Login

तिचे जग भाग 18

Tiche Jag Bhag 18


तिचे जग भाग 18


रेणुकाचा संघर्ष वाढला. रेणुका एकटीने धीराने तोंड देणे चालू होते. एकीकडे दिराचा व्यभिचार.. दूसरीकडे रेणूकाला अपमानास्पद वागणूक, सासूरवास.. एकीकडे रेणूंच्या जवाबदाऱ्या मूलांचे भविष्य.. दुसरीकडे घरकाम, स्वयंपाक, सणवार यात दिवसभर करून दमून भागून जाणारी रेणुका. यात माहेर किंवा आई, बाबा, भाऊ नाही. परिस्थिती आणखी अवघड झाली. परीस्थिती परीक्षा घ्यायची म्हणाली की सगळ्या बाजूने त्रास सुरू होतो.


देवेंद्र महाविद्यालयात प्रभारी प्राचार्य झाला. जवाबदारी वाढली होतीच. पण संस्थेच्या वादात, शिक्षकांच्या गटबाजी, राजकारण यात प्राचार्य भरडला जात होता. पगार नाही. कोर्टकचेरी, पोलीस, वकील हे मागे लागले. 2 वेळेला जेलमध्ये जावे लागले. काही दोष नसताना. फरार राहावे लागले. यात किती वर्षे गेली. यामुळे पगार नाही. तर किती प्रश्न निर्माण झाले. मानसिक, आर्थिक, शारीरिक त्रास खुप झाला. देवेंद्र चा काही वर्षानी पगार झाला. तो वकील, कोर्ट कचेऱ्या मध्ये गेला. आर्थिक हातभार रेणुकाने लावला. रेणुकाने काही शिक्षणाच्या बळावर नोकरी, व्यवसाय केले. कायदेशीर सल्लागार म्हणून काम केले.रेणुकाने ऊन पाहिले नाही. दिवस पाहिला नाही. रात्र पाहिली नाही. नोकरी आणि व्यवसाय केले.


पगार कमवत असताना उलट सासुबाईची बोलणी खाल्ली. कारण त्या म्हणत होत्या. कमवते तरीही घरची कामे, चूल आणि मूल यातून कधीच स्त्रीची सुटका नाही. स्त्रीलाच करावीच लागणार. नोकरी करते तर ती तिच्या संसारासाठी धावते. सासूबाई म्हणाल्या काय मला पैसे काढून देते का? सासुबाईना कौतुक तर नव्हते उलट त्यांनी घरचे कसे केले इतके वर्ष, सासूबाईंनी किती सासूरवास सहन केला. सासूबाईंनी खटल्याच्या घरात किती कष्टांत संसार केला, त्या शेतात राबल्या, घरची कामे केली, सणवार केले, पै पाहुणे पाहिले, घरीच धुणी, भांडी केली, उन्हाळ्यात वाळवण खारोड्या आणि कुरड्या खटल्याच्या घरात 25 - 25 किलो केल्या हेच सांगत होत्या आणि रेणूकाने घरीच वाळवण केली पाहिजे पुढे मूलीला मोठी झाल्यावर शिकवले पाहिजे असा आग्रह धरला. रेणुका वाळवण करत नाही म्हणून त्या नाव ठेवायच्या. मुलांना म्हणायच्या मी आहे तोपर्यंत खाऊन घ्या.


परीच्या पाचव्या वाढदिवशी रेणुकाचे नातेवाईक लांब आहे. सुट्टी नाही. आजारी आहे. वय झाले. अशी कारणे सांगत कोणी आले नाही. सासूबाईंच्या माहेरचे आले. सासुबाईनी बोलून दाखवले. रेणुका.... बाई तुला माहेरचे कुत्र नाही. हे असे बोलणी रेणुका साठी खपली काढण्याचे काम करत होती. ऐकून घेतले रेणूने काय म्हणणार होती.


नोकरीला जाणाऱ्या आईची व्यथा मूलगा आधीच दूरावला मनाने, शरीराने. आता मोबाईल गेम खेळणे, जेवणात हे नको तेच तेच पाहिजे. आजी आणि आजोबा लाड करायचे. रेणुका इकडे नोकरीच्या गावी. सासू, सासरे आणि मुल गावी. मूलगा साधा फोनवर आईशी बोलेना. आईचे ऐकेना. आई सगळ्या भाज्या खा. अभ्यास करत जा सांगायची. मुलांच्या चांगल्या करता आई आणि बाबा कधी रागावतात. प्रसंगी मारतात. मुलांच्या लक्षातच येत नाही ते त्यांच्या चांगल्यासाठीच होते. कधी आजार बरा होण्यासाठी कडू औषध, इंजेक्शन घ्यावे लागते पण आजी आणि आजोबा यांच्या अति लाडाने, बाजू घेण्याने, रेणुकाने साधी एक चापट मारली तरी रेणुकाला सासुबाई आणि सासरे यांच्या रागाला, बोलणी खाण्यासाठी सामोरे जावे लागत होते. शेवटी मूलगा ऐकत नव्हता. अभ्यास करत नव्हता म्हणून सैनिकी शाळा यात घातले तिथे रहाणे, खाणे, पिणे, शिक्षण, खेळ, अभ्यास करून घेतात. राज हा रेणुकाच्या जवळ नव्हता. आई पेक्षा काका जवळचा होता. काका मुलांचे लाड करायचा. मुल लहान होती. आईशी हा काका काय वागतो हे त्यांना कळत नव्हते. आई आपल्याच चांगल्याच साठी बोलते हे कळत नव्हते. हि गोष्ट रेणूकाला जास्त मानसिक त्रास देत होती.



दिराने रात्री उशिरापर्यंत जागणे, झोपेत असताना मोठ्या सख्ख्या वहिनी च्या छातीला हळूच येऊन मांजरी च्या पावलानी येणे हात लावणे, चाटणे केले. एकदा रेणुकाला थुंकीचा वास आला. रेणुकाला खुपच मानसिक त्रास सहन करावा लागत होता. रोज सकाळी रात्री इतकी झोप का लागते म्हणून पश्चाताप. उपाशी पोटी झोप येणार नाही म्हणून रात्री उपाशी पोटी, अर्ध पोटी झोपायची. रात्रभर जागून काढणे शक्य होत नव्हते तिला. दिवसभर कामाने दमून भागून जायची. बहीण हे छान नाते जपले गेले खरंच तर बहीण भावाच्या नात्यात किती आनंद होईल. कुणा कडून अपेक्षा चूक झाली आहे. सख्खे भाऊ आजकाल विचारेना बहिणीला. रेणुकाने यात तोंड दाबुन बुक्क्यांचा मार सहन केला. वरतून चांगला वागणारा. झोपेत गैरफायदा घेतो हे नवऱ्या समोर दिराला रंगेहात पकडायचे होते रेणुकाला. आणि तिला हे सिध्द करायचे होते नवऱ्याला ती खरे बोलते. तिचे दुःख, तिची अगतिकता. ज्या मैत्रीणीला सांगितले त्या काही करू शकत नाहीत. जे करायचे एकटीने रेणुकाला कळून चुकले. रेणुका नवऱ्याला म्हणाली तो दीर रंगेहात पकडला मग काय कराल. नवरा म्हणाला बघेन मग.... का? स्त्रीने कायम सिध्द करायचे? का? हे प्रश्न चिन्ह तिच्या समोर होते. तिची छाती दुखत होती. नवरा चांगल्या स्त्रीरोगतज्ज्ञा डॉक्टरीण कडे घेऊन गेला. रेणुकाला कारण महित होते डॉक्टरीण बाईने गोळ्या हार्मोन्स चेंजेस होतात असे म्हणून भारी गोळ्या दिल्या.



स्त्री म्हणून चूल आणि मूल पहा. नवऱ्याच्या अडचणीत घरासाठी आर्थिक हातभार लावा. सासूरवास, दिराचे तसे वागणे. स्त्री म्हणून खच्चीकरण करणे असते. सगळ्या अडचणीत तिने स्वतःला उभे करणे मोठी गोष्ट आहे. तिने इथेच लढाई जिंकली. तसेच त्रास सहन करत जगणे स्त्रीयांच्या पाचीला पुजले आहे. माहेर राहिले नाही. सासरी शेवटी तुम्ही परक्या घरातूनच आलेल्या अशी वागणूक सूनाना दिली जाते. स्त्रीची अवस्था धोबी का कूता.. घर का ना घाट.... रेणुकाचा नवरा कायम भावाची बाजू घेत होता. रेणुकाच्या बाजूने कधीच उभा राहिला नाही. रेणुकाचा नवरा तिला म्हणाला की - मी, माझे आई, पप्पा, भाऊ चौघे जमलो की आम्हाला कुणाची गरज नाही. आम्ही चौघे जमलो की आमचे जग पुर्ण होत. मग कोणी नको आम्हाला.



रेणुकाने दिराच्या छुप्या पद्धतीने त्रास देण्याला जेव्हा आत्महत्या पर्याय डोक्यात येईल तेव्हा असा विचार केला की आपल्या जन्माच्या वेळी आपल्या आईने किती त्रास सहन केला. आपल्याला जन्म दिला. आपल्याला मनुष्य जन्म मिळाला. आपण आयुष्यात येऊन काही चांगले करून दाखवलेच पाहिजे. आपल्या आई आणि बाबाचे नाव मोठे तर केलेच पाहिजे. यासाठी काही चांगले करून दाखवायचे हा प्रयत्न रेणूका करत होती. रेणुका एकाच वेळी एकटीने खुप गोष्टींना तोंड देत ऊभी आहे. लढते आहे तिचा संघर्ष सुरू आहे. संघर्ष वाढला पण कमी होत नाही आणि तिनी शेवटी जिंकून दाखवायचे मनाशी पक्के केले आहे.. हेच हार ना मानणारी रणरागिणी आहे. आपले युध्द आपणच करायचे आणि जिंकायचे हि जिद्द आहे. स्त्री तुझ्यात दुर्गा आहे. जागृत कर ऊठ. तुझ्यातला धगधगत्या ज्वाला आहे. हे विचार रेणूका मनात करत होती. परिस्थिती सगळ्या बाजूने विरूद्ध असली तरी रेणूकाने आपले अस्तित्व निर्माण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करून आपल्या पायावर उभं रहाण्याचा प्रयत्न करून आपले पाय घट्ट रोवून आपल्या क्षेत्रात चांगली कामगिरी करून दाखवण्याचा निश्चय आणि त्यासाठी झगडत रहाणे चालू आहे. रेणुकाचे जग रेणूकाचे खच्चीकरण करत होते. विश्वास कमी करत होते. जगण्याची उमेद संपवावी अशा परिस्थितीत उभे रहाणे म्हणजे फिनिक्स पक्षाच्या सारखे राखेतून परत येणे आहे. रेणुकाचे जग तर त्रिशंकू अवस्था करून ठेवत होते. कशात रस घ्यावा असे वाटत नव्हते. तरी ती मात्र उभी रहात होतीच. हे फक्त एक स्त्रीच करू शकते.


क्रमशः

सौ. भाग्यश्री चाटी सांबरे.
©®


हि एक काल्पनिक कथा आहे. स्त्रीवादी कथा मालिका आवडली तर शेअर, लाईक करा. कमेंट करायला विसरू नका.

🎭 Series Post

View all