तिचं कर्तव्य आहे ते - भाग एक ( कर्तव्य कि हक्क)
"आई, तू इतकं सगळं करतेस… तुला कधी कंटाळा येत नाही का?"
सौम्याची सात वर्षांची लेक आर्या तिच्या स्कर्टचा पट्टा नीट करत विचारत होती.
काय उत्तर द्यावं, हे सौम्याला सुचत नव्हतं. तिच्या डोळ्यासमोर सकाळच्या कामांची लांबलचक यादी नाचत होती.
सकाळचे सात वाजले होते, आणि घरात सगळीकडे धावपळ सुरु होती. गॅसवर दूध उकळत होतं, सासूबाईंच्या गोळ्यांची वेळ झाली होती, नवऱ्याचं टिफिन अजून भरायचं होतं, आर्याची शाळेची तयारी बाकी होती, आणि सासऱ्यांचा चहा-पेपर नेऊन ठेवायचा होता.
त्यातच तिच्या मोबाईलवर ऑफिसच्या मेल्सची सतत टिंग-टिंग…वाजत होती
सौम्या रोजच सकाळपासून धावतच असायची—ऑफिस, घर, मुलीचा शाळेचा डबा, सासूंच्या गोळ्या, स्वयंपाक… ह्यात स्वतःसाठी निवांत बसून एक कप चहा घेणं, हा तर जणू तिच्या नशिबातच नव्हतं.
"आई, सांग ना ग… थकत नाहीस का तू? तुझा चहा तर तू प्यायच्या आधीच थंड होतो!"
आर्या परत परत विचारत होती.
पण ह्यावर सौम्या काही बोलली नाही. ती शांतपणे फक्त तिच्या केसांची वेणी घालत राहिली.
तिकडे जपमाळ मोजणाऱ्या सासूबाईंचा पारा चढत चालला होता. त्यांनी मध्येच टोमणा मारला,
"आर्या, काही वेगळं नाही करत तुझी आई… आम्ही तर ह्याच्यापेक्षा जास्त कामं केली आहेत.
सून म्हणून हे सगळं करणं, हिचं कर्तव्य आहे
ते ऐकून सौम्याने एक सुस्कारा सोडला... सासूबाईंना तिच्या कामाचं कौतुक तर अजिबातच नव्हतं पण त्या सतत काय एवढं वेगळं करते, आमची कामे करणे म्हणजे तिचं कर्तव्यच आहे असच म्हणत राहायच्या.
तिची सासूबाई सुनंदा काकू, तिचं लग्न झाल्यापासून तशीच होती. थोडी तापट, थोडी सत्तेची हौशी. घरातली कामे सगळी सौम्याने करायची...घरातली सर्व कामं सौम्याच्या खांद्यावर, पण भाजी कोणती करायची, घरात काय आणायचं, किंवा कधी बाहेर जायचं. या सगळ्याचा निर्णय तिच्या हातात नव्हता.
सुनंदा काकू म्हणतील तेच… आणि तसंच झालं पाहिजे. नाहीतर घरात तुफान वादळ यायचं.
"हे सगळं करणे तुझं कर्तव्य आहे गं!
आम्ही सूनबाई म्हणूनच आणलंय तुला! तू काही माझी मुलगी नाहीस"
आम्ही सूनबाई म्हणूनच आणलंय तुला! तू काही माझी मुलगी नाहीस"
त्या हा डायलॉग तिला दिवसातून दोनदा तरी ऐकवायच्या.
हे शब्द सौम्याला रोज टोचायचे, पण ती गप्प राहायची.
कारण, हे तिचं स्वतःचं घर आहे असा समज ठेवून ती ते सगळं निभावत होती.
पण तिच्या मनाच्या एका कोपऱ्यात ती खूप दुःखी व्हायची....
कारण, हे तिचं स्वतःचं घर आहे असा समज ठेवून ती ते सगळं निभावत होती.
पण तिच्या मनाच्या एका कोपऱ्यात ती खूप दुःखी व्हायची....
सासूबाई तिला तिच्या मनासारखा घरातील परदा सुद्धा बदलून द्यायच्या नाहीत.. तिला नेहमी प्रश्न पडायचा...
“मी इथे फक्त कर्तव्य निभावण्यासाठी आहे का… की मला इथे काही हक्कही आहेत?”
सौम्याच आयुष्य असच चालत राहील कि काही बदल होईल???
क्रमश
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा