तिचा काय दोष भाग 2
©️®️शिल्पा सुतार
आरती टेंशन मधे होती. यावेळी मी आईंकडे दुर्लक्ष करेन. आपण भलं की आपलं काम भलं. आपला आपला स्वयंपाक करायचा. आठ दिवस काढून घ्यायचे. सचिनची अश्या वेळी मदत घेता येत नाही. एकटीवर खूप पडतं.
सकाळी धावपळ झाली. सचिन मदतीला होता त्याने मुलांना तयार केलं. आरती डबे भरत होती. "हा जाईचा डबा, भेंडी आहे. हा जयेशचा डबा, बटाट्याची भाजी आहे."
" मुलांनो आज आजी, आजोबा येणार आहेत." सचिन आनंदाने सांगत होता. दोघं मूल खुश होते.
"संध्याकाळी अभ्यास करायचा. गॅप करायचा नाही." आरती म्हणाली.
"हो आई." मूल खुश होते. ते शाळेत गेले आरतीने पूर्ण आवरलं. दळण गिरणीत दिलं. भाज्या घेवून आली. थोडा स्वयंपाक ही केला.
आरती स्टेशन वर गेली. रत्नाताई, सतीशराव आले. ते टॅक्सी करून घरी आले. रत्नाताई सगळीकडे फिरून बघत होत्या.
" पडदे कधी बदलले? टीव्ही नवीन घेतला का? डबे चिकट वाटत आहेत. एवढे झाड का आहेत. बाल्कनीत धुते की नाही. दोन, दोन छोट्या सायकल का घेतल्या?" त्यांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली.
"दोन मुल आहेत ना. " आरती म्हणाली.
"जयेश साठी घ्यायची. तो खेळणार नाही तेव्हा त्याची सायकल जाई चालवले ."
"अस कस? दोघांचे फ्रेंड्स सेम आहेत. ते एकत्र खेळतात." आरती म्हणाली.
"काहीही आपलं. उगीच खर्च. जाईला जरा एडजेस्ट करायला शिकवत जा." रत्नाताई म्हणाल्या.
"जाईला का? जयेश का नाही?"
"हे त्याच घर आहे. जाई लग्न करून इथून जाईल. मुली किती केलं तरी परक्याच धन. त्यांच्यावर एवढा खर्च का करा. " रत्नाताई म्हणाल्या. त्या नेहमी मुलगी म्हणुन जाईला पाण्यात बघत होत्या.
शी... यांचे किती जुनाट विचार आहेत. मुलांना महत्व देतात. मुलींनी काय केलं आहे. काय करू? यांना वेळेवर बोलायला हवं. आरती विचार करत होती.
"मूल केव्हा येतील?" सतीशराव विचारत होते.
" थोड्या वेळाने येतील."
आरती बस स्टॉप वर आली. मूल आले. नेहमी प्रमाणे त्यांची बडबड सुरू होती. ते घरी आले. दोघ मूल आजी आजोबांना भेटले.
सतीशराव मुलांशी बोलत होते. रत्नाताईंनी खाऊ काढला. जयेशला दिला. जाई नुसती उभी होती. तिला काही दीलं नाही. जवळ घेतल नाही की त्या तिच्याशी बोलल्या ही नाही. तिचा चेहरा उतरला होता़. ती आरती कडे आली.
"इथे बस जयेश खाऊ खा." रत्नाताई त्याला प्रेमाने गोंजारत होत्या.
तो जाईकडे बघत होता. तो तिच्याकडे आला. तिला सगळा खाऊ दिला. "आपण खाऊ."
जाई खुश झाली. दोघ मूल आत गेले. रत्नाताई रागाने जाईकडे बघत होत्या. ही त्याचा खाऊ घेवून टाकते. बघितल कशी मोठी दिसते. माझा जयेश लहान वाटतो." त्या म्हणाल्या.
"आई मुली मोठ्या दिसतात. त्यांच्या वर्गात ही मुल लहान वाटतात. पुढे जावून अचानक मूल मोठे होतील. तुम्ही अस बोलू नका आणि जे द्यायचं ते दोघ मुलांना द्या ना. फक्त जयेशला देवू नका. असा फरक करू नका. जाईला काय समजतं. तिला नजर लावू नका. "
"सूनबाई दोघ मुलांसाठी खाऊ आणला आहे." सतीशराव म्हणाले.
"त्या एकाला देतात म्हणून म्हटलं." आरती रागात होती.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा