" मी म्हणल बिल पे कर."
" आई मी बिल पे करू ? " तिने आश्चर्याने विचारल.
" हो. मग अजुन कोण आहे का इथं ? ती तुझी नणंद आहे. तिचा मान नको का करायला ? "
" आई पण मी पैसे नाही आणले." ती म्हणाली.
" मग आता ? " त्यांनी विचारलं.
" साहिलला फोन करून विचारा " तिने पर्याय सुचवला.
त्यांनी साहिलला फोन लावला तर त्याचा फोन बंद होता. सासू बाई चरफडत होत्या. साहिलला बोलतं होत्या.
" कुठ आहे हा मुलगा ? गरजेच्या वेळीं फोन नको उचलायला ? " त्या चिड चिड करत, पुन्हा पुन्हा साहिलला फोन लावत होत्या. पण समोरून काहीच रिस्पॉन्स येत नव्हता.
" आई काय ग काय झालं ? करते ना बिल पे ? " लेकीन विचारलं.
" अम् अं.. हो. हो. करते पैसे पे." अस म्हणत त्यांनी खरेदीचे पैसे पे केले.
लेकीन चांगलीच शॉपिंग केली होती. जवळपास पाच हजार रुपये तर सहज खर्च झाले होते. त्या नंतर त्या तिघी घरी आल्या. इतर वेळी खरेदी साठी गेल्या की बाहेर हॉटेलं मधे काहितरी खाऊन यायचे. तेव्हा सगळा खर्च किर्ती करायची.पण आज काहीही न खाता त्या तिघी घरी आल्या.
घरी आल्यावर त्यांनी किर्तीला बटाट्याचे पराठे, कोशिंबीर, पुलाव रायता अस सगळ बनवण्याचा हुकूम केला. सोबत इन्स्टंट गुलाबजाम मिक्स पॅकेट पण आणलं होतं. तर ते अजून एक काम तिला करायला सांगितलं. किर्तीला तर हे घडणारच आहे. याची आधीच पुसटशी कल्पना होतीच. तर तिने त्याची तयारी मनाशी आधीच केली होती.
आज पहिल्यांदा तिने शॉपिंग साठी बिल पे करायला टाळाटाळ केली होती. इतर वेळी तर तिचं बिल पे करायची. पण आज तिने खर्च केला नाही. याचा राग सासू बाईंना येणारं नाही, असं घडणं कसं काय शक्य आहे ! त्या कसं तरी करून काही तरी करून त्यांचा राग तर व्यक्त करणारच ना !
असो नणंदा बाईंचं माहेर पण छान चालु होते. दुसऱ्या दिवशी राखी पौर्णिमा होती. तर घरात बरेच पाहुणे जमले होते. काल येतानाच त्यांनी साहिल आणि त्यांच्या बहिणींना द्यायला गिफ्टस् आणली होती. सगळा सोहळा पार पडला. सगळ्यांनी खूप एन्जॉय केल. किर्ती आणि तिच्या सारख्या आणखी दोन सूना स्वयंपाक घरात खपत होत्या. कार्यक्रम छान झाला.
त्या नंतरचा आठवडा शांत गेला होता. दरम्यानच्या काळात तिने तिचं ऑफिस पुन्हा जॉईन केलं होतं. मागच्या शुक्रवारी सॅलरी अकाउंटला जमा झाली होती. आज मंगळवार होता. आज ती लवकरच ऑफिस मधून घरी आली होती.
ती घरी आली तेंव्हा सासू बाई आणि साहिल हॉल मध्ये बसले होते. त्यांचे चेहरे लाल बुंद झालेले होते. समोर टी पॉय वर डायरी पडलेली दिसत होती. हि तिचं डायरी आहे, ज्यात तिने सगळा हिशोब लिहिला होता.
ती घरात अजून पुर्ण पणे आली पण नव्हती इतक्यात साहिल ने तिला विचारलं .
" किर्ती हे काय आहे ? "
" काय आहे म्हणजे ? " भोळे पणाचा आव आणून तिने विचारलं.
" साहिल काय झालं ? तु का चिडला आहेस ? आता किर्ती ने काय केलं ? पुन्हा माहेरी काही दिलं का ? " त्यांनी साहिलला विचारलं.
" मला काय विचारते, त्या पेक्षा तूझ्या सुनेला विचार ? "
" किर्ती काय केलं तु ? " सासू बाईनी माझ्या कडे बघून मला विचारलं.
" मी कुठं काय केलं आई ? "
" साहिल तुला चिडायला काय झालं ? अरे देवा , कोणी तरी मला सांगेल का नेमकं काय झालं आहे ? "
" आई किर्ती ने लोन चे ई एम आय भरायचे नाही असं बँकेला सांगितल आहे."
" अस का सांगितल तू किर्ती ? आता पुन्हा कोणता धोका दिला तू नवऱ्याला ? का लुटलं माझ्या पोराला ? धोकेबाज कुठली ! "
सासु बाईंनी विचारलं. ते पण टोमणा देत. बहिणीला सोन्याचं कानातलं काय आहेर म्हणून दिलं, त्या दिवसा पासून, धोकेबाज ही उपाधी दिली होती त्यांनी मला. त्याचा वापर करण्याची एक संधी सोडत नव्हत्या सासु बाई.
" आई मी हिशोब लिहून दिला होता. तो बघा. म्हणजे समजेल." ती शांत स्वरात म्हणाली. नी पर्स घेउन रूम कडे निघाली.
" किर्ती हे काय नवीन नाटक लावलं आहेस ग ? हि डायरी कसली आहे ? कसले हिशोब मांडले आहेस ? " साहिल ने तिला अडवून विचारलं. तो पर्यंत सासू बाई समोरची डायरी बघत होत्या.
" हिशोब सांगते आहे साहिल. हिशोब. आई म्हणल्या होत्या ना , त्यांच्या जमान्यात स्त्रीया नवऱ्याला पै अन् पै चा हिशोब देत होत्या. मी पण तुला पै अन् पै चा हिशोब देत आहे." किर्ती थंड पणे म्हणली.
" घरातल्या महागड्या वस्तू तर आधीच लुटून आली आहेस. अजुन काय काय लुटलं याचा हिशोब देत आहेस का ? " त्यांनी तिरकस पणे प्रश्न केला.
" आई हिशोब लिहिला आहे. एकदा वाचून तर बघा ? " किर्ती मागाचच्या थंड पणे म्हणली.
सासू बाई जसं जशा हिशोब वाचत होत्या तसं तसं त्यांचा चेहरा पण लाल भासू लागला.
सासू बाई जसं जशा हिशोब वाचत होत्या तसं तसं त्यांचा चेहरा पण लाल भासू लागला.
" हे सगळं काय आहे किर्ती ? " त्यांनी विचारलं.
" हिशोब सांगितला आहे आई. आता पर्यंत खर्च केलेल्या पैशांचा हिशोब लिहिला आहे."
" आई केतकीच्या लग्नात एक सोन्याचं कानातल काय दिलं तुम्ही तर मला लुटारू, दगाबाज नाही नाही ते बोलून मोकळ्या झालात. धोकेबाज नावाने तर बारसच करुन टाकलं. एक दिवस, एक संधी नाही सोडली मला टोमणे मारण्याची ? "
" आई, साहिल, हिशोब सांगते तो नीट ऐका, कान उघडे ठेवून, डोकं जाग्यावर ठेवून ऐका, केतकीला जो आहेर दिला. त्या साठी तुमचा काहीही हिस्सा दिलेला नव्हता. मी माझे जुने कानातले मोडले आणि त्यात काही रक्कम जमा करून केतकीला कानातल घेउन दिलं आहे. ते कानातले मला माझ्या बाबांनी घेउन दिलं होतं. तुम्ही नव्हत दिलं. म्हणूनचं तुम्हाला हिशोब सांगणं आवश्यक आहे. आता मला सांगा खरा दगाबाज कोण आहे ? धोका कोणी कोणाला दिला ? " किर्ती ने ठणकावून विचारलं.
" ज्यावेळी मी लग्न करून या घरात आले. त्या नंतर लगेचच ताईंच लग्न ठरलं. माझ्या लग्नात मी आणलेलं रुखवता तील सामान ताईंना दिलं.आपल्याला आता या नविन वस्तूची गरज नाही.
तर ताईंना लग्नात देऊ. मला घातलेले दागदागिने पण तुम्ही ताईंना चढवले. त्यावेळी मी पण ते दागिने दिले. तुमच्या मते मी या घरची सून आहे. तर हे सगळं करणं माझं कर्तव्य आहे. आणि आज जेंव्हा मी माझ्या बहिणीला सोन्याचं कानातल आहेरात दिलं तर लगेचच मी धोकेबाज, लुटारू , दगाबाज ठरले ? अजब न्याय आहे तुमचा ? "
क्रमशः
सदर कथा अष्टपैलू महासंग्राम २०२५ या स्पर्धेसाठी लिहिली आहे.
सामाजिक जलद कथा फेरी
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा