तीचे अस्तित्व (भाग - एक )

एक हृदय स्पर्शी कथा
जलद कथामालिका - एप्रिल २०२४

विषय : तीचे अस्तित्व - तीची फरपड

ट्रेलर :

विशाखा

"का नेहमी तिनेच झगडायचं आपल्या अस्तित्वासाठी? आधी एक मुलगी म्हणून मग एक बायको म्हणून आणि मग एक आई म्हणून का आम्हाला मन नाही? आम्हाला वाटत नाही कुणी तरी आमचं ही कौतुक कराव आमच्यावर प्रेम कराव? काय अपेक्षा असतात आमच्या इतकच न की सगळी काम झाल्यावर शांत झोपताना ऍटलीस्ट नवऱ्याने प्रेमाचे दोन शब्द बोलावेत. पण हाच नवरा साध डुंकून ही बघत नसेल तर? मग प्रश्न उभा राहातो तो अस्तित्वाचा हो मी बदलणार माझ अस्तित्व. मी विशाखा आणि ही कथा माझी आहे माझ्या अस्तित्वाची आहे."

तीचे अस्तित्व (भाग - एक )

गोकुळ निवास...

वेळ सकाळी ५ : ३० वाजताची...

विशाखा नेहमी प्रमाणे आजही साडे पाच वाजता उठली आणि तीने सगळ लगेच आवरून घेतल सकाळचा स्वयंपाक झाडझूड मुलांचा डबा नाश्ता सासऱ्यांची देव पूजेची तयारी ही करून ठेवली.

काही वेळा नंतर...

बाकीचे ही उठले तोच तीने सगळ्यांच्या चहाची तयारी केली.

"अहो तुमचा चहा." विनोदला पेपर आणि चहाचा कप देत विशाखा म्हणाली

"हं ठेव तिकडे." तीच्या कडे लक्ष न देता विनोद म्हणाला

आणि तो न्यूज पेपर वाचण्यात मग्न झाला. ते बघून विशाखा टेबलावर चहा ठेऊन निघून गेली.

"शी... बाई आज तर खूपच उशीर झाला ह्यांना लवकर निघायचं होत मुलांची शाळा आई बाबांच ही सगळ बघायचं आहे कस होणार थोड अजून लवकर सुरु करायला हव. आता अजून वेळ व्हायला नको म्हणजे मिळवलं." आवरता आवरता विशाखा मनात पुटपुटली

तोच शारदा (सासुनी) तीला आवाज दिला.

"विशाखा ए विशाखा आलीस का ग." शारदा

"हो...हो आई आले बोला काय म्हणताय?" पदाराला हात पुसत विशाखाने सासूला विचारलं

विशाखा ही एक सुंदर देखणी पण चाळीशीतली सिडशिडीत बांधा असलेली मुलगी होती तीच अरेंज मॅरेज झालेल होत.

तीच्या कुटुंबात नवरा दोन मूल सासू सासरे लहान दीर आणि जाऊ असा पूर्ण परिवार होता आणि या सगळ्यांची एक मोठी सुन म्हणून तीच्यावर जबाबदारी होती.

आणि ती ती जबाबदारी शांतपणे संयमाने पूर्ण करण्याचा प्रयत्न ही करत असे पण का कुणास ठाऊक ती नेहमी घरच्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात कमी पडत असे.

आणि म्हणून तीची आणि धाकट्या सुनेची तुलना ही होत असे तसेच आजही झाल.

क्रमशः