ती निमूट पणे काम करत होती. जेवणाच्या आधी तिने काम संपवलं होत. राघव दुपारी झोपल्यावर ती देखील दुपारी थोडा आराम करणारं होती.
आई साधना बाई आणि मुली, साधना बाईंच्या खोलीत गप्पा मारत. तर मूल टीव्ही वर काहीतरी बघत. इंटरनेट मुळे त्यांना आवडणार मूव्ही बघायला मिळतात. आज त्यांचा अक्वामॅन सिझन १ आणि २ बघायचं ठरवल होत. त्यामुळे मिनाक्षीला दुपारी वेळ होता.
दुपारी तिच्या नावाच पार्सल आलं. तिच्या आईनं तिच्या साठी पाठवल होत. पुण्याला येताना तिच्याकडे खुप सामान होत. लहान राघवला घेउन दोघांना तो इतका लांबचा प्रवास करायला जमल नसत. म्हणून त्यांनी बाकीच सामान कुरिअर केलं होत. तेच सामान आज् आलं होत.
तिने तिच्या बेडरूम मध्ये जाऊन सामान उघडल. तेंव्हा सायली आणि आकांक्षा ताई तिच्या सोबत होत्या. त्या काहीतरी सांगायचं होत. तर बेडरूम मध्ये आल्या होत्या. त्यांनी समोर बॉक्स उघडलेला बघितला.
" वहिनी अग हा क्रोकरी सेट कसला मस्त आहे ग ! "
बेडवर ठेवलेला कप बशीचा सेट चा बॉक्स हातात घेत सायली म्हणाली.
" अग हा ना आदित्य दादाने जर्मनीहुन आणला आहे." मीनाक्षी कौतुकाने म्हणाली.
" मीनाक्षी ही पैठणी किती मस्त आहे ग."
आकांक्षा म्हणाली.
आकांक्षा म्हणाली.
आकांक्षा मोरपिशी रंगाची साडी हातात घेउन, त्यावर प्रेमाने हात फिरवत होती.
" ही साडी ना दादाने घेतलेली आहे. भाऊ बीजेला" मीनाक्षी म्हणाली.
" अग तुला आवडली आहे का.?."
'त्या दोघी अजून का आल्या नाहीत.मीनाक्षी सोबत के बोलतं बसल्या आहेत.?.'हे बघायला साधना बाई आल्या होत्या. मीनाक्षी सोबत त्यांना बोलताना बघुन त्या पटकन म्हणाल्या.
" हो छान आहे. मला पण हवीच." ती अशाळ भूत आवाजात म्हणली.
" मग घे की. तुझी वहिनी काही म्हणणार नाही."
साधना बाई म्हणाल्या. त्यांनी मिनाक्षीला विचारलं देखील नाही. तिला ती साडी द्यायची आहे का नाही. परस्पर आकांक्षा ताईना देऊन मोकळ्या झाल्या.
साधना बाई म्हणाल्या. त्यांनी मिनाक्षीला विचारलं देखील नाही. तिला ती साडी द्यायची आहे का नाही. परस्पर आकांक्षा ताईना देऊन मोकळ्या झाल्या.
" आई ताईला साडी दिली. मग वहिनी मला का टी सेट पण देईलच. शेवटीं मी या घरातली सर्वात धाकटी मुलगी आहे." सायली म्हणाली.
" हो ना ग वहिनी. तू मला देशील ना !." सायली ने मीनाक्षीला विचारले.
त्या दोघी बहिणी एकदम बोलल्या. की मीनाक्षी ला काही बोलणं सुचलं नाही. तिन नुसतीच मान हलवली. हे सगळं काही नुकताच घरी आलेला प्रसाद ने बघितलं. त्याला हे काही जे होत आहे. ते पटत नव्हत. समोरच आता काही अडवल नाही तर नात्यात गाठ पडेल. मीनाक्षी काही बोलत नाही. याचा या तिघी गैर फायदा घेत आहेत. तो आत येत म्हणाला.
" काय ग ताई, सायली काय चालु आहे.?" त्याने सहजच प्रश्न विचारला.
" अरे प्रसाद कधी आलास." आईने विचारले.
" आताच येतो आहे. बाहेर मुलं टीव्ही बघत आहेत. मी डायरेक्ट इथेच आलो." खांद्याला अडकवलेली लॅपटॉप बॅग टेबल वर ठेवत तो म्हणाला.
" मिनाक्षी आलं का ग कुरिअर.?"
प्रसाद ने मिनाक्षीला विचारल. तिने नुसतीच मान हलवली. तिचा उतरलेला चेहरा बरच काही सांगत होता. कस तरी झालं प्रसादला.
प्रसाद ने मिनाक्षीला विचारल. तिने नुसतीच मान हलवली. तिचा उतरलेला चेहरा बरच काही सांगत होता. कस तरी झालं प्रसादला.
" दादा तुला माहित आहे, हा कप सेट बघ किती छान आहे. वहिनीने मला दिला." हातात घट्ट पकडलेल्या बॉक्स वरची पकड अधिक घट्ट करत सायली म्हणाली.
" प्रसाद हि पैठणी बघ. आईने मला दिली."
मोरपिशी रंगाची पैठणी साडी खांद्यावर टाकून, आर आरशात स्वतःला निरखून बघत आकांक्षा म्हणाली. ती घरात सर्वात मोठी मुलगी होती. मधला प्रसाद. सर्वात धाकटी सायली. प्रसाद च्या वडीलांना जाऊन दोन वर्ष झाली होती.
तेव्हा पासून तोच या दोन्हीं बहिणीच माहेरपण करत होता. आइने सांगितल, आणि त्याने केलं नाही. असं कधी झालच नव्हत.मीनाक्षी देखील साधना बाईंना आईं प्रमाणे मान देत होती. त्याचं मन मोडण तिला जमत नव्हत.
ती त्यांना नकार देऊ शकत नव्हती. हि गोष्ट साधना बाईंना आणि प्रसादला ठावूक होती. पण आई मीनाक्षीच्या स्वभावाचा गैरफायदा घेत आहे. हे त्याच्या लक्षात येत होत. याला वेळीच आवर घालणं, भविष्या साठी गरजेचं होत.
" अग ताई हि साडी मिहिर दादाने मीनाक्षीला भाऊ बीज म्हणून दिली आहे."
" सायली हा सेट आदित्य दादाने जर्मनी हून तिला राखी पौर्णिमेच् गिफ्ट म्हणून आणला आहे."
" प्रसाद मीनाक्षी म्हणाली आम्हाला. तुला सांगु प्रसाद किती मोठ मन आहे तिच. पोरींना आवडलं. तर तिने लगेचच दिलं त्यांना." साधना बाईंनी मीनाक्षीच कौतुक केलं.
तिच्या हसऱ्या चेहऱ्या मागचं तुटलेल मन साधना बाईंनी नाही बघितल. पण प्रसादला लगेचच समजलं.
" आईं, मी काय म्हणतो. मी यावेळी राखी पौर्णिमा या दोघींना पैठणी घेतो."
" आणि दिवाळीला इम्पोर्टेड कटलरी सेट मागवतो." प्रसाद आईला म्हणाला.
" अरे हे तर चांगलचं आहे. यावर्षी मीनाक्षी ने दिलं. पुढच्या वर्षी तू दे. अशीच माया करत राहा." साधना बाईंनी प्रसाद च कौतुक केलं.
" मीनाक्षी , मला जरा चहा करून दे ग." अचानक प्रसाद म्हणाला.
" हो. आणते." मीनाक्षी म्हणाली.
मीनाक्षी चहा बनवायला किचन मधे गेल्यावर प्रसाद ने सायली कडून तो टी कप सेट घेउन बॉक्स मध्ये परत ठेवला. आकांक्षा ताई कडून पैठणी पण काढून घेतली. बॉक्स मध्ये परत ठेवली.
त्या तिघी प्रसाद कडे बघतच राहिल्या.त्याच्या कडून अशा वागण्याची कोणालाच अपेक्षा नव्हती.
" अरे प्रसाद हे काय करतो आहेस. सगळ्या वस्तू पुन्हा बॉक्स मध्ये का ठेवत आहेस.?." त्याच्या अशा वागण्याने गोंधळात पडलेल्या साधना बाईंनी प्रसादला विचारलं.
" आई या वस्तू मीनाक्षीला तिच्या भावाने दिल्या आहेत. मी बघितल मगाशी. तू तिला न विचारता या गोष्टी या दोघींना दिल्या. हे किती बरोबर आहे."