आजी जशी तिच्या सोबत वागली. तसचं ती मिनाक्षी सोबत का वागते. त्याने काय साध्य होणार आहे ? हे मला समजत नाही."
" आज पर्यंत यांनी कधी मला उलट उत्तर दिलं नाही. हा आताचा मुलगा मला उलय बोलतं आहे.
मी पण किती तरी वेळा माहेरी जाऊन आल्यावर काम केली आहेत.
मी पण किती तरी वेळा माहेरी जाऊन आल्यावर काम केली आहेत.
याच्या बायकोला काय सोन लागलं आहे जे तिला मखरात ठेवलं आहे. चागलं राजा राणीचा संसार आहे. माझ्या सासू सारखी मी नाही तिला जाच करत. जमेल तितकी मदत करतेच ना.
आज सुध्दा दुपारी पोरी येणार आहेत तर तिचा मार्केट मध्ये जाऊन येण्याचा त्रास वाचवण्यासाठी मी सगळ सामान ऑनलाईन मागवून दिलं ना.! मी केलेल्या मदतीचं कौतुकच नाही. बायकोच्या तालावर नाचत असतो नुसता."
दोघंही एकमेकांना बोलतं होते. पण हळु आवाजात. तोंडाने शिव्या घालत होते. नी हाताने काम करत होते. बहिणी येणार आहेत तर प्रसाद ने एक बेडरूम स्वच्छ आवरून ठेवली. त्यांचा तीन बी एच के फ्लॅट होता. हॉल ला मोठी बाल्कनी होती. त्यात मिनाक्षी ने झाडं लावली होती. एक रूम प्रसाद आणि मिनाक्षी यांची होती. तर एक बेडरूम आई साठी होती. एक बेडरूम राघव ची होती. पण त्याच्या बहिणी आल्या की त्या त्यांची मूल त्या रूम मध्ये राहायची.
दोघंही एकमेकांना बोलतं होते. पण हळु आवाजात. तोंडाने शिव्या घालत होते. नी हाताने काम करत होते. बहिणी येणार आहेत तर प्रसाद ने एक बेडरूम स्वच्छ आवरून ठेवली. त्यांचा तीन बी एच के फ्लॅट होता. हॉल ला मोठी बाल्कनी होती. त्यात मिनाक्षी ने झाडं लावली होती. एक रूम प्रसाद आणि मिनाक्षी यांची होती. तर एक बेडरूम आई साठी होती. एक बेडरूम राघव ची होती. पण त्याच्या बहिणी आल्या की त्या त्यांची मूल त्या रूम मध्ये राहायची.
प्रसाद ने राघव ची खेळणी आवरून ठेवली. बेड वरची बेडशीट बदलून ठेवली. कामवाल्या मावशीच्या कडून सफाई करून घेतली. मध्येच राघव उठला होता. तर तो आजीच्या मागे मागे खेळत होता.
प्रसादला कंपनीचा फोन आला. म्हणून कॉल अटेंड करण्यासाठीं तो बेडरूम मध्ये बसला होता. मिनाक्षी दमलेली असताना देखील किचन मध्ये काम करत होती. तिचा स्वयंपाक होई पर्यंत साधना बाईंनी राघवला सांभाळले. नंतर लगेच
"माझे पाय दुखतात याच्या मागे मागे फिरून"
अस म्हणत राघव ची जबाबदारी तिच्यावर सोपवली. स्वतः जाऊन रूम मध्ये बसल्या. राघव ने पुन्हा पसारा केला होता. त्याला खायला दिलं होत तर खाली सांडून ठेवलं होत. तोंड चिकट केलं होत. दूध अर्धच प्यायल होत. अर्ध तर शर्टवर सांडल होत.मीनाक्षी ने त्याला आधी अंघोळ घातली. मग त्याला जेवण भरवल.
जरा विश्रांती घेऊ म्हणत असताना दाराची बेल वाजली. दारात तिच्या दोन्हीं नणंदा आणि भाचर आली होती. तिने हसऱ्या चेहऱ्याने त्याचं स्वागत केले. पोरी आल्या पासून तर साधना बाईंना त्यांच्या साठी काय करू आणि काय नको असं झालं होतं. त्या तिघी बोलतं बसल्या होत्या. मिनाक्षी ने सगळ्यांना गरम गरम जेवण वाढलं. सासू बाईंच्या आज्ञेप्रमाणे तिने गरम गरम पराठे करून वाढले.
मीनाक्षीच्या नणंदा पुण्यातच राहात होत्या. प्रसादच्या घरापासून जवळच त्यांची घर होती. आठवड्यातून दोनदा तरी त्या दोघी भावाला भेटायला येत असत. येताना त्यांची मूल देखील येत. आल्यावर दिवस भर घरात नुसता धुमाकूळ घालत.त्यांच्या मुलांना सांभाळण्याची जबाबदारी मीनाक्षी वर असायची.
ती मुलं देखील मामी मामी म्हणून तिला चिटकायची. मामाला तर त्यांना कुठं ठेवू अस व्हायचं. ती मुलं यायची दोन चार दिवसांसाठी. पण त्यांनी घातलेला पसारा आवरायला तिला दोन दिवस लागायचे.
नणंद ताईंच्या मुलांना काही बोलणं, रागावण हे साधना बाईंना आवडत नसे. दिवसभर काम करून, स्वतः मुलाला, सासूच्या मुलाला, नणंदा बाईंच्या मुलांना सांभाळून थकून गेली होती ती.
आज चौथा दिबस होता. नणंद बाई माहेरपणाला आलेल्या गोष्टीला. साधना बाईंनी तर मिनाक्षी ला त्यांची सेवेकरी बनवलं होत.
सकाळ संध्याकाळ वेगवेगळा नाष्टा,वेगवेगळे जेवणाचे मेनू, मधे सरबत, ज्यूस. मिल्क शेक, यांना तर खंड नव्हता. बर तर बर सगळ्या गोष्टी घरी बनवलेल्या हव्यात. सासू बाई स्वतः काही मदत करत नव्हत्या. मुलींनाही मदत करू देत नव्हत्या.
स्वतः च्या मुलांना सांभाळण्याच्या कामात गुंतवून ठेवत. मिनाक्षीच काम आवरे पर्यंत. त्यात पोरींच्या मुलांना झुकत माप दिलं जात होत. राघव कडून समजूत दार पणाची अपेक्षा केली जात होती. त्यानेच त्याचं खेळणं मोठ्या भावाला, बहिणीला द्यायला हवं.
तीन वर्षाचा राघव रडायचा. रडायला लागला की साधना बाई त्याला मिनाक्षी कडे सोपवत. उगीच आपण काही काम करत आहोत. अस दाखवत. पोरींना गरम केलेला स्वयंपाक खाऊ घालत. हे सगळं प्रसाद बघत होता. त्याला समजत होत. पण बोलण्याची हिंमत होत नव्हती. आईच्या विरोधात.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा