Login

तिचे जग भाग 19

Tiche Jag Bhag 19


तिचे जग भाग 19


सासुबाई रेणुकाला म्हणाल्या - माझ्या माहेरच्या लोकांना या बसा करणे. आले की चहा पाणी देणे. माझ्या माहेरच्या लोकांना धरून रहा. तुझ्या माहेरचे कुत्रे नाही. वेळे - काळी, सुख - दुःखाला तुला लागतील. माझा गणगोत खुप मोठा आहे. माझ्या एवढे डोक्यावर केस नाही एवढा मोठा गणगोत आहे माझा. माझे माहेरचे धरून आहे सगळे.


सासरे रेणुकाला म्हणाले - माझा काही त्रास नाही रेणुका तुला. माझे कोणी नातेवाईक नाही.( सासरे यांचा इतिहास थोडक्यात सासऱ्यांना त्याच्या चुलत काकांना दत्तक दिले. दत्तक विधान केले नाही तोंडी दत्तक दिले. सासरे सख्ख्या सोबत राहिले पण दत्तकांची प्रॉपर्टी मिळाली. सख्ख्या बहिण आणि भावाने सासऱ्यांना घरातून बाहेर काढून दिले, प्रॉपर्टी वरून कोर्ट कचेऱ्या चालू होत्या.)


रेणुका सासुबाई ना म्हणाली - माझी एक आई येत होती. तिला कधी आली. तर तिच्याशी साध कोणी बोलत नव्हते. तिला कधी या बसा नाही. मात्र तुमच्या माहेरचे इतकी माणसे कोणी आले की मी मात्र पळू पळू करायचेच. सूने कडून अपेक्षा खुप. सुने कडून करूनच घ्यायचे.

रेणुका देवेंद्रला म्हणाली - सासुबाईच्या माहेरी खुप गोतावळा आहे. कायम काही ना काही कार्यक्रम चालू. डोहाळे जेवण, बारसे, वाढदिवस, साखरपुडा लग्न, मुंज, कोणाचा दहावा, तेरावा आणि बहुतेक वेळा कार्यक्रमात अशीच पध्दत सगळ्या नातेवाईक बायकांनी जमायचे सगळा स्वयंपाक करायचा. त्यानीच पुरूष आणि मुलांच्या पंगती वाढायच्या. स्त्री सगळ्यात शेवटी जेवतील. संध्याकाळी. बायकांची भुक लागून मरून गेलेली. शेवटी काही अन्न जात सुध्दा नाही. सगळे अन्न थंड झालेले. काही उरले तर काही संपलेले.


देवेंद्र म्हणाला - यात काहीच नवीन नाही. स्त्रियांचे कामच आहे. हेच पिढ्यानपिढ्या चालत आले आहे. मला सांगून मी काय करू.

रेणुका मनात म्हणाली - नवऱ्या जवळ बोलू शकत नाही का. बोलून काही उपयोग नाही.

रेणुका देवेंद्रला म्हणाली - नेहमीच नोकरी, व्यवसाय, लहान मुल , देवेंद्र ची कामे यात अडकून काही कारणाने कार्यक्रमात जाऊन स्वयंपाक करणे, वाढू लागणे रेणूकाचे करणे होत नाही. मग मावस नणंदा, मामे नणंदा, मामे जावा, मामे दिर यांचे प्रत्येक कार्यक्रमात वाटेल तसे बोलणे. अपमानास्पद वागणूक ठरलेली. म्हणुन मी सुखाच्या दुःखाच्या सगळ्या कार्यक्रमांना जाणे सोडले. रेणू देवेंद्र ला म्हणाली.


रेणुका पुढे देवेंद्र ला म्हणाली - आपल्या कडे कार्यक्रम असले. एक जण मदतीला येत नाही. आपल्याकडे आपण केटरिंग ठरवतो. आपण कुणाकडून येऊन राबावं अशी अपेक्षा करत नाही.


देवेंद्र रेणुला म्हणाला - यामुळे आई तुला रागावते. तुला नातेवाईक धरून ठेवता येत नाही.


रेणुका देवेंद्रला म्हणाली - मलाच वर परत. सासुबाईचे नातेवाईक आतापर्यंत किती. काय काय बोलले आहेत.
साधे गेले की मावस नणंदा आली.. पाणी विचारा महाराणी आल्या.. काही स्वयंपाक केला नसेल पहिल्या पंगतीला जेवायला बसले मामे दिर काय नशिबवान.. असे नशीब पाहिजे..


रेणुका देवेंद्रला म्हणाली - कष्ट केले तरी बोलणी खाल्ली आहे. रेणुका म्हणाली. भांडी घासली तर मावस नणंद आणि मामे दिर कधी नव्हे ते काम केलं म्हणून अमेरिकेचे मोलकरीण म्हणाले. हे रेणुका देवेंद्रला सांगत होती. वर ह्याच मावस नणंदेने रेणुकाला ब्लॉक केलेले. देवेंद्र म्हणे हो तू आहे स्टॅण्डर्ड मोलकरीण. तू जास्त स्टॅण्डर्ड रहाते / दाखवते. कधीही देवेंद्र रेणुकाच्या बाजूने ऊभा राहिलाच नाही.


रेणुकाची सख्खी चुलत एक लहान भाची दिवाळीत रेणुकाच्या सासरी गावी रहायला मुक्कामी 8 दिवस होती. नंतर रेणुकाचा परीवार सासरच्या गावाहुन नोकरीच्या गावी आली तिच्या सोबत आली तिची भाची. सासू, सासरे गावी राहिले. रेणुका आणि भाची दोघीच बेडरूम मध्ये झोपल्या. रात्रभर भाची सांगत होती. रेणुका मावशी तुझ्या सासूबाई तुझ्या माघारी गावी आता दिवाळीत मला हे तुझ्या विरोधात सांगितले.... हे तुझ्या बद्दल सांगत होत्या तुझ्या सासुबाई.. पहाटे चार वाजेपर्यंत भाची कनक हिने शप्पथ घेऊन खरचं तुझ्या सासुबाईनी मला हे सांगितले. ते सांगितले. हजार किस्से आणि गोष्टी रेणुकाच्या विरोधात सांगितले. रेणुकाच्या सासुबाईने. भाची कनकने सगळे रेणुकाला सांगितले.


रेणुका देवेंद्रला म्हणाली - आईने कनकला आता दिवाळीत माझ्या विरोधात हजारो किस्से आणि गोष्टी सांगितल्या. माझ्या माघारी. कनकने रात्रभर सगळ्या मला सांगितल्या. ज्या काही खोट्या आहे. काही अतिशयोक्ती करून सांगितले आहे. काही तिखट, मीठ लावून सांगितल्या आहेत.



देवेंद्र रेणुला म्हणाला - माझ्या आईला महित होते. तुझी भाची तिने सांगितलेले हि भाची तुझी सगळे तुला सांगेल म्हणून मुद्दाम सांगितले माझ्या आईने तिला. म्हणजे तु सगळ्या सुधारणा तुझ्यात करशील.


रेणुकाच्या बाजूने एकदा नवरा बोलत नाही. रेणुका म्हणाली देवेंद्रला - लाख वेळा तुम्ही आई, भाऊ च बरोबर सांगता. एकदा तरी रेणूका बरोबर असेल ना? कायमच आई, वडील, भाऊच कसे बरोबर.. इतक्या वर्षात एकदाही रेणुका बरोबर असे तुम्ही म्हणत नाही. आई, वडील, भाऊ सगळे धुतल्या तांदळाच्या सारखे. रेणुका कायमच वाईट..


रेणुकाची एक जिवलग मैत्रीण फोन वर रेणूला म्हणाली - मी माहेरी आलेली आहे. आपण भेटू. खुप वर्षांनी मैत्रीण भेटणार रेणुकाला आनंद.


रेणुकाची मैत्रीण घरी आली रेणुकाला भेटायला. सुट्टीच्या दिवशी. रेणुका खुप खुश.


देवेंद्र आणि लहान दिराने रेणुकाच्या तक्रारी मैत्रीणीला सांगायला सुरूवात केली. - रेणूका वाळवण कुरड्या करत नाही. आमच्या आईने 25 किलो केल्या कायम. रेणुका धुणी आणि भांडीला कायम बाई लावते. आमच्या आईने घरी केलेले कायम. रेणुका अशी. रेणुका तशी.

रेणुकाची मैत्रीण रेणुकाला म्हणाली - तुझ्या विरोधात ऐकून चांगले वाटत नाही. मी काय बोलणार? नंतर परत मी तुझ्या घरी येणार नाही. आपण बाहेर भेटूया. एकुलती एक मैत्रीण घरी आली तिचे परत येण बंद केले.


रात्री नैवेद्य दाखवायचा होता. सण होता. रेणुकाने सगळा स्वयंपाक केला. रेणुकाच्या पायाला खुप भेगा झाल्या होत्या. भेगा आग करत होत्या. एवढा स्वयंपाक करून ओटा, गॅस खराब झाला होता.


देवेंद्र म्हणाला - ओटा आणि गॅस स्वच्छ केल्या शिवाय तु झोपती कशी पाहतोच. तु झोपूनच दाखव.

रेणुका भेगा दाखवत होती. भेगा पायाची आग करत होत्या.

रेणुकाच्या तोंडात एक जोरदार लावली देवेंद्रने आणि देवेंद्र रेणूकाला म्हणाला - "ओटा स्वच्छ कर त्या शिवाय झोपायचे नाही. चल ऊठ तु माझी नोकर आहेस."


नवरा बायकोला मारतोच. कधी एखाद चापट. कधी धक्का जोरदार. कधी बुक्का. कधी शिवीगाळ बायकोला करणे. खुप मोठे प्रमाण आहे. घरगुती हिंसाचाराचे. रेणुका वकील असल्याने तिला महित आहे. आपल्या बायकोला मारण्यात नवऱ्याचा काय पुरूषार्थ आहे?


देवेंद्र रेणुकाला म्हणाला - नसेल स्वच्छ करणार तर आताच घराच्या बाहेर निघून जा.


रेणुकाच्या मनात - ती साडे अकराला रात्री एकटी कुठे जाणार होती रेणुका?


भांडण सोडवायला. रेणुकाला बाहेर जाताना अडवायला. दिर वरून खुपच चांगला दाखवायला आहेच. रात्री झोपेत गैरफायदा घ्यायला दिर आहेच. रेणुकाला कधी वाटते नवऱ्याला बेडरूम मध्ये झोपू देऊ नये. दिर रोज गैरफायदा घेत आहे. नवरा दिराला सामील असेल मग संसार करण्यात अर्थच नाही.


रेणुकाला मनात एकटेपणा दाटून आला. दुःख, मानसिक त्रास, सासुरवास, वाईट अनुभव, दिराचा व्यभिचार, नवऱ्याला जेल, पगार नाही. कोर्ट कचेऱ्या मानसिक त्रास, फरार, रेणुकाचे नोकरी व्यवसाय करणे, नोकरी मध्ये वेळ, बॉसिंग सहन करणे, बॉस ची बोलणी खाणे, आई , बाबा आणि माहेर नाही ती खुप मोठी पोकळी.... सख्खे गर्भ श्रीमंत, श्रीमंत, मध्यमवर्गीय नातेवाईक असून एकटी असलेली रेणुका.... किती गोष्टीचे दुःख होऊन डोळ्यातून धाराच वहात होत्या. शेवटी स्त्री एक माणूस आहे. स्त्रीला जगणे मुश्किल किंवा नकोसे करणारा समाज आणि सामाजिक परिस्थिती. मरण स्त्रीयांना मोक्ष वाटावा. अशी परिस्थिती होती. सीता सुध्दा इथे कंटाळून जमीनीच्या आत निघून गेली. रेणुका धरणी मातेलाच विनवणी करत होती मला घेऊन चल....

सौ. भाग्यश्री चाटी सांबरे
©®

हि एक काल्पनिक कथा आहे. सर्व वाचकांना आग्रहाची विनंती आहे. कथा आवडली तर शेअर, लाईक करा. कृपया कॉमेंट करायला विसरू नका.

🎭 Series Post

View all