बाईची गोष्ट (भाग पहिला )
विषय: खेळ कुणाला दैवाचा कळला
आज कॉलेजचा शेवटचा दिवस.परीक्षा नुकत्याच आटोपलेला. मेसचाही शेवटचा दिवस. उद्या पासून त्याचं सगळं विद्यार्थी जीवन संपणार होतं. त्या नंतर सगळे जण ईकडे तिकडे पांगून जातील. रिझल्ट लागल्यानंतर लगेच खेडेगावात इंटर्नशिप सुरू होणार. मेडिकलचा अभ्यास करता करता साडेचार वर्षे कशी संपून गेली समजलच नव्हतं. एक क्षणही रिकामा नव्हता की कंटाळवाणा नव्हता.
त्याच्या कॉलेजमधल्या मित्रांनी हा दिवस जोरदार सेलेब्रेट करायचं ठरवलेलं होतं. कॉलेजधल्या मित्रांनी सेंड ऑफ सारखा विविध गुण दाखवणारा कार्यक्रम, जेवणं वगैरे ठेवलेलं होतं .
तसा तो स्वभावानं एकलकोंडा. जास्त कोणात न मिसळणारा. आपण भले की आपला अभ्यास भला अशा स्वभावाचा. जास्त न बोलणारा. पण या नंतर आयुष्यात कोणाची परत केंव्हा भेट होईल सांगता येतं नाही. म्हणून कोणाला नकार देणंही त्याला जमेना.
मेडिकलला एडमिशन मिळाली होती. तेंव्हाच घरच्यांच्या डोळयात कितीतरी स्वप्न दिसायला लागली होती. सेवा, त्याग वगैरे शब्दांबरोबर अद्यावत क्लीनिक, पैसा, गाडी, बंगला अशीही स्वप्न खुणावत होती.अभ्यासाची ही साडेचार वर्षे कसल्या धावपळीत संपली होती. कळलंच नव्हतं. अभ्यासाची एक नशाच चढली होती.
एडमिशन मिळाल्या पासून जगण्याला एक झपाटले पण आलेलं होतं.
एडमिशन मिळाल्या पासून जगण्याला एक झपाटले पण आलेलं होतं.
व्यवस्थीत अभ्यास व्हावा म्हणून त्याने हॉस्टेल मधे रुम न घेता गावात रुम घेतली होती. गावात त्याचा अभय नावाचा एकच मित्रं होता . तो मेडिकलचा विद्यार्थी नव्हता. मेकॅनिकल इंजिनियरींग करणारा आणि याच्या स्वभावाच्या पूर्ण विरुध्द स्वभाव असलेला अभय त्याचा जवळचा मित्र होता.
अभय अतीशय हुशार, पण सगळ्या गोष्टींचं व्यवस्थीत प्लॅनिंग करून जगणारा. आयुष्याचा पुरेपूर उपभोग घेणारा आणि प्रत्येक क्षण आनंदात घालवण्याचा प्रयत्न करणारा. अभ्यास सांभाळून अभय कॉलेजचं जीवन पूरेपूर उपभोगायचा. ज्यात मैत्रीणी होत्या. सिगारेट, ड्रिंक्स वगैरे गोष्टी होत्या. पण तो ते क्षण पुरेपूर एन्जॉय करायचा. शिवाय त्याच्या कडे टू व्हीलर गाडी पणं होती. त्याच्या जगण्यात एक कलंदरपणा , रांगडेपणा आणि बेदरकार वृत्ती होती. त्यामूळे त्याचं सगळ्यांनाच एक वेगळचं आकर्षण होतं.
त्यालाही तसं जगणं मनापासुन आवडायचं. खरं सांगायचं म्हणजे ईच्छा असूनही , मेडिकलचा अभ्यासचं ईतका प्रचंड होता की त्याच्या जवळ अभ्यास करण्या व्यतिरिक्त कोणत्याही गोष्टी करण्यासाठी वेळच नव्हता.
पण जेंव्हा कधी ते एकमेकांना भेटत असतं त्या वेळी त्या दोघांच्या एकमेकांत चर्चा होतं. त्या वेळी ते एकमेकांची मैत्री अबाधित ठेवण्याचं वचन देत.
दोघं जेंव्हा भेटायचे तेंव्हा विरुध्द विषयांच्या गप्पा व्हायच्या. पण ते एकमेकांची मत एकदुसऱ्यावर कधीचं लादत नसतं. त्यामुळे त्यांची मैत्री अबाधित राहिलेली होती.
" तर मित्रा अभय, आजचा आपला शेवटचा दिवस. चला खूप छान काळ गेला तुझ्या सहवासात. कधीतरी पुन्हा भेटू. " त्याने त्यांचा भावविवश होऊन निरोप घेतला.
अभय तोंडातल्या सिगारेटच्या धुराची हवेत वलय काढतं म्हणाला,
" ओ, स्कॉलर डॉक्टर साहेब, ईतका कोरडा कोरडा निरोप काय घेता. कूछ प्रोग्राम करके बिदाई लेंगे." अभयने प्रस्ताव ठेवला.
" मित्रा , मला तुझ्या सदिच्छा कळतात. पण मलाही घरी जायची ओढ लागली आहे. बरेच दिवस झाले गावी गेलेलो नाही. "
" बरोबर आहे. आम्ही काय, फालतू माणसं. तूम्ही काय, एकदम हाय क्लास सोसायटी मधे वावरणार आता " अभय मुद्दाम उपहासाने म्हणाला.
" तस काही नाही अभय. ठीक आहे. करू या आपण प्रोग्रॅम. मग तर झालं " तो असं म्हणताच अभय खूष झाला.
पण अभयने त्याच्या साठी जो अफलातून प्रोग्राम ठेवलेला होता तो त्याच्या कल्पने पलीकडील होता. ज्याची त्याने स्वप्नातही कल्पना केलेली नव्हती.
( क्रमशः)
लेखक : दत्ता जोशी
लेखक : दत्ता जोशी
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा