Login

तिचा न्याय ( भाग चवथा )

एखाद्या स्त्री ने जर मनात आणलं तर ती कोणत्या थराला जाऊ शकते याची आपण कल्पना देखील करू शकत नाही.
तिचा न्याय ( भाग चवथा )

विषय: तिचं आभाळ

सकाळीच ते गावात जायला निघाले. सगळ्या गावकऱ्यांची यात्रेकडे जाण्यासाठी लगबग चालली होती. यात्रेचे तिला इतकं कुतूहल नव्हतं. पण एका ठिकाणी मात्र खूप गर्दी पाहून तिला तिथे काय असावं याविषयी कुतूहल निर्माण झालं. ते पाहायला ती पुढे झाली आणि पाहिलं तर एका आडदांड बैलाला पाय बांधून खाली पाडलेलं होतं. एक जण लोणी त्याच्या वृषणाला चोळत होता. एका माणसाने जाड जूड सोटा त्या वृषणावरती मारला. क्षणार्धात ते वृषण रक्त बंबाळ होऊन त्या बैला पासून मुक्त झाले . तो बैल तडफडत बलहीन होऊन तसाच पडून राहिला . आता त्याच्यात ती मस्ती राहिलेली नव्हती. तिला ते दृश्य पाहून कसेसेच झाले. पण त्यांनी तिला सांगितलं की तिच्या प्रश्नाचं हेचं उत्तर आहे. तिला जर गाढ झोप लागायची असेल तर माजलेल्या बैलाच वृषण ठेचून काढणं हाचं त्यावर ईलाज आहे. तिला त्यांच्या बोलण्याचा मतितार्थ कळला.

थोडावेळ ईकडे तिकडे फिरुन त्यांनी जंगलातल्या लोकांकडून काही वनस्पती विकत घेतल्या. आणि ते दोघं आठवड्याचा बाजार करून घरी आले.

संध्याकाळची वेळ होती. आकाशात लवकरच काळोख पसरणार होता. ते तिला म्हणाले,

" माझी तुझ्याकडून खूप मोठी अपेक्षा आहे. तू त्या पोराला धडा शिकवण्यासाठी कठोर प्रयत्न करायला हवेत. तू आजपासून काही व्यायामाला सुरुवात कर. अजिबात नेम चुकता कामा नये. तुला स्पष्टच करून सांगतो. त्या मुलाला तुला माणसातून उठवायच आहे. तु तुझ्या पायांचा वापर योग्य ठिकाणी वार करण्यात तरबेज झालीस की मी तुला परत पाठवेल. तुझा निशाणा पाटलाच्या पोराचं वृषण राहिलं. बस तू अंधारात निशाणा साधायचा. जो पर्यंत तो मुलगा जिवंत राहिलं तोपर्यंत तूझ्या सारखाच तळमळत राहिलं. हिचं त्याच्या पापाची शिक्षा आहे."

त्यांच्या बोलण्यातली तळमळ तिच्या पर्यंत पोहोचली. तिने त्यांना वाकून नमस्कार केला. आणि कठोर परिश्रमाला सुरूवात केली. वाळूच्या पोत्यावर ती त्वेषानं वार करायची. हळुहळू तिच्यातला नाजूक पणा नष्ट होत गेला आणि लाथेचा अचूक वार व्हायला लागला.

" आता तू परिपूर्ण झालीस. जा उद्या तुझं काम फत्ते करून ये" त्यांनी तिला आशिर्वाद दिला. ती नमस्कार करून निघाली.

गावाच्या बाहेर असलेल्या पिंपळाच्या पाराजवळ आली. आज तिने पाटलाच्या मुलाला एकटेच भेटायला बोलावले होते. हे तिने मोठ्या कष्टाने घडवून आणले होते.  पाटलाचा मुलगा तिला पाहताच जिभल्या चाटायला लागला. आज तिला त्याच्या कडे येतांना पाहून त्याला मनात आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. आज त्याने मित्रांना मुद्दामून  बरोबर आणलं नव्हतं. त्याला मनातून खूप आनंद झाला होता . रस्त्यावर दुरदूर पर्यंत कोणीच नव्हतं. तिला जवळ येताना पाहून त्याला स्वतःवर ताबा ठेवण अवघड व्हायला झालं. तो ताडकन उभा राहिला. आणि क्षणार्धात काय झालं तेच त्याला कळलं नाही. वेदनेचा प्रचंड डोंब त्याच्या पायांमध्ये उसळला आणि तो तोंडानं विचित्र आवाज काढत झाली कोसळला.

ती देखील वाऱ्याच्या वेगाने जंगलात नाहीशी झाली होती. चौकशी झाली असती तर ती त्या वैद्याकडे उपचार घेत असताना सापडली असती.