Login

तिचं जग ( शिल्पा सुतार)... भाग 4 अंतिम

मीना खुश होती , काहीतरी करायच ठरवल होत तिने, आता ती मागे वळून बघणार नव्हती. या वेळी तिला घरच्यांचा सपोर्ट होता


तिचं जग ( शिल्पा सुतार)... भाग 4 अंतिम
.......

मुलं संध्याकाळी घरी आले, घरात जोरजोरात हसण्याचा आवाज येत होता, कोण आहे दोघांनी आत मध्ये येऊन बघितलं,

"अरे अक्षय पूजा इकडे या, ही सोनल मावशी आहे माझी शाळेतली बेस्ट फ्रेंड",.. दोघेजण सोनल कडे बघत होते. छान आहे मावशी.

दिनेश आले ऑफिस हून, थोड्या वेळाने जेवण झाल,

" छान झाला स्वयंपाक" ,.. सोनलचे मिस्टर.

" हो खूप हुशार आहे मीना, लाडु किती छान झाले होते काल केलेले ",.. सोनल

" अरे कुठे आहेत लाडू, दे सगळ्यांना ",.. दिनेश.

आणते,

मुल नीट जेवत होते, सोनलच्या मुलांमध्ये रमले होते ते.

"मुलं मोठे झाले ग तुझे",.. सोनल.

" हो आणि हुशारही आहेत",.. मीना.

"तुझ्यापेक्षा पण जास्त हुशार आहेत का ",.. सोनल.

असं सोनल म्हणतात अक्षय आणि पूजा मीनाकडे बघत होते.

" अरे असे आश्चर्याने काय बघतात, तुमची आई शाळेची टॉपर होती, काहीही प्रॉब्लेम असला की तिच्याकडे घेऊन जा पाच मिनिटात सोडवायची ती, मीना तू पुढे जॉब का नाही केला\",..

"अग केला दहा वर्ष जॉब, नंतर नाही जमलं, त्यात दुसऱ्या शहरात बदली झाली, नाही होत होतं दोघ मुलांचा आणि दिनेशही चांगल्या पोस्टला आहेत आता काही गरज नाही",.. मीना.

"आता आहे चान्स कर जॉब",.. सोनल.

हो

"चला आपण कार्यक्रमाचे फोटो आणि व्हिडिओ बघू टीव्हीवर",.. अक्षय.

सगळ्यांना उत्सुकता होती तिकडे काय कार्यक्रम होता, अक्षयने टीव्हीवर मोबाईल अटॅच केला, सगळे फोटो टीव्हीवर दिसत होते, मीना आणि सोनल सगळ्यांना माहिती देत होत्या, या आमच्या टीचर मैत्रिणींचे मित्रांचे नाव सांगत होते

अचानक सत्कार सोहळा सुरू झाला, पहिलाच नाव मीनाचे पुकारलं, तिच्याबद्दल शाळेचे सर जे बोलत होते ते सगळे ऐकत होते.

आपली आई एवढी फेमस हुशार होती बापरे, पूर्वी पण तिने दहा वर्ष नोकरी केली, आताच एवढ्यात ती घरी आहे आणि आपण तिला एकदमच काही समजत नाही असं करतो, पूजा आणि अक्षय जरा खजील झाले होते,

दिनेशला माहिती होतं की मीना हुशार आहे पण तेही आता ती घरीच असल्यामुळे विसरले होते.

आज परत सगळ्यांना आठवण झाली.

सोनल तिची खूपच तारीफ करत होती, सगळ्यांना तिच्या लहानपणीच्या गोष्टी सांगत होती, कसे बक्षीस मिळवत होती मीना, कशी पहिली आली होती, कुठे कुठे सत्कार झाले होते सगळंच सांगत होती.

पूजा उठून मीनाच्या गळ्यात हात घालून बसली,.. "मम्मा प्राऊड ऑफ यु मला माहिती नव्हतं लव यू",

दिनेशही अगदीच अभिमानाने मीनाकडे बघत होते,

सासूबाईंच्या डोळ्यात तर प्रेम दिसत होतं,

अक्षय ही आईकडे बघत होता,

जरा वेळाने पाहुणे गेले, चौघ टाळ्या वाजवत होते मीनासाठी,

ती एकदम भारावून गेली,.. "काहीही काय चला झोपा मुलांनो उद्या जायच ना लवकर, आटपु द्या मला काम आहेत खूप",

"मम्मी इथे बस आमच्याशी बोल, तू का नाही सांगितलं तुझ्याबद्दल आम्हाला" ,.. अक्षय.

"काय सांगायचं त्यात की मी हुशार आहे",.. मीना.

" हुशार लोकांना हुशारच म्हणणार ना",.. अक्षय.

" अजून एक बातमी आहे आमच्या वर्गातल्या मुलाचे क्लासेस आहेत इंजीनियरिंग मेडिकलचे तो मला म्हणतो जॉईन हो टीचर म्हणून ",... मीना.

" मम्मी तू करायला पाहिजे हे काम",.. पूजा.

" हो आई तू कर हे काम, कुठला विषय शिकवशील तू",.. अक्षय.

" कुठलाही असू दे काही प्रॉब्लेम नाही ",.. मीना.

" अरे हो आम्ही विसरलोच होतो तू जीनियस आहे ",..अक्षय.

मीना हसत होती,

आता ती सासूबाईं जाऊन बसली,.." आई तुम्ही काल बोलत होत्या ना काही तरी कर आज मिळाल मला काम, दुपारी चार पाच तास मी क्लासला जाईल, संध्याकाळी सहा वाजता वापस येईल",

" किती छान कर तू काम स्वतःला वेळ दे मुल काही लहान नाही आता, पड जरा बाहेर ",.. सासुबाई.

सगळेच खुश होते,

मीना रात्री रूम मधे आली, दिनेश पुस्तक वाचत होते, मीनाकडे ते कौतुकाने बघत होते, मीना जवळ येवून बसली ,.." अहो उद्या जावून बघते मी क्लासला, काय शिकवू उद्या",

"तू ठरव तुला जो विषय आवडतो तो घे",.. दिनेश.

"सांगा ना प्लीज मला सुचत नाही काही",.. मीना.

"चांगलीच हुशार आहेस की तू, रागवलीस का माझ्या वर",.. दिनेश.

" नाही काय केल तुम्ही?",.. मीना.

" मी ते तुला नेहमी बोलत असतो",.. दिनेश.

"तस काही नाही, मी पण बोलते की तुम्हाला",.. दोघ हसत होते.

"तू आहेच खूप हुशार, कर छान काम ",.. दिनेश.

" माझा ही बराच गॅप पडला मध्ये, पण हा आपला दोघांचा निर्णय होता की मी घरात लक्ष देते, मुलांकडे बघते, मला काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही मनात काही आणु नका, आता करेन मी कोप अप तुमच्या सगळ्यां सोबत ",.. मीना.

" नाही केल तरी काही हरकत नाही तू जशी आहेस तशी रहा, तू तुझ्या जगात चॅम्प होतीच आता आमच्याही जगात चॅम्प आहेस, हॅट्स ऑफ तुला ",.. दिनेश.

मीना खुश होती , काहीतरी करायच ठरवल होत तिने, आता ती मागे वळून बघणार नव्हती. या वेळी तिला घरच्यांचा सपोर्ट होता.

घरच्या स्त्रीला प्रेम द्या, थोडा सम्मान द्या, घरच्यांचा आधार सपोर्ट मिळाला तर ती खूप काही करू शकते. ती खुश तर घर खुश.