तिचा काय दोष भाग 1
©️®️शिल्पा सुतार
मोठ्या सोसायटीच्या आवारात शाळेची बस शिरली. आरती त्यांची वाट बघत होती. जाई, जयेश खाली उतरले. दोघ जुळे होते.
आई... आई ओरडत जाई पळत पुढे आली. शांत जयेश मागून आला.
जाई खूप बडबड करत होती. शाळेत काय झालं ते सांगत होती. जयेश वर्गात काय झालं कधीच काही सांगत नव्हता. त्याच्या बद्दल सगळं जाई सांगत होती. दोघ पाचवीत होते.
"आई उद्या प्रोजेक्ट सबमीट करायचा आहे आणि टेस्ट मध्ये दहा पैकी दहा मार्क मिळाले." जाई म्हणाली.
"अरे वाह, जयेश तुला किती मार्क मिळाले?" आरतीने विचारलं.
"मला नऊ मिळाले."
" खूप छान मुलांनो. कपडे बदला." आरती त्यांना खायला बनवत होती. थोड वेळाने मूल खेळायला गेले.
रात्रीच्या स्वयंपाकाची तयारी करून आरती ही खाली गार्डन मधे गेली. तिने वॉक घेतला. ती मुलांकडे लक्ष देवून होती.
त्यांच छान रूटीन बसलं होतं. आरती सगळं सांभाळून होती. एक मुलगा, एक मुलगी. सचिन ही समजूतदार होता. खावून पिऊन सुखी कुटुंब होतं.
थोड्या वेळाने आरती मुलांना घेवून स्टेशनरी दुकानातून जावून आली. ते घरी आले.
"चला अभ्यास करून घ्या." आधी होमवर्क झाला. ते प्रोजेक्ट करत होते.
आरतीचा स्वयंपाक झाला. गरम गरम पोळ्या केल्यावर तिने दोघं मुलांना जेवायला दिलं.
सचिन घरी आला. दोघ मुल पळत त्याच्याकडे गेले.
"जेवण झालं का जाई, जयेश?"
" हो बाबा."
" चला झोपा मग. सकाळी शाळेत जाण्यासाठी जाग येत नाही."
सचिन फ्रेश होऊन आला. आरती त्या दोघांचे ताट वाढत होती. त्याने टीव्ही लावला. दोघं जेवत होते.
"उद्या आई बाबा येत आहेत. आठ दिवस रहातील. काहीतरी काम आहे. त्यांना स्टेशन वर घ्यायला जाशील का आरती? "
"हो. ते किती वाजता येणार आहेत? " तिने माहिती घेतली.
सासू सासरे गावी होते. ते अधून मधून येवून जावून होते. सासरे अजून जॉब करत होते. सचिन, आरती खूप व्यवस्थित वागत होते. मोठ्यांना मानपान देत होती. तक्रार करायला जागा नव्हती.
सकाळी लवकर आवरावं लागेल. सासुबाई जून्या वळणाच्या होत्या. दरवेळी आल्या की वेगळाच प्रॉब्लेम होत होता. साफसफाई करावी लागेल. दळण कराव लागेल. त्यांना भाकरी लागते. आरतीने मनातल्या मनात कामाची लिस्ट केली.
"अहो तुम्ही मला आधी सांगायच ना. आत्ता पर्यंत थोडं कामं झालं असतं " आरती घर आवरत होती.
"एवढ टेंशन घेऊ नकोस घरचे लोक आहेत. एवढी साफसफाईची काही गरज नाही." सचिन म्हणाला.
यांना काय होतय बोलायला. खरी परिस्थिती मलाच माहिती. सासुबाई रागात असायच्या. केलेला स्वयंपाक त्यांना पटत नव्हता. त्या नेहमी घरात फिरून सगळीकडे बघत होत्या. वळण काढत होत्या. आरती आणि जाईला पाण्यात बघत होत्या. टोमणे मारत होत्या.
आठवडा भर काय करावं. ती प्लॅन करत होती.
" अहो भाजी, फळ घ्यावे लागतील."
" लागत ते मागवून घे आरती. कपाटातून पैसे घे. " सचिन म्हणाला.
स्वतः च्या घरी ज्यूस पिणार नाही. इकडे येवून सगळं लागत. जावू दे खाता आहेत तर खा पण नीट वागा एवढच माझं म्हणणं आहे.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा