" मीनाक्षी बघत काय बसली आहेस. जा जरा किचन मध्ये जाऊन काम कर. आधी नाष्टा करून दे. मग पनिरची भाजी बनव.त्याच्या सोबत पुलाव कर. आणि पराठे पण कर. करून नको ठेवू. फक्त पीठ मळून ठेव. पोरींना आल्यावर गरन गरम करून घाल."
" आई अग ती थकली आहे. तिला कशाला करायला सांगते. मी सगळ जेवण ऑर्डर करतो." प्रसाद म्हणाला.
" तू पोरींना बाहेरच जेवू घालणार. तूझ्या बायकोला काय त्रास झाला का? पोरींच्यासाठी दोन वेळा ताजा स्वयंपाक करायला ?" आईने जरा चढ्या आवाजात विचारलं.
" आई मी पण दमलो आहे. तशीच ती पण दमली आहे. मी तूझ्या म्हणण्या प्रमाणे जेवण ऑर्डर करतो ना. अगदी गरमा गरम जेवण येऊन." प्रसाद ने समजावण्याचा प्रयत्न केला.
" बायकोची काळजी आहे फक्त. स्वतः च्या बहिणी तुला भेटायला येत आहेत. तर त्याचं प्रेम नाही दिसत तुला. तुला फक्तं तुझी बायको दिसते. बाकी कोणीच नाही. आम्ही काय केलं नाही का काम."
" हे बघ प्रसाद, तु तुझ्या बायकोला सांग सगळा स्वयंपाक करायला. मला बाकी काही माहीत नाही. आठ दिवस नव्हता तुम्ही इथ. तेव्हा या दोघींनी माझी काळजी घेतली आहे." त्या ठसक्यात म्हणाल्या.
" आई अस का म्हणत आहेस. तू पण आम्हा भावंडांना घेउन प्रवास केला. मी नाकारत नाही आहे. पण इतक्या दूरचा प्रवास नव्हता तो."
" पण प्रवास तर होता ना ? त्यावेळी मला कोणी केली मदत.? नाही ना.
प्रवासाच काय कौतुक करत आहेस. चांगला एसी कोच मधून प्रवास करुन आली आहे.
थोड ना बस मध्ये धक्के खात आली आहे. ते मला काही सांगु नकोस माझ्या मुली बाहेरच आलेल जेवण जेवणार नाही. हे तुला सांगुन ठेवते."
" आई अग राघव ने खूप त्रास दिला आहे. सारखी चिडचिड होत होती. त्याला सांभाळून आम्ही कसा प्रवास केला तो आम्हाला माहिती." त्याने आईला समजावण्याचा प्रयत्न केला.
" आई अग राघव ने खूप त्रास दिला आहे. सारखी चिडचिड होत होती. त्याला सांभाळून आम्ही कसा प्रवास केला तो आम्हाला माहिती." त्याने आईला समजावण्याचा प्रयत्न केला.
" अरे राघव काय केलं त्याने. त्याला तर खिडकितून बाहेर बघण्यात वेळ मजेत गेला असेल."
" आईं अहो शांत व्हा. भांडू नका. मी बनवते स्वयंपाक." इतका वेळ माय लेकाना भांडताना बघुन मीनाक्षी ने माघार घेतली.
" अरे लग्न झालं म्हणजे हा मुलगा आपल्या बहिणींना विसरला.बायकोच्या आरामाची काळजी आहे. पण त्याच्या बहिणी त्याला भेटायला येत आहेत. याचं कौतुक नाही.
आता या मुलाला कोण सांगणार सासरी काय काय काम करावी लागतात. सगळ्यांची मर्जी राखण हे काम काय सोप वाटतं.
आता त्यांनी आपल्या लाडक्या भावाला भेटायला येण्यासाठी विचारलं तर मी नकार कसा देणार.
त्या दोघी येतील. येताना मुलं पण येतील. घर कस गोकुळ सारख दिसेल.
त्या दोघी येतील. येताना मुलं पण येतील. घर कस गोकुळ सारख दिसेल.
आता सुट्ट्या संपणार आहेत.मुलांच्या शाळा सुरू झाल्या की निवांत काय येता येणार आहे का?
आता आराम करायला त्या माहेरी येत आहेत. तर त्यांना आरामात राहायला येऊ द्याव. त्याचं कोड कौतुक करावं. ही जबाबदारी आहे ना त्याची.!
या घराचा कर्ता पुरुष आहे ना ! मग अस वागून कस चालेल. समाज काय म्हणेल. रीती परंपरा त्या कोणी जपायच्या ?
यांच्या पश्चात त्यानेच तर बहिणीच माहेर जपायला हवं. इतकी पण समज नाही याला. बायकोच्या समोर याला कोणी दिसतच नाही. तिचाच विचार सतत असतो.
म्हणे ती दमली आहे. माहेरी जाऊन आली आहे. छान पैकी मज्जा केली असणार. थकवा तर दूरच असेल. आणि याला तिची काळजी.
देवा बघतो आहेस ना ! मी असताना हि अवस्था. माझ्या माघारी तर पोरींना माहेरला पोरक करेल हा ! " आई पेपर वाचत बडबडत होती.
प्रसाद ने आई कडे बघून नकार अर्थी मान हलवली. तिला समजावणं आज काल त्याच्या डोक्याच्या बाहेरच होत. त्याची मनातल्या मनात चिडचिड होत होती.
" या आईला काय समजत नाही का ? नागपुर ते पुणे हा काय सोपा प्रवास वाटतो का.? ते पण एका तीन वर्षांच्या मुलाला घेउन.
मला मान्य आहे. आईने आम्हा भावंडांना घेउन एकटीने प्रवास केला आहे. त्यात तिला आजीने कधीच मदत केली नव्हती. पण ती तर मीनाक्षीचा त्रास समजुन घेऊ शकते ना !
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा