Login

तिचा काय दोष भाग 4 अंतिम

मुलगी म्हणून जन्म घेतला त्यात तिचा काय दोष
तिचा काय दोष भाग 4 अंतिम

©️®️शिल्पा सुतार

सकाळी नेहमी प्रमाणे धावपळ झाली. आरती किचन मधे होती.

"जाई तुझा डबा. हा जयेश तुझा. या पाण्याच्या बाटल्या."

दोघ मूल डायनिंग टेबल वर बसून दूध पीत होते. जाई नेहमी प्रमाणे जयेशला सगळं घेतलं का विचारत होती.

रत्नाताई किचन मधे आल्या. "वेगवेगळ्या भाज्या का केल्या? "

"मुलांना जी भाजी आवडते ती केली. " आरती म्हणाली.

" कशाला? जे केलं ते खायच ना जाई. " रत्नाताई म्हणाल्या.

आरती, सचिन कडे बघत होती.

"जाईने का फक्त आई? मी इतका मोठा आहे तरी माझ्या आवड निवड आहेत. दहा वर्षाच्या मुलीने एडजेस्ट करायच का? का तर ती मुलगी आहे. पुढे सासर कस मिळेल माहिती नाही. म्हणून आता खाऊ दे. आरामात राहू दे ना. आता पासून का तिला जाच. " सचिन म्हणाला.

" काहीही सवयी लावायच्या. सदा निभत अस रहायचं. " रत्नाताई म्हणाल्या.

" आई तू स्त्री असून दुसर्‍या स्त्रीला असा त्रास देते. काहीही बोलतेस. हेच तू सुनेला, नातीला सपोर्ट केला तर. तुम्ही सगळे सुखी व्हाल ना. " सचिन म्हणाला.

" हो ना. आमच्या साठी दोघ मूल सारखे आहेत. तुम्हीही फरक करू नका. " आरती म्हणाली.

सचिन मुलांना बस मधे बसवून आला. आरतीने त्याला चहा दिला. रत्नाताई चिडल्या होत्या .

" सचिन मला तुझ्याशी बोलायच आहे. आठ दिवस आलो तर तुझ्या बायकोला चालत नाही. काहीही बोलते. तिला मोठ्यांशी कस वागता याच वळण नाही वाटत? तिला जरा समजावून सांग. " त्या म्हणाल्या.

"वळण म्हणजे काय आई. कश्याला सारखं आरतीच्या घरच्यांचा उद्धार करते. ही तुझी अतिशय घाणेरडी सवय आहे. आई तू आरतीला इतके वर्ष बोलते मी काही म्हणालो का? ते ही चुकीच आहे. ती सून आहे तिला पाण्यात बघितलं पाहिजे का? स्वाभाव बदल जरा. आणि जाई बाबतीत तू अस का वागतेस? अस करु नको ना. ती लहान आहे कोमेजेल ना. " सचिन म्हणाला.

"अहो आपण गावाला जावू. इथे बघितलं कस वातावरण आहे. याना सासू सासरे नको. यांच्या मुलांना काही बोलायच नाही. त्यांना मोकळ वातावरण हवं. " रत्नाताई म्हणाल्या.

" सचिन बरोबर बोलतो आहे रत्ना. तू विचार कर. नीट वाग जरा. उगीच हट्ट करू नकोस. मुलांना विनाकारण बोलू नकोस. " सतीशराव ओरडले.

रत्नाताई आता काही म्हणाल्या नाही. गप्प झाल्या. दिवसभर आरती त्यांच्याशी बोलली नाही. तिने स्वयंपाक केला. वाढून दिलं. रत्नाताई जेवत नव्हत्या. तिने लक्ष दिलं नाही. दिवसभर भरपूर खातात किती कौतुक करणार. थोड्या वेळाने त्या जेवत होत्या. मी यावेळी त्यांची मनधरणी करणार नाही. त्यांना माझ्या मुलांशी चांगलं वागवं लागेल.

मी तुझ्यासाठी आहे जाई. वर्षांनुवर्षे चालत असलेला अन्याय आता मी सहन करणार नाही. काही दोष नसतांना आम्हाला त्रास द्यायचा नाही. तिने मुलगी म्हणून जन्म घेतला तो काही तिचा दोष आहे का? आरतीने स्टँड घेतल्या मुळे रत्नाताईंच्या वागण्याला लगाम लागला. यापुढे त्या विचार करून वागतील अशी आशा होती.

मूल शाळेतून घरी आले. दोघ नेहमी प्रमाणे खूप बोलत होते. आरतीने त्यांना खायला दिलं. ते खाली खेळायला गेले. आरती बाकी आवरत होती. रत्नाताई नुसत बघत होत्या. काही बोलायची त्यांची हिम्मत झाली नाही.


0

🎭 Series Post

View all