भाग 2
" अगं काय सांगू तुम्हाला त्या जे सांगत होत्या ना ते ऐकून माझ्या डोक्यातच मुंग्या आल्या "अग काय झाले ते सांग तर प्रस्तावना बसं झाली" माई म्हणाल्या. "अहो माई सकाळी सुषमा ताईंच्या घरी सुषमाताई आणि अस्मिता दोघीच होत्या. अस्मिता स्वयंपाक करत होती आणि सुषमाताई मागच्या अंगणात कपडे वाळत घालत होत्या. अचानक दार कोणीतरी थोठावले म्हणून अस्मिता कोण आले ते बघायला गेली आणि बघते तर काय, "दारात पांढरी साडी नेसलेली केस मोकळे सोडलेली एक बाई अचकट विचकट अशी हसत होती." कोण आले असे विचारत बघायला म्हणून सुषमाताई आल्या तर अस्मिता दारात चक्कर येऊन पडलेली दिसली सुषमाताईंनी घराबाहेर डोकावले कोण दिसते का कोणी आहे का पाहायला तर तिथे कोणीच नव्हते." सुषमाताई नि अस्मिता च्या तोंडावर पाणी मारले तेव्हा तिला शुद्ध आली. अस्मिता खूप घाबरली आहे तिच्या जवळ सतत कोणीतरी असायला हवे म्हणून सुषमाताई आल्या नाहीत. मी घरी जाऊन त्यांचे पैसे भरायला आणले आहेत. बापरे किती भयंकर आहे हे सगळे. "ऐकावे ते नवलंच की ग अग त्या तात्यांच्या पोराला पण तीच बाई दिसली असेल का गं?" "अगं बाई कसली चेटकीण असेल ती.
"चेटकीण की भुताटकी असेल गं."
"अग ते काही असू दे आहे तर डेंजरच ना".
"माई तुम्ही दोघेच घरात असता काळजी घ्या हो. काहीही वाटले तरी लगेच फोन करा."
"अगं आम्हाला काही होत नाही, तुम्ही निश्चिन्त रहा.
माझा विठुराया आणि यांचा मारुतीराया खंबीर आहे आमची काळजी घ्यायला. तुम्ही सुद्धा काळजी करू नका. स्तोत्र, अखंड जप, नामस्मरण चालू ठेवा. श्रद्धापूर्वक देवाचे स्मरण करा. कुठलीही नकारात्मक शक्ती आपले काहीही वाईट करूच शकणार नाही असा भगवंतावर विश्वास असू दे. मग बघा भीती कुठच्या कुठे पळून जाते." माई कित्ती गोड बोलता हो तुम्ही. फक्त आणि फक्त ऐकतच राहावेसे वाटते. इतके बळ कुठून येते हो माई? "थोडेसे काही बिनसले तर आमच्या मनात धस्स होते. भीती वाटत राहते माझं तर बीपी लगेच वाढतो, घाम फुटतो". अगं मनात भीती ची जागा श्रद्धेने घेतली तर भीती नावाला सुद्धा राहणार नाही त्यासाठी आवश्यक आहे ते नामस्मरण आणि भगवंतावरचा विश्वास बसं. शेवटी फक्त हेच येते बघ बाकी सोबत काहीच येत नाही."
"बरं चला खूप झाल्या गप्पा निघायचे नाही का आपापल्या घरी. माई जवळजवळ ओरडल्याच. तेव्हा सगळ्याजणी उठून आपापल्या घरी निघाल्या प्रत्येकजण विचारताच होते की हे काय होतंय? काय चाललय? मिटिंग मध्ये झालेले सर्व काही माईंनी आप्पाना सांगितले. अप्पाना हे काही पटणारे नव्हतेच म्हणून त्यांनी मौन पाळणेच पसंत केले.
एक दिवस सकाळी सकाळी दीप्तीचा (माईंच्या मुलीचा) फोन आला. तब्बेतीच्या हवा पाण्याच्या गोष्टी झाल्यावर ती ने सांगायला सुरुवात केली.
"अगं माई आपल्या गावातली ती डोंगराकाठची जमीन आणि एक कोणाचा तरी बंगला वर्षनुवर्षे तशीच पडून आहे बघ तिथे कोणी जात येत नाही. ती जागा समीर (दीप्तीचा नवरा) ने एका बिल्डर ला दाखवली निसर्गरम्य ठीकाणी हवेशीर बाजूलाच नदी प्रोजेक्ट एकदम प्राइम झाला असता.
"मग त्याचं काय झालं?" अगं तो बिल्डर आला जागा पहिली त्याला जागा आवडली तो जेव्हा जागा बघायला आला होता तेव्हा एका भुताने त्याला खूप त्रास दिला होता ते भूत विचित्र हसत होते. समीर च्या मित्राच्या सतत आजूबाजूला ते फिरत होते. त्याला काळ्या पांढऱ्या आकृत्या दिसत होत्या. उंचच्या उंच केस मोकळे सोडलेले. समीर च्या मित्राला विचित्रच वाटत होते. गाडी चालू करायला गेला तर गाडी चालूच झाली नाही त्याची. समीर च्या मित्राने स्वामींचा जप मोठं मोठ्याने म्हणायला सुरुवात केली. तर ते भूत त्याला म्हणते "ये गप ये गप हे सगळे बोलणे बंद कर. मला त्याने त्रास होतोय." त्याने गळा दाबला आणि सोडून दिले
"पुन्हा इथे येशील तर गळा दाबून मारून टाकेल." काही दिवसांनी त्याने एक ज्योतिष आणि वास्तुतज्ज्ञला बोलावून होते.
हो का बरं मग त्यांचे काय म्हणणे होते?
"अगं कसले डील आणि कसले काय त्या वास्तुतज्ञाने सांगितले की, या बंगल्याला हात लावू नका आणि येथून पुढे इकडे फिरकू पण नका. सगळ्या नकारात्मक शक्तींनी तिथे कब्जा केलेला आहे.एक रात्र पण राहू देणार नाहीत."
तिथे चेटुक, भुताटकी चा अधिवास आहे म्हणे.
अरे बापरे मग आता काय गं?

Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा