तिचा पगार _हक्क कोणाचा ? (भाग १)

कथामालिका
तिचा पगार हक्क कोणाचा

"सुषमा चल आवर पटकन. साडेपाच वाजत आले. किती वेळ लागणार अजून तुला."

"अग मीरा फक्त पाच मिनिटे. एवढा मेल पाठवू‌ दे मला सरांना."

"आज तुला एवढी का घाई आहे ग."

"सुषमा तुला माहीत नाही यार. त्या एटीएम मशीन मधून येणाऱ्या करकरीत नोटा बघीतल्या की मला काय वाटत कसं सांगू."

मीरा खूप एक्साईट असते.

" पण सुषमा हे लग्न होईपर्यंतच ठीक असते. आपल्याला हव तेव्हा हव तेवढ खरेदी करता येते. छान खर्च करता येते. पण लग्नानंतर तसं होत नाही. खूप बंधन येतात. पगार आपला असतो. पण हक्क मात्र सगळ्यांचा असतो. पण तरीही मी मात्र मस्त स्वतः साठी काही खर्च करत आहे. मी स्वतः वर कसलीच बंधने लादली नाही. "

मीरा आणि सुषमा स्वतः च्या पगारावर आपला हक्क किती ? यावर चर्चा करत होत्या.
तेवढ्यात सुषमाच्या सासुबाई नी मेसेज केला. काही सामान आणि औषध गोळ्या. बापरे! पगाराचा पहिलाच दिवस आणि एवढी मोठी यादी.

"सुषमा कुठे हरवलीस?"

"चल. मस्त चिल्ड काॅफी घेऊ या आणि मग घरी जाऊ या."

"नको ग मीरा . काॅफी पीत बसलो तर खूप उशीर होईल. परत किराणा दुकानात जायचे आहे."

"चिल्ड यार. चल तू दहा मिनिटांनी काही आभाळ नाही कोसळणार."

मीरा ने सुषमाला जबरदस्तीने काॅफी शाॅप मध्ये नेले. कितीतरी दिवसांनी ती अशी निवांतपणे काॅफी घेत होती‌.

"खरं सांगू मीरा. आज पगाराचा दिवस. हे माझ्या सासुबाईंच्या चांगल लक्षात राहत. मागच्या महिन्यात त्यांनी अशीच यादी दिली होती. माझा बराचसा पगार नको त्या कारणाने खर्च झाला होता. हाती काही शिल्लक राहातच नाही ग."

"अग सासूबाई आहेत तुझ्या. त्यांना कळत ग सगळ."

"हो ना."

"पण त्यामुळे माझ पैशाच नियोजन नाही होत आहे ग. आता बाळाचा खर्च वाढला आहे. त्यात सासुबाई सासऱ्यांचे दुखणे खुपणे. बचत कशी आणि कुठे करू कळतच नाही.‌"

"अग सध्या तुझा काही खास खर्च चालू आहे का? म्हणजे माहेरी वगेरे..."

सुषमाच्या एकदम लक्षात आले.‌

"अग हो. सध्या आईला थोडी अडचण होती. म्हणून मी काही पैसे आईला दिले. याचा माझ्या सासुबाईना खूप राग आला आहे. शिवाय काही मी दोन तीन दिवसातून काही ना काही तरी बाहेर पैसे खर्च करत आहे. अस वाटत पैसा आहे तर का खर्च करू नये. किती मन मारून जगायचे ग. शिवाय मी कोणापुढेही हात तर पसरत नाही ना मीरा. आपलाच पैसा आणि आपणच...

"सुषमा तू चुकतेय."

"म्हणजे?"

"अग पैसे मी पण खर्च करते. मौज मजा करते. पण तेवढीच माझी बचतही आहे. तुझी सासू सामान आणायला सांगते तर तो खर्च तुला त्रासदायक वाटत आहे आणि तू रोज विनाकारण खर्च करते त्याला काय म्हणायचे ग. मग बचत कशी होईल. मग साहाजिकच घरच्यांना राग येऊ शकतो. अग आजचा दिवस जरी मजेत गेला असला तरी उद्याची चिंता करायलाच हवी. तुला राग येईल पण सुषमा काही पैसे सासुबाईंच्या हातात दे. मग बघ त्या कसं नियोजन करतात त्या. अग त्यांचा संसार खूप कष्टात गेला. माझी आई सांगते ना कधीकधी तुझ्या सासुबाईं बद्दल. आधी त्या माझ्या मामाच्या बाजुलाच राहातं होत्या."

सुषमा विचारात पडली.

"सुषमा काय झाल?"

"पगार,पगार ,पगार. या शबदानेच माझ डोक फिरले आहे. पण मीरा तुझ्या बोलण्यात तथ्य आहे. मला काही तरी नियोजन करावेच लागेल."

तेवढ्यात घरून सुषमाचा फोन वाजतो. "सासुबाईंचा फोन आहे ग. चल मला जावेच लागेल."

"बाय मीरा."

"बाय सुषमा..."

🎭 Series Post

View all