Login

ती रात्र

ही एक रहस्यकथा आहे.
भाग 1
अमावस्येची रात्र होती. निर्जन रस्ता होता. रस्त्यावर एकही दिवा चालू नव्हता. गर्द झाडी होती. अंगाला बोचरी थंडी जाणवत होती. पुढे मागे एकही गाडी तर सोडाच कुत्र देखील नव्हते. एक कॅनॉल पास केल्यावर मारुतीच्या मंदिरा समोरच अभय चे कौलारू टूमदार घर होते. रात्रीच्या वेळी घरासमोर एक मिणमिनता दिवा चालू असायचा. घरासमोर छान सारवलेले अंगण होते. तुळशी आई अंगणातच आलेल्या पाहुण्यांचा थकवा दूर करत असे. बाजूलाच एका टूमदार कडुलिंबाच्या झाडाला कट्टा केलेला होता. आलेला पै पाहुणा त्यावर विसावा घेत चहा पाण्याच्या गोष्टी करत असे. यातच माई अप्पांचा दिवस संपायचा. आप्पा बँकेतून मॅनेजर पदावरून रिटायर तर माई शाळेतून मुख्याध्यापिका पदावरून 6 महिन्यापूर्वीच रिटायर झालेली. सकाळ संध्याकाळ देवपूजा आरती आणि गावातल्या विठ्ठलाचे दर्शन हाच माईचा नित्यक्रम तर आप्पा सकाळी मारुतीरायाला अंघोळ घालून पूजन करून आरती झाल्यावर घरी येत. आपल्यावर दोघे मिळून मस्त चहा पीत बसत. घरातले वातावरण नेहमी शांत आणि आनंदी. घरात सुख समाधान होते. आप्पाना एक मुलगी आणि एक मुलगा. मुलीचे लग्न होऊन ती परराज्यात स्थिरावली होती, तर मुलगा अभय कामानिमित्त शहरच्या ठिकाणी राहायचा. सुट्टीच्या दिवशी शनिवार रविवार महिन्यातून एकदा गावी यायचा आणि सोमवारी परतायचा. माई आप्पाना शहरात राहायला येण्यासाठी दरवेळी आग्रह करायचा पण त्यांचे आपले एकच "नको बाबा आम्ही आपले इथेच बरे. 4 लोक जातात येतात बोलतात गप्पा मारतात आमचा वेळ छान जातो. तिकडे येऊन मी हिच्या तोंडाकडे बघणार आणि ही टीव्ही च्या तोंडाकडे... " माई ने जरा घुश्यातच आप्पाकडे तिरपा कटाक्ष टाकला आणि आप्पा हळूच खाली मान घालून हसले. हे असे नेहमी चालायचे. सोमवारी पहाटेच अभय शहरात ऑफिस साठी परत आला. माई अप्पा असेच एकदा गप्पा मारत बसलेले असताना रघु आप्पांचा गडी धावतच आला.
"आप्पा, आप्पा काय झाले माहितीये का?" रघु धापा टाकत बोलु लागला.
माई, "अरे आधी शांत हो श्वास घे बस जरा मी पाणी देते."
नको नको माई पाणी नको आणि काही नको मी काय सांगतो ते ऐका आधी."
"अरे काय झालय शांतपणे सांग बरं "अप्पा म्हणाले.
अप्पा काय सांगू तुम्हाला काल रात्री तात्याचा पोरगा तालुक्यावरून घरी येत होता. एकटाच होता तो गाडीवर.
"बरं मग", माई म्हणाली.
"अरे तो नेहमीच जा ये करत असतो की, त्यात काय एवढे." आप्पाना काहीच समजत नव्हते.
"अहो आप्पा एवढेच नाही त्याला त्याला....
"अरे पुढे बोल" आप्पा ओरडले.
"त्याला रस्त्यात पांढरी साडी नेसलेली केस मोकळे सोडलेली बाई दिसली. ती त्याला गाडी थांबवण्यासाठी हात करत होती".
"मग पुढे काय झाले" माई ने विचारले.
"त्याची गाडी जोरात होती. तो थांबलाच नाही. थोडं पुढे आल्यावर त्याला वाटले रात्रीची वेळ, थंडी आहे, एकटीच बाई दिसते, आता इतक्या रात्री एकही गाडी मिळणार नाही, इथेच जवळ कुणाकडे तरी आली असेल म्हणून कुठे जायचे ते विचारू म्हणून मागे पहिले... तर तर तरsss ती ती बाई तिथे नव्हतीच. एका क्षणात कुठे गायब झाली. भुताडकी होती ती आप्पा सगळ्या गावात हीच चर्चा चालू आहे".
"ये चल काहीही बोलू नकोस, अशी भुताडकी वगैरे काही नसते. उगाच सकाळी सकाळी कोणी तुला भेटले नाही का? म्हणून मलाच त्रास द्यायला आलास तो. चहा टाक ग जरा आता आलाच आहेस तर चहा पिऊन जा." आप्पानी चहाचे फर्मान सोडले आणि माईने लगेच चहाचे आधण ठेवले देखील. चहा बघता बघता माईला बचत गट अध्यक्ष मंगल ताईंचा फोन आला. "माई उद्या 5 तारीख मिटिंग चे लक्षात आहे ना. उद्या आपण सगळ्या रेखाताईच्या घरी जमतोय."
बरं बरं ठीक आहे. मी येते अग आपल्या नेहमीच्या वेळेतच यायचे आहे ना. हो हो नेहमीप्रमाणे या 5 वाजता. ओके चालेल येते म्हणून माई ने फोन ठेवला तोवर चहा देखील झाला होता. रघु चहा पिऊन गेला.
माई ने उद्या च्या मिटिंग चे आप्पाना सांगितले. माई नेहमीप्रमाणे साधे सिम्पल आवरून मिटिंग ला गेल्या. सगळ्या जणी गोळा झाल्या पण सुषमा आली नव्हती म्हणून सगळ्यांनी एकमेकींना विचारले "काय झाले सुषमा का आली नाही तेवढ्यात छायाताई आली आणि म्हणाली "मला सुषमाताई चा फोन आला होता ती येणार नाही तिच्या सुनेला अस्मिता ला ताप भरला आहे."अचानक ताप आला सकाळी तर बरी होती."
0

🎭 Series Post

View all