Login

तिचं माहेर संपेल भाग १

तिचं माहेर संपेल भाग १
मीनाक्षी तिच्या माहेरी गेली होती. तिच्या चुलत भावाच लग्न होत. तिच्या सोबत तिचा नवरा प्रसाद आणि त्यांचा छोटा मुलगा राघव नुकतेच नागपुरहुन परत येत होते. रात्रभर ट्रेन चा प्रवास. त्यानंतर पुण्याला आल्यावर रेल्वे स्टेशन पासून घरा पर्यंतचा दोन तासाचा प्रवास याने तिच अंग चिंबून गेल होत. त्यात घरी येताना वाटेत मेट्रोच काम सुरू असल्याने ट्रॅफिक जास्त होत.

ती नुकतीच घरी आली होती. राघव तर मिनाक्षीच्या खांद्यावर झोपला होता. तिने त्याला आत बेडरूम मध्ये नेऊन झोपवल. तो पर्यंत प्रसाद ने सगळ सामान बेडरूम मध्ये आणून नेउन ठेवले. मीनाक्षी पाणी प्यायला किचन मध्ये गेली होती.

इतक्यात तिच्या सासु बाई साधनाबाई आल्या. सुनेला अलेल बघुन त्यांना खुप हायस वाटलं. आठ दिवस ते तिघ घरात नव्हते तर सगळी काम त्यांना करावी लागली होती. प्रसादच लग्न झाल्यापासून त्यांनी तर आपल किचन मधल काम करण्यापासुन स्वतः दूरच ठेवलं होत.

तिला पाणी पिताना बघुन, त्या तिला म्हणाल्या,

" मीनाक्षी अग जरा चहा कर ग. डोकं जाम दुखत आहे."

" आई, काय हो, काय झालं ? " तिने काळजीने विचारलं.

" अग काही नाही ग, ते दोन दिवस पासून जरा खाण्यात बदल झाला ना. आ..आई ग." त्या कळवळून म्हणल्या.

" आई बसा बघु इथ. मी तुमच्या साठी चहा बनवते." दमुन, थकून आलेली मीनाक्षी म्हणली.

ती चहा करण्यासाठी कीचन मध्ये गेली, आणि किचन मधील पसारा बघून तिला चक्कर आली होती. ती चार दिवस माहेरी काय गेली. किचन मध्ये जसा काही भूकंप आला होता. अस किचन केलं होतं. ओटा पसरलेला.

सिंक मध्ये भांड्यांचा ढीग पडलेला होता. गॅस वर कढई तशीच उघडी पडली होती. चहाची भांडी तशीच ठेवली होती. डबे काढून बाजूच्या टेबलवर मांडून ठेवले होते. पार्सल मागवल होत तर त्यांची रिकामी भांडी, डबे, कागद, पिशव्या तशाच ठेवल्या होत्या. चार दिवसांत किचन कोणी आवरलं नव्हत.

तिने दयनीय होऊन किचन कडे बघितल. इतक्यात सासू बाईनचा फोन वाजला. आकांशा ताईंचा होता. आई तिच्याशी हसुन बोलतं होत्या. तेव्हा त्यांना कसलाही त्रास होत नव्हता. मीनाक्षी ने साधना बाईंकडे बघुन नकार अर्थी मान हलवली.

समोरचा पसारा बघून तर तिची झोप केव्हाच उडाली होती. साधा एक कप चहा करायचा म्हणल तरी देखील आधी भांड घासून स्वच्छ करुन घेण्या शिवाय कोणताही पर्याय नव्हता तीच्याकडे.

तिने एक सुस्कारा सोडला. इतक्यात प्रसाद पण तिला बघायला किचन मधे आला. सोफ्यावर बसुन आई फोन वर बोलत होती. त्याने आई कडे हसुन बघितल. पण आई फोन वर बोलण्यात व्यस्त होती. हे बघुन तो किचन मध्ये गेला. त्याला देखील थोडा चहा प्यायला हवा होता.

ऑफीस मध्ये तर जावच लागणारं होत. पण त्यासाठी त्याने उशीरा ऑफीस मध्ये जायचं ठरवलं होतं. प्रसाद तसा मेल त्याने मोबाइल फोन वरून केला. त्याचं काम झाल्यावर तो किचन मध्ये आला. समोरचा पसारा बघुन त्याचीही तिच प्रतिक्रिया होती. जी मीनाक्षीची होती.

" मीनू , अग हे काय आहे. घरात भूकंप वगेरे आला आहे का?" मीनाक्षी ने त्याच्या कडे रागावून बघितलं.

' आपण तिघ जर घराच्या बाहेर होतों. तर या भूकंपाचान केंद्र बिंदू तुला नव्याने सांगायला हवा आहे का ?' असच काहीसं म्हणणं होत त्या रागीट नजरेच.

" ओह, सॉरी. मी तुला मदत करतो." तिच्या रागाला जास्त वाढू न देता त्याने समजुतीचा सूर लावला.

" तुम्ही जाऊन आराम करा. तुम्हाला ऑफिस मध्ये जायचं आहे. मी आवरते." मीनाक्षी म्हणाली.

प्रसाद तिला कामात मदत करेल. पण त्याला आता विश्रांतीची गरज होती. आठ दिवसांची सुट्टी. आज ऑफिस मध्ये गेल्यावर खुप काम असेल. तर आराम नाही करता येणारं. आता थोडा वेळ आराम करू दे. मीनाक्षी ने त्याला विचार करून अडवल. ती काय! दुपारी पण विश्रांती घेऊ शकते.

" अग पण हे सगळं काम"

" तुम्ही आराम करा. माझं थोड आवरून झालं की मी तुम्हाला बोलावते. चहा प्यायला."

" मी देऊ चहा करून ?"

" चहा करण्यासाठीं देखील आधी भांड घासून स्वच्छ करुन घ्यावं लागेल." तिने सिंक मध्ये भांड्यांचा ढीग कडे इशारा केला.

प्रसाद ला तिने शेवटी आराम करायला पाठवलच. थोडा वेळ प्रसाद झोपला होता. राघव ला कुशीत घेउन त्याला लगेचच झोप लागली.


🎭 Series Post

View all