तिचं कर्तव्य आहे ते - भाग चार( कर्तव्य कि हक्क)
मागील भागात आपण पाहिलं कि, सागर त्याच्या आईला समजावतोय, पण त्या ऐकत नाहीत.
"आई, मदतनीस ठेवेन ना. दोन दिवस सांभाळतील ते."
"मदतनीस? मला ते अजिबात आवडणार नाही!"
सुनंदा काकू ठामपणे म्हणाल्या.
"तू नकार दे. लोक काय म्हणतील? माझी मुलगी आलीय, आणि सून बाहेर मजा करते!"
सौम्याचा चेहरा उतरला. ती काही बोलणार इतक्यात सागरने तिच्याकडे पाहत नजरेतून आश्वासन दिलं, पण त्यालाही आईचा हा हट्ट माहीत होता… समजावणं सोपं नव्हतं.
त्याच दिवशी संध्याकाळीच ताई, म्हणजे सागरची बहीण, नेहा, आली.
हातात मोठी बॅग आणि ओठांवर हसू होत तिच्या, तर सुनंदा बाईंच्या डोळ्यांत लेकीसाठी माया उतरली होती.
हातात मोठी बॅग आणि ओठांवर हसू होत तिच्या, तर सुनंदा बाईंच्या डोळ्यांत लेकीसाठी माया उतरली होती.
"आई, बघ मी तुझ्यासाठी खास ही शाल आणलीय!"
नेहाने बॅग उघडताच सुनंदा काकूंचा चेहरा आनंदाने उजळला..
"अगं, तू आलीस म्हणजे घरचं वातावरणच बदलून जातं,"
त्या प्रेमाने म्हणाल्या.
सौम्याने तिचं हसून स्वागत करत केल , पण मनात मात्र सकाळची गोष्ट होतीच. नेहाने देखील औपचारिक चौकशी केली,
"सौम्या वहिनी, काम खूप आहे का? आईचं सगळं सांभाळणं, मुलगी, ऑफिस…"
"हो, जमवते सगळं,"
सौम्या शांतपणे म्हणाली
"त्यात काय एवढं मोठ करते कि, सगळ्याच बायका करतात कि... तिचं कर्तव्यच आहे ते...."
सासूबाई मध्ये बोलल्याच आणि सौम्याला परत वाईट वाटलं.
काही वेळ गप्पा झाल्या, जेवण झालं. मग नेहा थोडी आईच्या खोलीत आजूबाजूचा कानोसा घेत गेली. तिने दरवाजा अर्धवट बंद केला.
"आई, मी आलेय एक कामासाठी…"
तिचा आवाज एकदम हळू होता.
सुनंदा काकू कुतूहलाने विचारलं,
"कसलं काम?"
नेहाने परत इकडे तिकडे पाहिलं हसली,
"आई, ती गावाकडची अडगळीची जमीन आठवते ना? ती तू सागरला विकायला सांग. मला आत्ता पैशांची थोडी टंचाई आहे. किंवा तू जर सौम्या वहिनीच्या नावावरचं कागदपत्र माझ्या नावावर करून घेतलंस तर… मी पैसे घेऊ शकते."
सुनंदा काकू क्षणभर विचारात पडल्या, मग म्हणाल्या,
"हं… पाहूया. पण सागरशी बोलावं लागेल."
नेहा पटकन म्हणाली,
तू आजच सागरला सांगितलं तर मी आहे तोपर्यंत ह्याचा निकाल लावेल. त्याला नसेल जमत तर वाहिनीच्या नावावरची माझ्या नावावर करायला सांग, तशीही ती जागा थोडीना तिची माहेरची आहे. "
बाहेर हॉलमध्ये बसलेली सौम्या ही चर्चा अर्धी-अधुरी ऐकत होती…
तिला कळून चुकलं, नेहा कश्यासाठी आले. ती जमीन घ्यायला तिने सागरला तेव्हा तिचं सगळं स्त्रीधन दिल होत आणि हळू हळू तिनेच ते सोडवलं होत.ती जमीन? ती तिच्या कष्टाची होती. तिचा अधिकार, तिचं श्रमफळ. त्या जमिनीवर फक्त तिचाच हक्क होता. तिचे इतर हक्क डावळले, तसा हा पण डावळला जाईल का???
तिला कळून चुकलं, नेहा कश्यासाठी आले. ती जमीन घ्यायला तिने सागरला तेव्हा तिचं सगळं स्त्रीधन दिल होत आणि हळू हळू तिनेच ते सोडवलं होत.ती जमीन? ती तिच्या कष्टाची होती. तिचा अधिकार, तिचं श्रमफळ. त्या जमिनीवर फक्त तिचाच हक्क होता. तिचे इतर हक्क डावळले, तसा हा पण डावळला जाईल का???