पण बोलण्याची हिंमत होत नव्हती. आईच्या विरोधात.
आज संध्याकाळी बिर्याणी आणि रायता बनवायचं ठरवलं होत.संध्याकाळी सगळ्यांच्या आवडीची भेळ पाणीपुरी खाऊन झाली होती. सकाळ पासून काम करून मिनाक्षी दमलेली होती. तिच डोकं दुखत होत. पण अजून दोन दिवस. मग तिला आराम करायला मिळेल. भाचार मंडळींच्या शाळा सुरू होणार होत्या. क्रिसमस ची सुट्टी पण संपणार होती. मनाला समजावून मिनाक्षी काम करत होती.

तिला खूप अशक्त पणा जाणवतं होता.बिर्याणी बनवण्याची ताकद नव्हती. खुप कॉम्प्लीकेटेड रेसिपी. इतक्या लोकांच्या साठी बनवण्या साठी तिला दोन तास तरी किचन मध्ये उभ राहावं लागलं असत. प्रसादला तिचे कष्ट दिसत होते. तिला बर वाटतं नाही हे समजत होत. आई बहिणींना मदत करू देत नाही. हे डेखील त्याला लक्षात येत होत. आता पाणी डोक्यावरून चाललं होतं. त्याने तिला निक्षून सांगितलं.
" मिनाक्षी खुप काम केलंस. आज बिर्याणी नको करुस. मी ऑर्डर करतो. आणि मला तुझं काहीही ऐकायचं नाही आहे." थोडा आवज चढवून प्रसाद म्हणाला.
त्याने तिला राघव सोबत व्यस्त ठेवलं. रात्री च्या जेवणासाठी बिर्याणी रायता ऑर्डर केली. रात्री जेवयला बसण्या आधी सगळे जण मिळुन टीव्ही बघत होते. मूल आणि आजी आणि त्यांच्या आई मिळुन टीव्ही वर फ्रोझन मूव्ही बघत होते.
मिनाक्षी राघवला भरवत होती. इतक्यात बेल वाजली. प्रसाद ने जाऊन दरवाजा उघडला. बाहेर एक डिलिव्हरी बॉय उभा होता. हातात पार्सल घेवून. प्रसाद ने पेमेंट करून पार्सल घेतलं. सायली आणि आकांक्षा, दोघींनी आई कडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले. साधना बाईंनी नकार अर्थी मान हलवली.
थोडया वेळाने सगळे जेवायला बसले होते.
" अग जेवण ऑर्डर का केलं.?." साधना बाईंनी विचारलं.
" आई तिच डोकं दुखत होत म्हणून मीच ऑर्डर केलं." तिच्या ऐवजी प्रसाद म्हणाला.
त्यावर कोणीही काहीच बोलल नाही. पण सायली गप बसेल तर शपथ. सायली सर्वात धाकटी बहिण होती. घरातील शेंडे फळ.
" आई काहीही म्हण हा, मिनाक्षी वहिनी मात्र नशीबवान आहे. तिला जरा बरं वाटतं नाही. तर दादाने लगेच जेवण ऑर्डर केल. वहिनीला त्रास नको."सायली म्हणाली.
" सायली तुला सांगते, माझ्या घरी, तर, बाहेरून ऑर्डर केलेलं अजिबात आवडत नाही. सासूबाई तर नुसता राग राग करतात. त्या स्वतः किचन मध्ये उभ राहून स्वतः च्या देखरेखी खाली स्वयंपाक करून घेतात." आकांक्षा ताई म्हणाली.
" मामी, एकदा आम्ही आजी कडून घरी गेलो होतो. तेव्हा आत्या आली होती. पंधरा दिवस राहायला. आईन सगळं काही घरी बनवलं होत. जातांना आत्यासाठी तिच्या आवडीचे बेसनाचे लाडू पण बनवले होते." धाकटी स्पर्श म्हणाली. आकांक्षा ताई ची धाकटी मुलगी.
" आजी तु पण जातांना आम्हाला रव्याचे लाडू बनवून दे." श्लोक म्हणाला. आकांक्षा ताईंचा मोठा मुलगा.
" आजी मला खोबऱ्याच्या वड्या हा हव्यात." सुमेध म्हणाला. पाच वर्षांचा सायली ताईंचा मुलगा.
" हो रे बाळांनो, मी आणि मामी आम्ही तुमच्या आवडीचा खाऊ बनवून देऊ." साधना बाई सुमेध चा लाड करत म्हणाल्या. त्या स्वतः च्या हातानी त्याला भरवत होत्या.
प्रसाद काही बोलणार त्या आधीच मिनाक्षी ने त्याच्या ताटात रायता वाढला. त्याला नजरेने इशारा केला.
" आता काहीही बोलू नका."
नंतर जेवण झाल्यावर भाचारांची फरमाईश आलीच.
" मामा आम्हाला आईस क्रीम खायचं."
प्रसाद ने सगळ्यांच्या साठी आईस क्रीम मागवलं.
साधना बाईंनी त्यांच्या देखरेखी खाली नातवंडांच्या आवडीचा खाऊ बनवून घेतला. मिनाक्षी करत होती. सासू बाई उगीच किचन मधे बसुन ड्राय फ्रूट कापून दे. वेलची कुटून दे. अशी काहीतरी छोटी छोटी काम करत होती.

" अग बदाम घाल जास्त."
" अग लाडू जरा मोठे कर."
" अग लाडू ला बेदाणा लाव."
" अग सायलीला मठरी आवडते. जरा थोडया मठरी बनव. तू छान बनवतेस." साधना बाईंनी मिनाक्षी च कौतुक केलं.
" मिनाक्षी जरा खऱ्या शंकरपाळ्या पण कर. आकांक्षाला आवडतात."
मिनाक्षी ने नकार अर्थी मान हलवली. तिला काही बोलण्याचा अधिकार नव्हताच. तिला ठावूक होत.
' साधना बाई त्यांच्या मनाप्रमाणे सर्व करणार. त्यात कोणीही काहीही करू शकत नाही."
' साधना बाई त्यांच्या मनाप्रमाणे सर्व करणार. त्यात कोणीही काहीही करू शकत नाही."
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा