विषय:तिचं आभाळ
आठ दिवस होऊन गेले होते तिला पत्र पाठवून. कुठेतरी खोलवर तिला वेडी आशा होती की त्याचं एखादं तरी सांत्वना पर पत्र येईल. पण रोज पोस्टमन येत होता. तिला पत्र देऊन जातही होता. परंतु तिला हवं ते पत्र मात्र अजूनही आलेल नव्हतं. तिला तिचच कळत नव्हतं की आता ती कशाची अपेक्षा करत होती. त्याला त्याच स्वतःच आयुष्य होतं. तो दिसायला सुंदर होता. तिच्यापेक्षा वयाने लहान होता. आणि तिला तिनेच तर त्याला सुचवलं होतं की त्याने एखादी दुसरी चांगली मैत्रीण पहावी. मग आता त्याचा विचार करण किती चुकीचं होतं. तिचे विचार आणि तर्क बरोबर होते. पण मन आणि हृदय तिच्या ताब्यात नव्हत. रात्र रात्र ती जागून काढत असे. रात्र भर न झोपल्याने, डोळे तारवटलेले असत. भूक लागत नसे आणि काही लिहायला पण सूचत नव्हते. रोजचा आनंद देणारा सूर्य प्रकाश आणि टॉमीच्या खोड्या देखील तिला आवडेनाशा झाल्या. आठ दिवसात खूप दिवसांची आजारी असल्यासारखी ती दिसायला लागली होती.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा