Login

ती रात्र भाग - 4

ही एक रहस्यकथा आहे.
भाग 4
समिरच्या मित्राला सांग की नका येऊ इकडे उगीच जीवाला घोर. एका प्रोजेक्टसाठी हकनाक जीव जायचा.
अगं याला काही उपाय नसेल का गं माई?
वास्तुतज्ञ किंवा ज्योतिष सांगू शकतील काय तो उपाय. मला वाटते आपल्या स्तोत्र मंत्र पठण अखंड नामस्मरण पवित्र होम हवन याशिवाय ते जाणार नाहीत.
गावात शिकलेला आणि शहरात एका मोठ्या पोस्टवर असलेला गावातला मुलगा आदित्य सुट्टीमध्ये त्याच्या कुटुंबासोबत गावी काही दिवसांसाठी राहण्यास आला. त्याच्या 7/8 वर्षाच्या मुलाला सारखेच त्या काळ्या पांढऱ्या आकृत्या दिसायच्या. तो रात्री खूप रडायचा झोपेत दचकून जागा व्हायचा. अचानक खेळता खेळता पळत सुटायचा. आई वडिलांनी त्याला विश्वासात घेऊन विचारले तेव्हा समजले की या भुताटकीचा त्याला त्रास होतोय. आदित्य आणि अभय लहानपणापासूनचे मित्र. एकच शाळेत शिकलेले. शेजारीच राहणारे. तो त्याच्या फॅमिलीसहित आलाय म्हणून आप्पानी त्याला जेवणासाठी घरी बोलावले. आज रविवार होता अभय देखील घरी आला होता. अभयचा आज वाढदिवस असल्यामुळे रात्री त्याचे मित्र घरी येऊन त्याला सरप्राइज पार्टी देणार असे मित्रांनी ठरवले.अभय चार एकूण 8 मित्र 4 बाईकवर रात्री 9 वाजता अभयच्या घराजवळ येतात. वॉशरूमसाठी आणि थोडे रिलॅक्स होऊ म्हणून उसाच्या शेताच्या बाजूला उभे राहिले. कॅनॉलच्या अलीकडे 4/5 लोक अंधारात कपडे बदलत होते असे दिसलें. ते अडून लपून काय चालले आहे ते बघत होते. ते 4/5 जण साधे नेहमीचे कपडे बदलून पांढरे कपडे घालत होते. केसांचा विग घालत होते. पांढरी पावडर सगळ्या अंगाला चोळत होते. हे सगळे अभयचे मित्र लपून छपून पाहत होते. अभयने ऑफिसमध्ये सगळे मित्रांना सांगितले होते त्यामुळे सगळा प्रकार मित्रांना माहित होता. आता मित्रांच्या लक्षात आले की ही खरोखर भुताटकी वगैरे काही नाही सध्या सरळ वेशातील आपल्या सारखीच माणसे आहेत. इतके दिवस गावातल्या लोकांना घाबरवणारी माणसे आता आपल्या तावडीत सापडली होती. आता अभयच्या मित्रानी त्यांना पकडायचा प्लॅन आखला. 2 जण गाडीवर पुढे गेले. नेहमीप्रमाणे ती पांढऱ्या साडीतली भूतनीने रस्त्यात गाडी अडवली आणि त्यांना घाबरवायचा प्रयत्न केला आणि मित्रांनी घाबरण्याचे नाटक केले. त्यातील एकाने मुद्दा चक्कर येण्याचे नाटक केले. चक्कर आलेले बघून मित्र भूतनी ला म्हणाला "तुला काय हवे आहे ते मी देतो तुला जे बोलावले.काही हवे असेल ते सांग अशी विनंती केली." त्यावर भूतनी म्हणाली "तुम्ही कुठे चालला आहात तुमचे काय काम आहे तिकडे तुमच्याकडे किती पैसे आहेत ते मला सगळे देऊन जायचे." यावर त्या मित्राने सांगितले "माझ्याकडे आत्ता पैसे नाहीत मी घड्याळ देतो त्या बदल्यात तू मला माझा मित्र परत दे" हे सर्व मागे उभे असलेले मित्र मोबाईल मध्ये व्हिडीओ काढत होते. त्यातील एका मित्राने अभय ला फोन करून घडत असलेल्या प्लॅनची कल्पना दिली. अभय ने अण्णा माईंना आणि गावकऱ्यांना बोलावले आणि पुढील प्लॅन केला गावातील काही लोक काही अंतरावर जाऊन थांबली काही मंडळी पुढे अभयच्या मित्रांच्या मदतीला म्हणून गेली तोपर्यंत इकडे भूत तडजोड करायला तयार नव्हते या सर्वांमध्ये अभयच्या मित्राने बराच वेळ घालवल्यामुळे भुताची टोळी मारायला तेव्हाच अभयच्या बाकी मित्रांनी त्या सर्व टोळी वरती हल्ला केला गावातील लोक येईपर्यंत पकडून ठेवले अशा पद्धतीने गावापर्यंत पोहोचले समोर नेऊन उभी केली याबाबतीतली याबाबतीतली सर्व माहिती व या सर्व करण्यामागचं कारण त्यांना विचारले असता त्यांची पूर्वी गावकऱ्यांकडून त्यांच्या बाबतीत जातीधर्माबद्दल घटना आणि द्वेष मत्सर यासर्व गोष्टी सांगितल्या. याद्दल सर्व गोष्टीवर पडदा पडला.
0

🎭 Series Post

View all