रेणुकाच्या घरी निता ताई मोठी मावस नणंद येते. आमरसाचा बेत रेणुकानी केला होता. अचानक गळ्यात पडून जोरात रडायला लागते. रेणुका विचारते काय झाले ताई तुम्हाला?
रेणुका नणंद बाई ना सावरून खुर्चीवर बसवून पाणी देते. पाठीवरून हात फिरवते. हॉल मध्ये कोणी नसते.
निता ताई रेणुकाला सांगतात - यांची नोकरी मध्ये बदली झाली..हे त्या गावी एक खोली करून राहू लागले. जेवायला खानावळ लावली. मुलांची महत्वाची वर्षे म्हणून आम्ही इथेच राहिलो शिक्षणासाठी. 8 दिवसापूर्वी दोन पोरांना एकमेकांची काळजी घ्या. जरा यांच्या कडे जाऊन सरप्राईज देते. त्यांना आवडतात ते बेसनाचे लाडू केले म्हणले देऊन येते एक दिवसात. अचानक गेले. तो यांच्या खोलीत शी.... यांना रंगेहात पकडले. हे दुसऱ्याच बाई सोबत होते. रूमवर अशा अवस्थेत. खुपच रडतात निता ताई.
रेणुकाला ऐकून धक्का बसला. ती विचार करते निता ताईची अवस्था काय असेल. बापरे.. इतकच ती म्हणते.
निता ताई आक्रोश करत रडून म्हणत होत्या - इथे घर केले त्याचे हफ्ते कटतात त्यांच्या पगारातून म्हणून मी स्वयंपाकाचे उक्त घेते. दूसऱ्यांच्या घरी जाऊन इतक्या जणांचा स्वयंपाक करते. घरचे सगळे करते. मूलांचे पहाते. काय नाही केलं यांच्यासाठी. संसारासाठी. का? हे का असे वागले? मूलं मोठी झाली. इतके वर्षे त्यांच्याशी एकनिष्ठ राहून त्यांच्यावर इतके प्रेम केले. त्यांच्यावर विश्वास ठेवला. इतक्या वर्षाचा संसार आमचा. का विवाह बाह्य संबंध ठेवले यांनी? का माझा विश्वास घात केला? बायकोचा अपमान आहे हा. स्त्री फक्त नवऱ्या कडून सासरच्या कडून प्रेम आणि सन्मान इतकीच अपेक्षा करत असते. तेही मिळू नये?
रेणुका मनात म्हणाली खरे आहे. चुकला नवरा तर स्त्रीचे आयुष्य वाया जात आहे.
निता ताई पुढे म्हणत होत्या - एकतर मी जीव द्यावा वाटतो नाहीतर घटस्फोट घ्यावा. पण माझ्या मुलांच काय? मला जर सावरले आहे ते रेणुका तुझ्या सख्या लहान दिराने. माझ्या मावस भावाने. मी आज जीवंत दिसते आहे ते त्याच्यामुळेच. त्यांनाही खुप बोलला, समजावले त्याने. रेणुका तुझा सख्खा लहान दिर खुपच चांगला मावस भाऊ आहे माझा. मावस नाही सख्याच्या वर बहिण भावाचे प्रेम आहे आमचे. नेहमी धावून येतो तो मोठ्या बहिणीच्यासाठी.
रेणुका मनात म्हणते. माझा सख्खा लहान दिर तुमच्याशी चांगला आहे. माझ्याशी नाही ना. मी काय त्याचे घोडे मारले आहे? काय महित. तुमच्यासाठी चांगला. माझा मात्र गुन्हेगार आहे. रेणुकाचे आणि लहान दिराचे कायम भांडण व्हायचे आणि रेणुका कायम वाईट होती सासु आणि सासऱ्यांच्या नजरेत. कारण त्यांना महित नव्हते. हा रेणुकाचा सख्खा लहान दिर झोपेत असताना कसा पाठीत खंजीर खुपसतो आहे. त्याला फक्त रेणुका ओळखून होती.
(निता ताई घरी गेल्या जेवण करून ) रेणुकाला मनात वाटले. खरचं निता ताई किती कष्ट करतात. 200 माणसांचा पुरणाचा स्वयंपाक करतात. त्यांच्या नवऱ्याला जाणीव हवी होती. निता ताई ओठांनी खावी अशी पुरणपोळी करतात. मऊ सुद. टंब फुगलेली. त्याच्या हातात अन्नपूर्णा आहे. खरचं चांगल्या निता ताई सगळ्यांच्या कार्याला मदतीला धावून जाणाऱ्या. रेणुकाच्या दोन्ही सिझरच्या वेळी बाहेर निता ताई होत्या. रेणुकाच्या बाळंतपणात डिंकाचे लाडू करायला निता ताई होत्या. रेणुकाला बाळंतपणात डबा घेऊन दवाखान्यात निता ताई आल्या होत्या. रेणुकाला निता ताईची जाणीव होती. नवऱ्याला माफ करून मुलांकडे पाहून संसार करत आहे. नवऱ्या वर लक्ष ठेवून,कडक बोलून, 4 जणांनी समजावून नवरा त्यांचा आता चांगलाच वागो. काय हे पुरूष.. निता ताईंना पण आई, बाबा, माहेर नाही.
रेणुका लहान दिराला म्हणायची - "में तेरी नस नस सें वाकीफ हूँ" | माझ्या समोर नाटक नाही चालणार. मी तूला चांगलाच ओळखून आहे. मी तुझे पितळ उघडे पाडीन. मी तुला सोडणार नाही. साल्या....
रेणुकाचा लहान दिर रेणुकाला म्हणायचा - काय भूत वगैरे होऊन माझ्या मानगुटीवर बसणार का? माझ्या कडे भुताचा इलाज आहे सगळ्या.
रेणुका दिराला म्हणायची - नाही. मी कशाला भूत होऊ तुझ्यासाठी.... माझा परमेश्वर तुझा हिशोब करेल व्याजा सकट. परमेश्वर सगळे बघतो.
रेणुकाचा दिर तिला वाटेल तसा बोलायचा जिभ जास्त चालायची त्याची आणि त्याच जिभेवर ताबा न ठेवता चाटायला यायचा झोपेत हळूच. रेणुका दिराला म्हणायची याची जिभच मुळासकट ओढून घेतली पाहिजे. रेणुकाच्या मनात यायचे छातीला विश लावून झोपावे.
(रेणुकाच्या मनात) रेणुकाला आईची आठवण खुपच येते. डोळ्यातून टपटप आश्रू वाहतात. आई असती तर किती बरे झाले असते. आई किती खंबीर होती. तिला रडताना कधी पाहिले नाही. आई जाणे आयुष्यभराचे खुपच मोठे दुःख आहे. मे महिन्यात मैत्रीणीच्या व्हॉटस् अॅप स्टेट्स वर रेणुका बघते मे महिन्यात महिना महिना माहेरी येऊन रहाणार्या तिच्या वयाच्या मैत्रीणी. काय माहेरी धमाल करत आहेत. हे स्टेट्स वर पहाते. रेणुका जळत नव्हती त्यांच्यावर पण आपल्याला आई, बाबा, माहेर नाही. याची आठवण करून दिली जात होती तिला. आईच्या हातचे पदार्थ गुळपापडी, चिवडा, बेसनाचे लाडू, पुरणपोळी आठवू लागले. आईचा मायेचा हात, आईच्या मांडीवर डोके ठेवून झोपणे, आईच्या मिठीतली ऊब रेणुकाला आठवत होती. रेणुकाला आई वाढदिवसाच्या दिवशी , सणावाराला भारी कपडे आवर्जून घ्यायचीच. देवेंद्र रेणुकाला म्हणायचा आईने खुपच कपडे घेतले तुला. आईच्या साड्या खुप आहे. तुला कपडे घ्यायची गरज नाही आता. बाबांनी दिराला सरळच केले असते. बाबांचा काय धाक असायचा. बाबा आता हवे होते. बाबांचा हात कसा लागायचा लहानपणी खाल्लेला धपाटा आठवला. बाबा खुपच कडक होते. बाबांची मायेची हाक. सगळे सगळे आठवत होते रेणुकाला. बघता बघता आईला जाऊन पाच वर्षे पूर्ण झाली आणि बाबांना सोळा वर्षे पूर्ण झाली. कसे अवघड असते आई आणि बाबा च्या माघारी मुलीचे रेणुकाला पुर्ण कल्पना आली होती. रेणुकाने स्वतःलाच कसेबसे स्वतःच सावरले.
रेणुका मात्र नवऱ्याला मे महिन्याच्या सुट्टीत काही दिवस सासरी गावी चालली होती. रेणुका, नवरा देवेंद्र, मुलगा राज, मुलगी परी, लहान दिर. रेणुकाच्या सासरी गावी आले.
गावी येताच सासूबाई म्हणाल्या - यांनी पायाचे काय करून घेतले पहा. दिराने सासऱ्यांचा पाय पाहिला तर सुजलेला. त्यात पू. त्याला मुंग्या लागलेल्या. सासऱ्यांना शुगर मुळे जाणवत नव्हते. दिराने मुंग्या झटकल्या पायाला लागलेल्या. स्प्रे मारला मुंग्याचा आंथरूणावर, गोधडीवर
दूसऱ्या दिवशीच त्यांना तालुक्यातील मोठ्या हॉस्पिटल मध्ये अॅडमिट केले. पायाचे ऑपरेशन झाले. मोठा काटा, काही बारीक खडे पायात गेले होते मोठी जखम झाली पायाचा तळवा कापला गेला होता. चार दिवस अॅडमिट होते. ऑपरेशन, गोळ्या औषध, पायाच्या जखमेला ड्रेसिंग, त्यांना स्पेशल रूम, डॉक्टर आणि नर्स चार्जेस भरपूर पैसा खर्च केला.
डॉक्टर म्हणाले - बरे झाले आज आणले अजून काही दिवस उशीर झाला असता. पाय कापायला लागला असता.
चार दिवस रेणुकाचा नवरा आणि दिर सासऱ्याची काळजी घ्यायला दवाखान्यात त्यांच्या सोबत.
घरी रेणुका, सासूबाई, 2 पोर ( राज आणि परी) . - दिर घरी यायचा डबा, अंथरूण, सासऱ्यांच्या गोळ्या, इन्सुलिन घ्यायला.
सासुबाईनी सगळे मोठ्या भावाला सांगितले ते फॅमिली सकट आले. सासऱ्यांना बघायला दवाखान्यात. घरी आले सासुबाईचे भाऊ, वहिनी, भावाचा मुलगा, मुलगी, सासूबाईच्या भावाचा नातू,ड्रायव्हर 6 लोकांचा स्वयंपाक केला रेणुकानी, सासूबाईंनी पोळ्या, भाजी, भात, वरण, अळूची वडी, कुरडई... त्यांना जाताना कपडे केले सगळ्यांना. सासुबाईनी भावाच्या नातवाला 500 रूपये दिले.
चार दिवसानंतर सासरे घरी आले डिस्चार्ज मिळाला. रेणुकाच्या नवऱ्याला देवेंद्रला नोकरीमध्ये काम करायचे आले. फोन आले. देवेंद्र, रेणुका, 2 मूल नोकरीच्या गावी आले.
रेणुका आपल्या जवळच्या स्त्रियांच्या बाबतीत वाईट अनुभव आले. रेणुकाचे स्वतः स्त्री म्हणून सोसणे चालू होते. या सगळ्याला रेणूका कंटाळून गेली. तिचे सगळे प्रॉब्लेम तिच्या डोक्यात फिरत होते. डोक दुखायला लागले.
अचानक देवेंद्र रेणुकाला म्हणाला - चल 2 पोरांना बागेत घेऊन जातो आहे. चल येते का? रेणुकाने होकार दिला. सगळे बागेत जातात.
मुलं घसरगुंडी, सी सॉ, झोके खेळायला लागतात. देवेंद्र त्यांच्या पाशी ऊभा असतो. रेणुका एकटीने चालायला लागते. वॉकिंग ट्रॅक वर रेणूकाला भर उन्हाळ्यात मे महिन्यात छान उमललेला गुलमोहर दिसतो. ना त्याला पाणी, ना त्याला पाने.... सुंदर लाल, केशरी, पिवळा आहा.. हा.. काय नयनसुख आहे. रेणुका विचार करते. असेच आयुष्याच्या रणरणत्या उन्हात आपणही उमलले पाहिजे. आपल्याला मायेच्या ओलाव्याची का अपेक्षा करायची? नाही तर नाही. आपण ही आपल्या आयुष्याच्या संघर्षाच्या ऊन्हात गुलमोहरच होऊन उमलू या....
क्रमशः
सौ. भाग्यश्री चाटी सांबरे.
©®
हि एक काल्पनिक कथा आहे. सर्व वाचकांना मनःपूर्वक विनंती. कथा मालिका आवडली तर शेअर आणि लाईक करा. कृपया कॉमेंट करायला विसरू नका.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा