तिचा पगार -हक्क कोणाचा(अंतिम भाग ३)

कथामालिका
तिचा पगार _हक्क कोणाचा?

मीनाताई बोलू‌ लागल्या. त्यांच्या मनातील एक एक कप्पा उलगडत होत्या. त्यांचा एक एक शब्द माझ्या मनावर आघात करत होता.

"सुषमा माझ बालपण खूप खडतर गेल.‌ सकाळी जेवल्यानंतर संध्याकाळी जेवायला मिळेल की नाही याची खात्री नसायची.‌ घरच्या परिस्थितीमुळे वडीलांनी लवकर लग्न करून दिले. यांची सरकारी
नोकरी होती.‌ पण घरातील वातावरण खूप कडक होते. त्यामुळे मी जरा दचकून राहात होती. यांचा पगार सर्व सासुबाईंच्या हातात जात होता. मला एक रुपया सुध्दा मागायची उजागरी नव्हती. पण आपल्याजवळ आपला पैसा असावा, मनासारखा खर्च करता यावा. अस सतत मला वाटत‌ होत. घराच्या बाहेर पडून काम करणे शक्य नव्हते. कारण, तेवढे शिक्षण नव्हते. म्हणून मी शिलाई काम शिकायला सुरुवात केली. हळुहळु मी त्यात तरबेज झाले. यांच्या मागे लागून एक शिलाई मशीन विकत घेतली. नशीब सासुबाईंनी त्यासाठी आडकाठी आणली नाही. मग मी घरीच बसल्या बसल्या सासुबाई , नणंदबाई, काही‌ शेजारी यांचे ब्लाऊज, परकर, टोप्या ,बाळाचे कपडे शिवून देऊ लागली. फार पैसे मिळत नव्हतेच. पण जे मिळायचे ते सुद्धा माझ्या सासुबाईंकडे जमा करावे लागायचे. त्यामुळे नेहमीच मी उदास राहायची.‌ पण वेळप्रसंगी सासुबाई त्यांनी जमा केलेले पैसे खर्च करत असत. त्यामुळे ती वेळ किती कठीण असायची. हे मला कळायचे नाही. मग मी सुध्दा ठरवले. दहा रुपये येत असतिल. तर मी आठ रुपये त्यांना देऊ लागली आणि दोन रुपये स्वतः कडे ठेवू लागली. त्यामुळे नकळतपणे मलाही बचतीची सवय लागली. त्यातूनच मी माझ्या आईला सुध्दा मदत करु लागली. पण ही गोष्ट सासुबाईंच्या कानावर गेली. तेव्हा त्यांनी मला हीच गोष्ट समजावून सांगितली. तेव्हापासून मलाही एक कानमंत्र मिळाला. घरच्यांपासून कोणतीही गोष्ट लपवायची नाही. कारण कोणतीही वेळ सांगून येत नाही आणि अशा प्रसंगी आपण कुटुंबासोबत खंबीरपणे उभे राहू याचा खात्री असावी लागते."

"आई, मी चुकले. खरच मला माफ करा. माझा तुमच्या विषयी गैरसमज झाला होता. मी त्यात च अडकून पडले होते. कळत नकळतपणे माझ्या मनात तुमच्या विषयी आकस निर्माण झाला होता. पण आता नाही.‌ येथून पुढे लपवून कोणतीही गोष्ट करणार नाही."

"काय चालल्या सासु सुनेच्या गप्पा."

"अहो, तुम्ही कधी आलात ?"

"आम्ही दोघेही आलो. वरूणचा फोन आला होता. मग मी त्याच्या सोबतच आलो."

"काही नाही बाबा. एक गैरसमजुतीचे वादळ आल होत." सुषमा

" पण ते आता आम्ही दोघींनी परतवून लावले." मीनाताई

©® अश्विनी मिश्रीकोटकर


🎭 Series Post

View all