" अरे पण या दोघी या घरच्या माहेर वाशीण आहेत. त्यांचे लाड करायचे असतात. मिनाक्षी ने तेच केलं. तिने स्वतः हुन समंती दिली आहे." साधना बाईं म्हणल्या.
" आई मी बघितल मगाशी. या दोघींना आवडली वस्तू. तर देउन टाकली. तुला मीनाक्षीचा स्वभाव माहित आहे ना. ती नाही नाही म्हणून शकत. पण तिच्या या स्वभावाचा गैरफायदा का घेत आहेस."
" मी ? मी काय केलं. आल्या पासुन बघत आहे. बायकोचा फारच पुळका येत आहे. मी मुलीचे माहेर पण करायचं म्हणलं की पोटात दुखत तुझ्या." साधना बाईंनी चिडून विचारलं.
" आई हे तिसऱ्यांदा होत आहे. या आधी तिच्या बहिणीने तिला हाती भरत काम केलेली साडी दिली होती. सायलीला ती साडी आवडली म्हणून तु ती साडी मीनाक्षीला न विचारता, सायलीला दिलीस."
" मीनाक्षी च्या आईनं तिला ब्रँडेड हॅण्ड बॅग घेऊन दिली होती. आकांक्षा ताईला आवडली. तर ती पण तु तिला देऊन टाकली. तेव्हां तु विचारल होत मीनाक्षीला.? "
" आई तुला काही आवडलं. आकांक्षा ताईला, सायलीला द्यायचं असेल, तर मला सांग. मी कमावतो आहे. मी आणून देईन. पण मीनाक्षी च्या वस्तू नको देऊस."
" अरे अस काय बोलतो. तुझे बाबा तर मला कायम सांगायचे. अमुक एक वस्तू वन्स ताईंना आवडली आहे. तर देऊन टाक. मग मला देखील मनात नसताना देऊन टाकावं लागे." त्या मायुस होऊन म्हणल्या.मान खाली घातली होती.
" आई बाबा कसे वागत होते ते मला माहीत आहे. पण मी प्रश्न विचारू, " प्रसाद ने विचारलं. साधना बाईंनी नुसतच वर बघितलं.
" आई बाबांना जाऊन आता दोन वर्ष झालीत. मला सांग त्या नंतर अत्या कधी घरी आली.? तु तिला बोललस. माहेर पणाला ? "
" आई बाबांना जाऊन आता दोन वर्ष झालीत. मला सांग त्या नंतर अत्या कधी घरी आली.? तु तिला बोललस. माहेर पणाला ? "
साधना बाईंची मान अजूनही खालीच झुकलेली होती. आकांक्षा ताई आणि सायली दोघी त्यांच्या कडे बघत होत्या. गप्प बसल्या होत्या.
" आईं आत्या कधीच आली नाही. ना तु तिला फोन करते. ना तिचा कधी फोन येतो. आई तु तिच माहेर संपवलं. आई कटू आहे.पण सत्य आहे.
बाबांच्या स्वभावामुळे असू दे, किंवा अत्याच्या वागण्या मुळे असू दे. हे तर खर आहे ना, आत्याला माहेर नाही. अस का याचा विचार केलास ? "
बाबांच्या स्वभावामुळे असू दे, किंवा अत्याच्या वागण्या मुळे असू दे. हे तर खर आहे ना, आत्याला माहेर नाही. अस का याचा विचार केलास ? "
" आई आत्या घरी आली की तुझी काम वाढत. तिची सरबराई करण्यासाठी तुला सतत उभ राहावं लागलं. आजी आजोबा बाबा कोणीच तुला मदत करत नसे. इतकचं काय बाबा पण तुला तिच मन जपायला सांगत. आत्याला सासरी काम करायला लागत. म्हणून माहेरी आल्यावर तिला आराम असे. पण तुला एकही क्षणाची उसंत मिळत नव्हती. याचा परिणाम के झाला आहे, तू बघितला? "
"आईं आत्याला तिच हक्काचं माहेर नाही. तु पण तसचं वागत आहे. मी आहे ना. माझ्या अंगात ताकद आहे. तो पर्यंत मी करेन माझ्या बहिणीच माहेरपण. पण नंतर काय. मीनाक्षी ने पण यांना माझ्या बहिणी इतकचं मानलं पाहिजे का ? "
" या दोघी घरी आल्यावर तुम्ही तिला किचन मधून बाहेर येऊच देत नाही. नुसत्या फरमाईश करता. पण त्या साठी तिला मदत पण करत नाहीत. काल मी ऑर्डर केल. तर सायली ने तिच्या सासरच् गाऱ्हाणं ऐकवल. मिनाक्षी ला काय वाटेल, हे पण समजलं नाही आई या दोघी पण सासुरवाशीण आहेत. तिच मन तुम्हाला समजलं नाही.?"
" आई तु, ताई तुम्ही तुमचं वागणं वेलीच सुधारा. नाहीतर अशा वागण्याने तु यांचं माहेर संपवशील."
" आय एम सॉरी दादा. आम्ही सासुर वाशीण असून आम्ही मीनाक्षीला समजण्यात चुक केली." आकांक्षा ताई म्हणाली.
" सॉरी दादा. मी चुकले. वहिनी आहे.म्हणून आमचं माहेर आहे. आम्ही एकमेकींना सांभाळून घ्यायला हवं आहे. आम्ही दरवेळी तिला गृहित धरतो."
" मी आज सगळ्यांच्या साठी बटाटे वडे बनवते." सायली म्हणाली.
" मी गुलाबजाम बनवते. आज दिवस भर मीनाक्षी खुप कामात होती." आकांक्षा ताई म्हणाली.
" जा आज किचन चा ताबा तुम्ही दोघी घ्या. मी नातवंड सांभाळते."
" आज मीनक्षीला आराम करु दे."
" प्रसाद जा या तिघीं साठी छान साड्या घेउन या तुम्ही दोघ जाऊन. जातांना माझ्याकडुन पैसै घेउन जा. तू नको खर्च करू." आई म्हणाली.