्वरात म्हणाली. शेवटी किती वेळा टोमणे सहन करणार ना ?
" घरातली वस्तू तर आधीच विकून आलीस आता कसला डोंबलाचा हिशोब देत आहेस ? " सासू बाईनी तिला सुनावलं.
" आई मला टोमणा मरण्या आधी हिशोब तर बघा ? मग काय बोलायचं ते ठरवा. म्हणजे कळेल खरा लुटारू कोण आहे ? कोण कोणाला धोका देत आहे ? कोण सासरच् घर लुटून माहेच घर श्रीमंत करत आहे ? "
असं म्हणून किर्ती चहा बनवायला किचन मधे गेली. तिने चहा बनवला. ती नाष्टा करायला म्हणुन पोहे बनवण्याची तयारी करत होती. तिने कांदा कापला होता की बाहेर हॉल मधून साहिल चा मोठा तार सप्तकातला आवज ऐकू आला.
तो काहीशा चढ्या आवाजात तिला हाका मारत होता.
" काय झालं साहिल ? का ओरडत आहेस? "
" हा काय नविन तमाशा चालू केला आहेस तू किर्ती ? "
" काय झालं साहिल ? का ओरडत आहेस ? काय लिहिलं आहे या डायरीत ? काय झालं इतकं चिडायला " सासू बाईनी कोमल आवाजात विचारलं.
" आई तू बघ म्हणजे तुला समजेल मी का चिडलो आहे ते ? "
आईंनी डायरी वाचायला हातात घेतली आणि दरवाज्याची बेल वाजली. किर्ती ने जाऊन दरवाजा उघडला. तर समोर सासू बाईची बहिण आणि त्यांची मुलगी उभ्या होत्या.
घरी मावस सासु बाई आल्या तर तो विषय काही काळ बाजुला पडला. किर्ती पुन्हा सासरच्या मंडळींच्या सरबराई करण्यात गुंतली. त्या तिघी जणी गप्पा मारत बसल्या. किर्तीच्या मावस सासु बाई शहरातल्या दुसऱ्या भागात रहात होत्या. त्या या बाजुला एका लग्न समारंभा साठी आल्या होत्या. तर आज त्या भेटायला आल्या होत्या. सासू बाईंनी त्यांच्या साठी जेवण बनवण्याची आज्ञा केली. ती पुन्हा सुनबाईच कर्तव्य करण्यात गुंतली. आणि हिशोब बघायची बाब बाजुला पडली होती.
असेच काही दिवस गेले. राखी पौर्णिमा रविवारला येऊन ठेपली होती. तर नणंदा बाई आदल्या दिवशीच राहायला आल्या होत्या. शनिवारी सुट्टी असल्याने दुपारी शॉपिंग साठी बाहेर जायचं ठरलं. किर्ती आणि या माय लेकीची जोडी शॉपिंग साठी निघाली.
सासू बाईनी लेकीला महागडा सलवार सूट त्यावर घालायला मॅचिंग ज्वेलरी वगैरे खरेदी केली. त्या सोबत आता गौरी गणपतीचा उत्सव येणारं आहे तर गौरी साठी लेकीला सिल्कची साडी पण खरेदी केली. त्या वेळी किर्ती फक्त त्यांच्या सोबत होती. खरेदी झाल्यावर बिल देण्याची वेळ आली. तेव्हा किर्ती ने फोन आला आहे. अस म्हणत ती बाहेर निघून गेली.
" आई वहिनीला सांग फोन वर नंतर बोल. आधी बिल पे कर म्हणजे आपल्याला घरी जाता येईल ?"
" हा सांगते तिला." सासू बाई म्हणाल्या.
" किर्ती अग बिल पे करतेस ना ? उशीर होत आहे. फोन वर बोलणं महत्वाचं आहे की बील पे करणं ? " सासू बाई तिला म्हणाल्या.
" हॅलो निकीता मी तुला नंतर फोन करते हा " अस म्हणत तिने फोन ठेवला. सासू बाईन कडे वळून बघत म्हणाली,
" काय म्हणालात आई ? " किर्ती ने विचारलं.
क्रमशः
सदर कथा अष्टपैलू महासंग्राम २०२५ या स्पर्धेसाठी लिहिली आहे.
सामाजिक जलद कथा फेरी
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा