काव्याच्या घरची परिस्थिती फारच गरीब होती. एक दिवस घरात खाण्यासाठी काही शिल्लक नव्हते त्यावेळी घरातील सर्वांनी पूर्ण रात्र उपाशी झोपून काढली पण कोणाकडेही हात पसरले नाहीत. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून पडेल ती कामे केली व पोटाची भूक भागवली. काहीही झाले तरीही "कोणाकडेही हात न पसरता स्वाभिमानाने जगण्याचे बाळकडू हे तिला लहानपणीच मिळालेले होते" .
"काव्याचे लग्न हे एका श्रीमंत कुटुंबात झालेले होते". घरामध्ये आर्थिक टंचाई निर्माण होणे शक्यच नव्हते .
काव्याला एक दिवस खरेदीसाठी बाहेर जायचे होते. खरेदीसाठी घरामध्ये पैसे कसे मागायचे असा प्रश्न तिला पडला. काव्या मनामध्येच विचार करत होती .घरामध्ये पैसे तर खूप आहेत पण ते मागायचे कसे . लहानपणापासून कोणती गोष्ट कोणाला मागणीची कधी वेळच आली नाही. बाबा सर्व गोष्टी मागण्या आधीच पायाजवळ आणून द्यायचे. आणि जसे कळायला लागले तेव्हापासून मी मला लागणाऱ्या सर्व गोष्टी स्वकमाईतून खरेदी करू लागले. प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीसाठी घरातून पैसे कसे मागणार. काव्या मनातच विचार करत होती .
काव्याने एक दिवस तिच्या नवऱ्याला विचारले काय हो मी घरी मुलांचे क्लासेस घेतले तर चालतील का?
काव्याचा नवरा तुषार बोलला तुला क्लास घ्यायची गरज काय आहे .आपल्याकडे पैशांची कोणती अडचण नाही.
"काव्या, मला माहितीये आपल्याकडे भरपूर पैसे आहेत".पण मी पैशांसाठी नाही तर माझ्या स्वाभिमानासाठी क्लास घ्यायचे ठरवले आहे.
स्वाभिमान! कसला ,स्वाभिमान तुषार बोलतो ......
मला प्रत्येक गोष्टीसाठी घरातल्या पैशांवरती अवलंबून राहावे लागते आणि हे काही मला पटत नाही.
"तुषार, पण हे घर आणि या संपत्तीवर जेवढा हक्क माझा आहे तितकाच हक्क तुझाही त्यावर आहे".
"काव्या, हो ते मला माहिती आहे पण तरीही.... लहानपणापासून आम्हाला वडिलांनी प्रत्येक गोष्टीसाठी कोणाकडे हात पसरायची सवय लावलेली नाही.
तुषार बोलतो अगं हे कोणाचेही नाही हे सर्व तुझच तर आहे मग का तुला क्लासेस घ्यायचे आहेत.
हे बघा मला तुमच्या पैशातून एखादी वस्तू खरेदी केल्यानंतर जेवढा आनंद मिळतो त्यापेक्षा दुप्पट आनंद ज्यावेळी मी ती वस्तू माझ्या स्वतःच्या कमाईतून खरेदी करेल त्यावेळी होईल. आणि फुकट मिळालेल्या वस्तूंची किंमतही कळत नाही.
तुषारलाही काव्याचे बोलणे पटते. तो काव्याला क्लास घेण्यासाठी होकार देतो. काव्या हे मी फक्त तुझा स्वाभिमान जपण्यासाठी केले आहे.
काव्याला खूप आनंद होतो. काव्या तुषारला बोलते तुषार माझा क्लासचे नाव असेल स्वाभिमान क्लासेस.....

Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा