तिचा पगार _हक्क कोणाचा(भाग २)

कथामालिका
तिचा पगार: हक्क कोणाचा?

सासुबाईंचा फोन येताच सुषमा पटकन घरी निघाली. जातांना तिच्या डोक्यात विचार आले. आज सासुबाईंना खुश करायचे आणि त्यांच्या मनात नेमक काय चालल आहे. ते ओळखता तरी येईल. आज घरी वरूण सुध्दा नाही आणि सासरे सुध्दा त्यांच्या मित्रांकडे बाहेरगावी गेले होते. त्यामुळे निवांत वेळ होता.

ती घरी पोहोचली.

"काय ग सुषमा? सामान कुठे आहे."

"आई दुकानात खूप गर्दी होती.‌ त्यामुळे वेळ लागला असता. मग मी सामानाची यादी देऊन आली. ते सामान घरपोच पाठवणार आहे."

तिने आल्या आल्या तिच्या बाळासाठी खिचडी बनवली आणि स्वतः साठी सासुबाई साठी स्वयंपाक केला.

त्यानंतर हळुच तिने एक पुडके समोर केले.
"आई, हे बघा काय आहे?"

मोगऱ्याचा सुगंध घरभर दरवळला. सासुबाईनी अधाशीपणे उघडले आणि त्यांनी फुलांचा मन भरून सुवास घेतला. त्यांना खूप आनंद झाला आणि तो त्यांच्या डोळ्यात दिसून आला. त्यांनी लगेचच केसात गजरा माळला.

"सुषमा खूप खूप धन्यवाद."

"त्यात काय एवढे."

"आई, मला तुम्हाला अजून एक गोष्ट द्यायची आहे हे घ्या."

"आता हे काय?"

"आई हे तुमचा दर महिन्याला तुम्हाला लागणाऱ्या खर्चाचे पैसे. तुम्ही हवे ते हवे तेव्हा खरेदी करू शकता."

"काय!"

"आई एवढ आश्चर्य वाटण्यासारखे काय झाले. मला ही गोष्ट खूप आधीच करायची होती. पण आता सुरूवात केली. आता दर महिन्याला तुम्हाला बाबांसमोर किंवा यांच्यासमोर ही हात पसरवायची गरज नाही."

"सुषमा."
त्यांच्या डोळ्यात अश्रू जमा झाले.

"मी नाही घेऊ शकत ."

"का?"

"कारण , काम तू करते. तुझा पैसा आहे. तुझा पगार येतो. त्यावर माझा हक्क नाही असू शकत ग."

"आई, माझा पगार असला तरीही त्यावर हक्क सर्वांचा आहे. ज्याप्रमाणे माझ्या आई साठी मी सध्या खर्च करत आहे. कारण ती माझी आहे. त्याचप्रमाणे तुम्ही सुद्धा माझ्याच आहेत. मी तुमची आहे. त्यामुळे मला वाटत हे पैसे तुम्ही ठेवायलाच हवे."

"पण नको ग. पैशामुळे नात्यांमध्ये वितुष्ट येतात. कारण तू तुझ्या आईला पैशाची मदत करते‌. ही गोष्ट मला बाहेरून माहिती झाली. तेव्हा आमच्या आत्मसन्मानाला तडा गेल्यासारखे आहे. तू हे मला सांगायला हवे होते. ही गोष्ट वरूणला माहिती आहे का?"

"हो. वरूणला सांगितले होते. पण तुम्हाला किंवा बाबांना सांगायची हिम्मत झाली नाही आणि मला तशी गरजही वाटली नाही."

" गरज. सुषमा जरी मुलीच लग्न झाल असले‌. तरीही माहेरची ओढ तिला राहणारच. हे कळतय मला. मी सुध्दा अजुनही माहेरपणाला जातेच ना. पण आपल्या सासरी सुध्दा कोणालाच अंधारात ठेवू नये. तू सक्षम आहे. तुझ्याजवळ पैसा आहे. समजा उद्या जर तू एखाद्या मैत्रिणीला पैशांची मदत केली आणि ही गोष्ट कोणालाच माहीत नसेल. काही लिखापढी नसेल. तर ती पैसे परत करायला नकारही देऊ शकते. आता ठीक आहे. हा माहेरचा प्रश्न आहे. पण नाती आणि व्यवहार या दोन गोष्टी वेगळ्या ठेवायला हव्या. तू माहेरी पैसे दिले यापेक्षाही तू आम्हाला न सांगता पैसे दिले याचा राग आला आहे. हेच जर तू विश्वासात घेऊन सांगितले असते. तर याचा आम्हाला राग नसता आला."

"पण आई, माझा पगार मी कुठेही खर्च करू शकते ना . पण मी घरी तर दुर्लक्ष करत नाही ना."

"अग तस नाही. उद्या जर माझ्या मुलीकडून जर मी काही पैसे घेतले आणि नंतर तुम्हा सगळ्यांना कळले. तर... तुम्ही काय म्हणाल की आम्ही काय कमी करतो का? आम्ही काय पैसे देत‌ नाही का? मुलीसमोर हात पसरवायची काय गरज होती. जावयासमोर आणि सासरच्या मंडळींसमोर तुमच्या माना खाली जाईल."

"आई तस काही होणार नाही. तुमचे विचार वेगळे आणि आमचे वेगळे. आई माझ्या माहेरी सध्या चांगली परिस्थिती नाही. भावाच हे शेवटच वर्ष आहे. पुढच्या वर्षी तो नोकरीली लागेलच. शिवाय बाबांची बराच पगार सुद्धा कट होतों आहे. तेव्हा मी मुलगा बनून त्यांची मदत केली. तर काय बिघडले !"

"नाही, बिघडत काहीच नाही. माझं एवढच म्हणण आहे की तू समतोल साधावा. तू आता अशा नावेत प्रवास करत आहे की सासर आणि माहेरच्या पैलतीरावर अविश्वासाच्या लाटा येऊ देऊ नकोस. या तीरावरून त्या तीरावर जाण्याचा तुझा प्रवास सुखकर व्हावा हीच इच्छा. राहिला प्रश्न किराण्याचा. मी तो संपण्याच्या आधीच का सांगते. तर कसं असतं कुटुंबाची आवश्यकता किती आहे. कोणती गोष्ट कधी कमी जास्त लागते. ते बघायला हव. वेळ प्रसंगी आपण तयार असलो पाहिजे."

तेवढ्यात बाळाच्या रडण्याचा आवाज आला. त्याला दुध हवे होते. ती स्वयंपाक घरात दूध आणायला गेली. पण दूध संपले होते.

"आई दूध नाही का घरात?"

"नाही ग. तुला यादी पाठवली होती. त्यात दुध लिहीले होते. तू आणले नाही आता तर काय करणार?"

रात्रीचे नऊ वाजले. आता कुठे भेटणार दुध. परत लांब जावे लागणार आणि बाळ जोरात रडत होता. त्याला खूप घाई होती दूध घेण्याची."

पण सासुबाईंनी आधीच दूध आणून ठेवले होते. ते दिले. "हे घे बाळाला दूध दे. दुध पिल्याशिवाय झोपणार नाही माझ्या लबाडाला."

"आई दुध आणून ठेवल होत आधीच."

"अग संसाराच असच असत. सगळ आधीच हाताशी ठेवावं लागत. नाही तर वेळेवर फजिती होते."
दुध पिऊन बाळ परत झोपी गेला.

"पण सुषमा बाबांना आणि वरूण जर कळले की हे पैसे माझ्या कडे कोठून आले ? तर काय सांगणार?"

"आई काळजी करू नका. तुमच्या मुलीने दिले सांगा आणि तिच्यावर आणि तिच्या पगारावर तुमचा हक्क आहे असेही सांगा."

मीनाताईंच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. सुषमा मला तुला काही सांगायच आहे.‌

काय सांगतात मीनाताई पाहुया पुढच्या भागात...

©® अश्विनी मिश्रीकोटकर

🎭 Series Post

View all