चॅम्पियन ट्रॉफी - 2025
टीम- सोनल
लघुकथा स्पर्धा
शीर्षक : ती संध्याकाळ
"ती संध्याकाळ
आठवणीत बहरलेली
गंध तिचा मनात
आयुष्यात भिनलेली"
आठवणीत बहरलेली
गंध तिचा मनात
आयुष्यात भिनलेली"
आज नेहाचा शेवटचा पेपर होता. नेहा खूप खुश होती. पेपर सुटून बराच वेळ झाला होता. साडे पाच वाजले होते. नेहाला घरी जायची घाई झाली होती.
पण,आज अचानक एक अनोळखी मुलगा तिच्या समोर आला. आणि खूप प्रेमाने नेहाला म्हणाला,
" मला तुमच्याशी बोलायचं आहे. "
नेहा घाबरली! कारण नेहा जास्त मुलींमध्ये न मिसळणारी पण अभ्यासात हुशार, त्याचबरोबर नेहा ही तिच्या काका काकूकडे राहायची.
नेहाच्या काकाला दोन मुले होती. काकांची दोन्हीही मुले ही नेहापेक्षा मोठी होती. त्यामुळे नेहा खूप लाडाची. त्या दोन भावांची लाडाची बहीण होती.
काकाचा मुलगा म्हणजे तिचा भाऊ तिला रोज कॉलेजमध्ये सोडायला जायचा आणि घ्यायला सुद्धा यायचा.
नेहा देखणी होती. तिचं देखण रूप त्यामुळे सर्वांचं लक्ष नेहाकडे असायच.
त्या अनोळखी मुलाचं नेहाच्या समोर येणं. त्याच ते प्रेमाने बोलन. बोलण्यातील आत्मविश्वास, नेहा त्याला बघतच राहिली!
तेवढ्यातचं नेहाच्या काकाचा मुलगा म्हणजे तिचा भाऊ तिला घ्यायला आला. त्यामुळे नेहाने लवकर तिच्या भावाकडे धाव घेतली. सोबत नेहाची मैत्रीण सायली सुद्धा होती. ती नेहाच्या घराजवळ असल्यामुळे दोघींनाही नेहाचा भाऊ सोबत कॉलेजमध्ये सोडायचा आणि घ्यायलाही यायचा.
नेहा आणि नेहाची मैत्रीण सायली दोघी गाडीत बसतात. त्याचबरोबर नेहाचा भाऊ गाडी सुरू करणारच तितक्यातच त्या अनोळखी मुलाचा आवाज आला. " दादा मला पण घ्या गाडीत " तो नेहाच्या दादाच्या ओळखीचा होता.
तो मुलगा समोरच्या सीटवर बसला पण अधून मधून नेहाला बघत होता. नेहाला काहीही कळतं नव्हते. त्याने दादाला म्हटले, "मी गाडी चालवू काय? दादा"
नेहाच्या दादानेही होकार दिला.
नेहाच्या दादानेही होकार दिला.
गाडी सुरू झाली पण सोसाट्याचा वारा, वावटळ, आणि पाऊस यायला सुरुवात झाली.
त्यात त्याने गाडीमध्ये गाणे लावले. गाणं खूप सुंदर होत. त्यात तो मुलगा गाडी चालवत असतांना आरश्यातून नेहाला बघतं होता.
नेहाला खूप भीती वाटत होती. मनात काहीतरी वेगळच होत होतं! पहिल्यांदा कोणीतरी इतक्या प्रेमाने बघत आहे. त्यात गाण्याचे सूर कानावर पडत होते!
"आज मौसम, बडा बेईमान हैं
आज मौसम, आने वाला कोई
मेहमान हैं कोई, बेईमान है,
आज मौसम "
हे गाणे ऐकून काही वेगळचं नेहाच्या मनात होत होतं. लवकरच घर आलं. आणि गाडी घरासमोर थांबली.
नेहाची मैत्रीण सायली गाडीतून उतरली. आणि "नेहा मी जाते घरी." असं इशाऱ्यात सांगून सायली निघून गेली.
नेहा मात्र शांत उभी होती. त्या मुलाने पटकन दादांची नजर चुकवत नेहाच्या हातात एक चिठ्ठी दिली.
तो अनोळखी मुलगा नेहाला म्हणतो " ही चिठ्ठी सायलीला देशील प्लीज!"
मी खूप प्रेम करतो सायलीवर!
त्या मुलाचे हे शब्द ऐकून नेहा त्या मुलाच्या डोळ्यात बघतच रहाते. त्या संध्याकाळी नेहाच्या मनातून या ओळी निघतात...
" ज्या नजरेने मनात वादळ घातलं
त्या नजरेला दुसरं कोणीतरी हवं होतं,
त्या नजरेत हरवलेले, हळवे क्षण
ती संध्याकाळ गोंधळलेली,
गोंधळलेले हळवे मन! "
चैताली वरघट
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा