ती खेळकर की जबाबदार भाग 3 अंतिम
©️®️शिल्पा सुतार
सतीश घरी आला. जेवण झाल. मीनाचा फोन वाजत होता. मावशीचा फोन होता. तिच्या मुलीच प्रियाच लग्न जमलं होत. लगेच साखरपुडा होता. ती खूप बोलत होती.
" श्रुती तू पण ये. "
" मला यावेळी नाही जमणार मावशी. लग्नाच्या वेळी लवकर येईल." श्रुतीने सांगितल.
फोन वर बोलून झाल. मीना आनंदात होती. " मी जावु का दोन दिवस आधी मावशी कडे मदतीला? "
"हो जा."
"इकडे कस होईल?"
"आम्ही करू." श्रुती बोलली.
"आजी कडे नीट लक्ष द्यायच."
" हो आई तू जा. "
आजी रूम मधे होत्या. "आई मी जावू ना? तुम्ही आणि श्रुती बघाल ना घरा कडे?"
"बिनधास्त जा मी श्रुती कडे लक्ष देईल ." आजी बोलल्या.
"तुमच नाही हो श्रुती काही करेल की नाही अस वाटत आहे." मीना काळजीत होती.
" करेल बरोबर मी करून घेईन तिच्या कडुन. तेवढीच तिला घरकामाची सवय होईल." आजी बोलल्या.
मीना सकाळी निघाली. माहेरी तिला खूप छान वाटत होत. ती मदतीला गेली होती. पण विशेष काम नव्हतं. मावशी काही करू देत नव्हती. नुसते लाड सुरू होते. घरचा विचार तिच्या मनात होता. काय करत असतिल काय माहिती?
सकाळी श्रुतीने बाबांना कांदा कापायला लावला.
"आजी तू फक्त पोहे किती घेवू ते सांग. "
त्यांनी काढून दिले. श्रुतीने पोहे केले. छान झाले होते पोहे. थोड मीठ कमी होत आणि वेळ थोडा जास्त लागला बनवायला.
दुपारी ती कॉलेज मधे गेली. तिने तिकडे खाल्ल. आजी त्यांच करून घेणार होत्या.
" संध्याकाळी काय करू या श्रुती? " आजी विचारत होत्या.
" पोळी भाजी करू. मी छान भेंडीची भाजी करते. तू बस." श्रुती अस बोलण्यावर आजी आश्चर्यचकित झाल्या होत्या. त्यांच्या चेहर्यावर हसू होत.
श्रुतीने अर्धा तासात भेंडी कापली. साधी छान झाली होती भाजी.
"पोळ्या ग श्रुती? मी करु का? " आजींनी किचन मधे येत विचारल.
"बाबा आले की मी करते गरम गरम."
"ठीक आहे." कणिक भिजवून तयार होती. ती अभ्यास करत होती.
थोड्या वेळाने सतीश आला.
" किती पोळ्या करू आजी? सहा का?" प्रत्येकाच्या दोन असा अंदाज श्रुतीने बांधला.
"नाही आता जास्त लागतील. तुझ्या पोळ्या लहान असतात आणि भात ही नाही." आजी बोलली.
" मी कुकर लावतो. " सतीशने वरण भात केला. श्रुतीने तिघांच्या पोळ्या केल्या. जेवण झाल्यावर तिने किचन आवरल. पुढची खोली आवरली.
" आता काय सुरू आहे श्रुती? पुरे झाल काम. जा झोप."
"बाबा मला उद्या लवकर जायच आहे म्हणून आता आवरत होती. उद्या नाश्त्याला काय करू या? "
" डोसे मी पीठ आणल आहे."
"बर झाल. "
मीनाचा फोन आला. सगळं सुरळीत सुरू होत. ती खुश होती. साखरपुडा छान झाला. आई भेटल्यामुळे मीना खूप खुश होती.
"घरी काय सुरू आहे?" त्यांनी विचारल.
"आई अग श्रुती छान काम करते सगळं सांभाळते." मीनाने आनंदाने सांगितल.
"मी म्हटलं होत तुला. तू उगीच टेंशन घेते. आजकालच्या मुली चोवीस तास किचन कडे बघत बसत नाही. पटकन काम उरकून लगेच त्यांच्या अभ्यासाला लागतात. वेळ आली की करतात."
"हो ना मला वाटल होत काही येत की नाही हिला."
" का येणार नाही हुशार किती आहे ती."
मीना घरी आली. घर छान आवरलेले होत. म्हणजे श्रुती माझ्या समोर नखरे करते. इतर वेळी छान रहाते. आजी पण श्रुतीच कौतुक करत होत्या.
संध्याकाळी श्रुती कॉलेज हुन आली. आई म्हणत गळ्यात पडली. "बर झालं तू आलीस माझे आरामाचे दिवस परत सुरु झाले. "
" नाही श्रुती आता तू आळस झटकला आहे तर परत तशी नको होऊस." मीना बोलत होती.
"चील ग आई. मी ऐकणार नाही." श्रुती आणलेला खावू खात होती.
मीना डोक्याला हात लावून बसली. परत तेच ये रे माझ्या मागल्या. आजी हसत होती.
"आई बघा ना काय अस? " मीनाने तक्रार केली.
"जावु दे ग वेळ पडली की करते ती बरोबर ." श्रुतीच्या ग्रुप मधे आजी अॅड झाली होती. मीना हसत होती.
सतीश आला. तो ही श्रुतीच कौतुक करत होता.
" चला जेवायला. "
श्रुतीला चार वेळा बोलवलं. ती हेड फोन लावून अभ्यास करत होती. रूम मधे नेहमीप्रमाणे खूप पसारा होता.
मीना चिडली." या श्रुतीला काही बोलणं बंद करणार आहे मी . ही रूम बघितली की माझं ब्लड प्रेशर वाढत."
मीना चिडचिड करत होती. सतीश, आजी हसत होते. यांच कधी पटणार आहे काय माहिती?
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा