प्रसाद ला तिने शेवटी आराम करायला पाठवलच. थोडा वेळ प्रसाद झोपला होता. राघव ला कुशीत घेउन त्याला लगेचच झोप लागली.
किती वेळ झाला माहित नाही. झोपल्या मुळे त्याचा थकवा थोडा कमी झाला होता. त्याला जाग आली. त्याने राघवच्या बाजुला दोन उशा ठेवल्या. फ्रेश होवून तो बाहेर आला. तरी देखील आई अजून फोन वर बोलतं होती. त्याला तिच्या बोलण्याने समजल होत , फोन नक्की ताई आणि छोटी बहीण यांचा असेल.
मुलींचा फोन आला की आईला काय होत माहीत नाही तास तास भर ती फोन मध्ये बिझी असते. त्याने किचन मध्ये जाऊन बघितल तर मिनाक्षी ने किचन मधला पसारा आवरला होता. डबे जागेवर ठेवून दिले होते.
पार्सल चे डबे, रॅपिंग पेपर, पिशव्या कचऱ्याच्या डब्यात टाकल्या होत्या. सिंक मधली आता गरजेची भांडी घासून घेतली होती. बाकीची भांडी वेगळी करून कामवाली बाई साठी बाजुला ठेवून दिली होती. किचनला लागून ड्राय बाल्कनी मध्ये भांडी घासण्यासाठी वेगळा किचन टॉप बनवला होता.
" मीनाक्षी अग चहा देते ना?"
प्रसाद तिला काही विचारणार त्या आधीच साधना बाईंची हाक ऐकू आली.
" हो ss आई आणते." मीनाक्षी ने हातातल काम करत उत्तर दिलं.
तिने पटा पट हात चालवत चहा बनवला. डब्यातून बिस्कीट काढून डिश मध्ये ठेवली. चहा आणि बिस्कीट घेऊन ती बाहेर हॉल मध्ये आली.
साधना ताईंना आता फ्रेश वाटतं. त्या आनंदी दिसत होत्या. चहा पित असताना प्रसाद देखील त्यांना जॉईन झाला. थोडा चहा पोटात गेल्यावर साधना ताईं म्हणल्या,
" मीनाक्षी अग आकांशाचा फोन आला होता. ती दुपारी येतं आहे. ती येणार म्हणून मी सायलीला फोन केला. तर ती पण येते म्हणाली. तर तु ना आज तिच्या आवडीचा बेत कर. मी सामान ऑर्डर केलं आहे." त्या आनंदून म्हणाल्या.
मीनाक्षी च्या तर पोटात गोळा आला होता. आधी रात्र भरचा प्रवास, त्यातून घरी आल्यावर तो किचन मधला पसारा. तो पसारा अवरण्यात तिचा दिड तास गेला होता. आता कुठं जरा निवांत झाली होती, की सासू बाई नी फरमान काढल. नणंदा येत आहेत.त्यांच्या साठी काहीतरी खास बेत कर. तिला काही विचारण्या आधी स्वतः च्या मनाने सामान पण ऑर्डर केल.
" काय ताई आणि सायु येत आहेत. अग पण आज आता अचानक.?." प्रसाद ने चहाचा कप टी पॉय वर ठेवत आईला विचारल.
" अरे तुला भेटायला येत आहेत. तू इतक्या दिवसांनी परत आलानस ना" आई कौतुकाने म्हणाली.
" काय रे काय गरज आहे इतक्या लांब नागपुरात जाऊन लग्न करायची."
" अग आई आता नचिकेत दादाची ट्रान्स्फर नागपुराला झाली आहे. तर ते सगळे आता नागपुर मध्ये शिफ्ट झाले आहेत ना.! मुलीकडची मंडळी पण नागपूरची होती. मग सगळ्यांच्या सोयीचं झालं." प्रसाद ने मीनाक्षी च्या आई वडीलांची साईड घेतली. ते बघुन साधना बाईंच डोकं सटकल.
" मला जर आधी माहिती असत. त्यांना लग्न करण्यासाठी इतक्या लांब जायचं होत. तर मी कधीच नसत त्यांना होकार दिला असता. तुला लग्नाला पाठवण्याचा."
त्यावर प्रसाद ने नकार अर्थी मान हलवली.
' आईला समजावण अवघड आहे.'
' आईला समजावण अवघड आहे.'
" मीनाक्षी चहा पिऊन झाला ना मग काहीतरी खायला बनव. फ्रिज मध्ये डोश्याच् पीठ आहे. मस्त पैकी डोसे घाल. खोबर आहे बघ फ्रिज मधे. तर थोडी कोथिंबीर घालून चटणी कर.
थोडी बटाट्याची भाजी पण कर. प्रसाद ला डोश्या सोबत उकडलेल्या बटाट्याची भाजी आवडते. मला बाई चटणी पण हवी." साधना बाईंनी ऑर्डर केली.
" आई तुला डोसा खायचा आहे. तर मी ऑर्डर करतो. तिला कशाला सांगते करायला. अग आताच आम्ही इतका लांबचा प्रवास करून आलो आहोत."
" काय रे कौतुक सांगतो. आम्ही काय प्रवास केला नाही का याआधी. मी तर तुम्हा तिघांना घेऊन प्रवास केला आहे. तुम्ही तर एक्स्प्रेस ट्रेन ने आला आहात. मी तर ट्रेन ने जात नंतर एसटी ने गावी जात." आईने स्वतः च कौतुक केलं.
" आई अग पण ताई आता कशा काय येत आहेत. जाण्या आधी तर भेटल्या होत्या मला." प्रसाद ने मूळ विषय काढला.
" अस काय विचारतो तू. अरे मुलांच्या परीक्षा होत्या ना. आता त्या तिघांना सुट्टी आहे. तर सात आठ दिवस राहायला येणार आहेत. तर मी सायलीला पण फोन केला. तर ती पण तिच्या मुलीला घेउन येते म्हणाली."
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा