" ताईंच्या लग्नात पैसे कमी पडत होते तेव्हा मी माझे सेविंगस् खर्च केले तेंव्हा ते करणं एक बायको म्हणून गरजेचं होतं. लग्नाच्या आधी जावई बापूंनी कार मागितली तर त्यावेळी पैसे गरजेचे होते. तेंव्हा माझे पैसे घेणं चूक नव्हत.
त्यासाठी आज पर्यंत माझ्या सॅलरी अकाउंट मधून इ एम आय माझ्या अकाउंट मधून कट होतात. त्या बद्दल मला कोणी काही बोलत नाही. मी माझं कर्तव्य पार पाडत आहे. त्यात काय नविन ? असं विचारता ना ? ते बरं चालतं तुम्हाला ? "
" प्रत्येक सणाला मी ताईंच्या साठी माझ्या सॅलरी मधून गिफ्टस् आणते. तेव्हा नाही मी तुम्हाला धोकेबाज वाटतं ?
तेव्हा नाही तुम्ही म्हणत तुझे पैसे आहेत तर खर्च नको करू ? असं का ? "
" साहिल आता तु मला सांग, मी तूझ्या बहिणीच माहेरपण , सणवार करायचं. ते माझं कर्तव्य आहे. अखेर मी या घरची एकुलती एक सुन आहे ना ! तुझी बहिण ती माझी बहीण असं म्हणायचं. मग माझी बहीण ती तुझी बहीण नाही होऊ शकत का ? "
" लग्नात आहेर दिला गेला तेव्हा पण माझं सासरच नावं पुढं केलं होतं. माझ्या सासरचा मान वाढला होता. आहेर करताना पण पाकिटावर तुमचं नावं लिहिलं होतं.
मग मान कोणाचा वाढला ? इज्जत कोणाची वाढली ? तुमची ना ? माझ्या सासरची ना ?
मग अस सगळं असताना का म्हणून मला धोकेबाज म्हणलं गेलं ? मी दगाबाज आहे. घर लुटणारी डाकू आहे.
सासरच घर लुटून माहेर श्रीमंत करणारी म्हणून का मला सतत हिणवलं गेलं ?
का माझा अपमान केला ? पदोपदी मला का टोमणे मारले गेले ? माझी का बदनामी केली ? "
" जर मी केतकीच्या लग्नात सोन्याचं कानातलं आहेर म्हणून देऊन तुम्हाला धोका दिला असं म्हणणं बरोबर आहे. सासरच्या मान सन्मान जपण्यासाठी विचार करणं चुक आहे.गुन्हा केला आहे.धोका देणं ठरतं तर मी मान्य करते, मी धोका खाल्ला आहे.
माझ्या सासरच्या मान सन्मानाची काळजी घेणं म्हणून काही चांगलं करणं म्हणजे धोका देणं आहे. तर मी आहे धोकेबाज. आणि आज पर्यंत मोठ्या आनंदाने मी हा धोका खाल्ला आहे. "
" पण मला कुठं माहीत आहे, मी किती मोठी चुक करत आहे. सासरच्या मान सन्मान जपण्यासाठी विचार करणं चुक आहे. सासरच्या मंडळींच्या लेखी
तर मोठा गुन्हा आहे. धोका देणं आहे. पण आता बास झालं. सासरच्या मान सन्मान जपण्यासाठी विचार करणं. स्वतःचं हक्काचं सोडून देणं . सासरच्या लोकांचा मान जपणं. मी आता ती चुक पुन्हा करणारं नाही. मी धोका खाणार नाही." बोलता बोलता तिचा श्वास चांगलाच चढला होता. तिने स्वतःला शांत केले. पुन्हा एकदा मोठा श्वास घेऊन कणखर आवाजात म्हणाली,
तर मोठा गुन्हा आहे. धोका देणं आहे. पण आता बास झालं. सासरच्या मान सन्मान जपण्यासाठी विचार करणं. स्वतःचं हक्काचं सोडून देणं . सासरच्या लोकांचा मान जपणं. मी आता ती चुक पुन्हा करणारं नाही. मी धोका खाणार नाही." बोलता बोलता तिचा श्वास चांगलाच चढला होता. तिने स्वतःला शांत केले. पुन्हा एकदा मोठा श्वास घेऊन कणखर आवाजात म्हणाली,
" मी या घरची सून म्हणून माझी कर्तव्य पूर्ण करेन. पण त्यासाठी माझ्या स्वप्नाची, कष्टाची आहुती देऊन नाही.साहिल या महिन्या पासुन माझ्या सॅलरी मधून कोणताही ई एम आय पे होणार नाही. हे मी आधीच क्लिअर करते. बहिणीचे लाड पुरवण. हट्ट पुरे करणं. हे तिच्या माहेरच्या मंडळींची जबाबदारी आहे. त्यांच् कर्तव्य आहे. ते त्यांनी निभवाव. त्यात मला गृहीत धरू नये."
" साहिल मी नोकरी करते ते माझा स्वाभिमान जपण्यासाठी. आपल्या संसाराला हातभार लावण्यासाठी. आता मी तु दिलेल्या पैशान मध्येचं संसार करणार. माझ्या जबाबदाऱ्या सांभाळून मी अर्थाजन करणारं. मला माझा स्वाभिमान जपण्यासाठी हे सगळं करणं गरजेचं वाटतं. देव न करो , पण भविष्यात अशी काही परिस्थिती उभी राहिली तर ? मला पुन्हा एकदा धोकेबाज म्हणलं गेलेलं चालणारं नाही. आवडणार नाही. पटणार नाही."
आज पहिल्यांदा किर्ती ने तिचं मन मोकळं केलं होतं. तिचं मत मांडलं होतं. तिचा निर्णय सांगितला होता. किर्तीच सडेतोड बोलणं ऐकून साहिल आणि सासु बाई माना खाली घालून बसले होते. आज त्यांच्यात हिंमत नव्हती, किर्तीला काही बोलण्याची. आडवण्याची.
थोडया वेळात किर्ती ने सगळ्यांच्या साठी चहा बनवला. त्या दोघांना तर चहा कडू लागत होता. पण किर्ती बाल्कनी मध्ये उभी राहुन मस्त पैकी चहा एन्जॉय करत होती. सोबतीला होता तिचा आवडता पाऊस. आज तिला मोकळं मोकळं वाटतं होत. मनात पक्की खात्री होती , की या पुढे सासू बाई साहिल तिला धोकेबाज म्हणायच्या आधी शंभर वेळा तरी विचार करतील.
ती चहाचे घुटके घेत पावसाचे थेंब हातावर झेलत होती.आनंदात होती.पाऊस एन्जॉय करत होती.
समाप्त
© ® वेदा
कथा आवडल्यास कॉमेंट मध्ये सांगा.
या कथेचा वापर यू ट्यूब किंवा इतर कुठेही आढळून आल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
किर्तीचा निर्णय योग्य आहे का ?
तुमचं मत कॉमेंट मध्ये सांगा.
सदर कथा अष्टपैलू महासंग्राम २०२५ या स्पर्धेसाठी लिहिली आहे.
सामाजिक जलद कथा फेरी
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा