रेणुकाचे सासरे रेणुकाला म्हणतात - तुझे जेवण उशिरा होते सगळ्यात. उद्देश काय आहे तुझा. एकदाही लवकर होत नाही.
रेणुका म्हणाली सासर्यांना - त्यात काय उद्देश. मला नाही कळले. तुम्ही सांगा काय उद्देश. माझी जेवणाची स्पीड सगळ्यात कमी आहे.
रेणुका सासरे म्हणतात - हो....
रेणुका सासऱ्यांना सांगते - सगळा स्वयंपाक मी करते. मी अन्न, ताट, पाणी आणते. वाढते. यात सगळ्यात शेवटी जेवायला बसते. त्यात जेवणाचा स्पीड कमी. लागतो वेळ.
सासरे रेणुकाला म्हणतात - जेवण झाल्यावर तुला ताट उचलणे, सगळे आवरायला लागू नये. म्हणून उशीर करते जेवायला. तुझे जेवण होईपर्यंत सगळे माझे मुल उचलून, आवरून घेतात..
रेणुका म्हणते - माझ्या मनात कधी असे आले सुध्दा नाही. जर 2 कामे नवऱ्यानं आणि दिराने केली तर लगेच सून वाईट....
रेणुकाच्या मनात - सासरे जेव्हा बोलतात रेणुकाच्या विरोधातच. चांगले नाही. शेवटी रेणुकाने उत्तर देणे, वाईट वाटणे सोडून दिले. काही बोलले सोडून देण हेच. सासरे सारखे ऊणी - दुणीच काढतातच. याची सवय करून घेणे एवढेच हातात आहे.
सासूबाईंनी रेणुकाला सांगितले - पितळी गोल डब्यात मठ आहे. ते भिजत घाल.
रेणुकाने दुसऱ्या दिवशी भिजवलेल्या मठाची भाजी केली. - सासरे चिडले. सारखी मटकी ची भाजी करते म्हणून.
सासूबाईं रेणुकाला म्हणतात - नाश्त्याला मटकी कोरडी फ्राय करून दिली की आवडते. भाजी आवडत नाही सासऱ्यांना.
रेणुका म्हणाली - हे मला महिती नव्हते. मटकी कोरडी फ्राय चालते. भाजी नाही आवडत. सासूबाईं म्हणे भिजव मठ भिजवले आज केली भाजी. परीला मटकीची भाजी आवडते. मला वाटले चालते सगळ्यांना मटकी.
सासरे रेणुकाला म्हणतात - तू तर बोलूच नकोस. माझे डोके फिरवू नकोस.
सासूबाईं रेणुकाला पुढे म्हणतात - मला मटकी पचतच नाही. उलटीच होते.
सासरे रेणुकाला म्हणतात - मी कधीच एक काम केले नाही. माझ्या बायकोने केले सगळे. स्त्रीचे कर्तव्यच आहे ते. मी कधीही जेवणाचे ताट वाढले नाही आणि कधी उचलले नाही. कधी एक काम घरात केले नाही.
रेणुका मनात म्हणते - संसार जर दोघांचा आहे. तर करावे दोघांनी मिळून काय हरकत आहे. आपल्या घरचे आहे.
सासूबाईं रेणुकाला म्हणतात - घे कढी घे.. भात घे..
सासरे सासूबाईंना म्हणतात - तू कशाला सूनेला म्हणते? हे घे.. ते घे..तू तिला म्हणायचे नाही यापुढे. तिने तुझ्या पुढे पुढे करायचे का तू?
सासूबाईंनी त्यानंतर रेणुकाला कधीच काही घे म्हणत नाही. खायचे खा.. नाही तर नको खाऊ.
सासूबाईंचे खांदे दुखणे, डोळ्याचे मोतीबिंदू आणि काचबिंदू चे ऑपरेशन, शुगर, बीपी, अशा कारणांमुळे आता नेहमी सासुबाई पलंगावर झोपूनच. सगळी स्वयंपाक जवाबदारी एकट्या रेणुका वरच. त्यात सगळ्यांनाच सकाळ आणि संध्याकाळी गरम गरमच पोळी - भाजी पाहिजे. सकाळचे संध्याकाळी चालतच नाही. सासऱ्यांना हॉटेल मध्ये गेलेले अजिबात आवडत नाही. हॉटेल म्हणले की भांडण, नाव ठेवणे.
सासूबाईंच्या डोळ्यांच्या ऑपरेशन नंतर रेणुका आयते ताट देऊन. सासुबाईचे ऑपरेशन झाले म्हणून डिंक, मेथी, बदाम घालून लाडू केले. त्यामुळे सासुबाईच्या मनात थोडे फार चांगले रेणुका विषयी असावे. सासूबाईच्या बोलण्यात रेणुकाशी बोलताना ओ बेटा, काय बाई प्रेमाचे 2 शब्द एकदिवस ऐकायला रेणुकाला मिळाले. हे मोठे अवॉर्ड किंवा सर्टिफिकेट पेक्षा कमी नाही. रेणुकाला वाटले. रेणुका कर्तव्य पार पाडते याची पोच पावती असावी.
सासरे रेणुकाला म्हणतात - तुझ्या पोरांना वळण नाही. सारखे मोबाईल वर मुलगा गेम खेळतो.. मूलगी गाणी पहाते. जेवताना. तिला भरवावे लागते. ती हाताने जेवू शकते.
रेणुका म्हणाली सासर्यांना - सांगून, बोलून मोबाईल ठेवत नाही. मारले की तुम्हाला चालत नाही. एकुलता एक नातू लाड तुमचे. धाक दाखवावा कसा? परत वर मला बोलायला मोकळे. माझा उध्दार.
रेणुका म्हणाली सासुबाईना सकाळी कोमट पाणी प्यायला सासुबाईना लागते ते रेणुकानी केले. मी केले घ्या.
सासुबाई रेणुकाला म्हणाल्या - तुझ्या बापाला मुकुंदाला, तुझ्या आईला चुकणार नाही.
रेणुका म्हणते सासूबाईंना - बाप काढण्याची गरज नाही. माझ्या लग्नाआधीच वडील वारले ते आलेच नाही तुमच्याकडे त्यांचा प्रश्न नाही.
सासूबाईं रेणुकाला म्हणतात - आई आली. आई ला महिती आहे. आईने लग्न जुळवले.
रेणुका सासूबाईंना म्हणाली - आईला जाऊन पाच वर्षे पूर्ण झाली. आता तिच नाव का घेता?
सासूबाईं रेणुकाला म्हणतात - सासरची सून होण्याआधी मी माहेरची सून झाले. माझ्या आईने वाळवण, सगळा स्वयंपाक पूरणपोळी, भाकर्या सगळे करून घेतले. मग सासरी जड गेले नाही.
सासूबाईं रेणुकाला म्हणतात - तूला कसे जड जाते. तुझ्या आईने माहेरी वळण लावले नाही.
रेणुका सासूबाईंना म्हणाली - माझ्या आईचे म्हणणे होते. मुलीला माहेरी काम लावायचे लग्नाच्या आधी आणि लग्नानंतर सासरी काम लावायचे. मग मुलीने जगायचे कधी?
रेणुका सासूबाईंना म्हणाली - मी माझे बालपण मनसोक्त जगले. नंतर शिक्षण, कॉम्प्युटर, शाळा, कॉलेज, क्लास यातच वेळ जायचा.
सासूबाईं रेणुकाला म्हणतात - माहेरी असताना माझ्याकडून पिठल्यात मीठ कमी पडले. माझ्या मोठ्या भावाने गरम पिठले हातावर टाकले. कारण उद्या सासरी जायचे आहे. माहेरचे नाव खराब करू नकोस म्हणून.
सासूबाईं पुढे रेणुका म्हणतात - तू गावी सासरी चल एका ठिकाणी तुला दाखवते. दहावीची मुलगी मस्त 15 जणांच्या भाकऱ्या करते चुलीवर. 2 किलोचे वडे एकटीने तोडते, कूरड्या 5 किलो एकटीने करते. तुम्ही शहराच्या मुली चालत नाही खेड्यात. खेड्याच्या मुली सगळी कडे चालतात.
सासूबाईं रेणुकाची तूलना सारखी खेड्यातील सासरी गावाकडच्या मूली सोबत करतात.
देवेंद्र ऐकतो आणि आईला म्हणतो - आई बस्स करं. नको सांगू. बस्स... विषय बंद कर.
रेणुका पोळ्या करत असताना गावी स्वयंपाक घरात सासूबाईं आणि त्यांची मैत्रीण शेजारी बसतात. स्वयंपाक घरात बसतात. डोळ्याचे ऑपरेशन झालेले. सासुबाईच्या डोळ्याला काळा चष्मा. मुद्दाम रेणुका समोर गप्पा.
सासूबाई मैत्रिणीला म्हणतात - तुमची ती नात सून काय हुशार आहे. सगळे करते. दुसरी नात सून काय हुशार आहे. सासूची सगळी हुशारी, अनुभव घेतला तिने. काय काम करते घरातील सगळी. ती सून खूपच चांगली आहे तुमची. सगळे काम करून निघते. शेताचे, गाईचे पूर्ण, स्वयंपाक पूर्ण, घरच पूर्ण, भारीच नात सुना भेटल्या तुम्हाला. ती एक सून वेडी आहे. ढेपाळलेली. हे येत नाही. ते येत नाही. भाकऱ्या येत नाही. मुद्दाम. वेड रहायचे. वेडे बनून पेढे खायचे.
रेणुका ऐकून न ऐकल्या सारखे करत होती. एका कानाने ऐकून दुसऱ्याने सोडून देत होती. उलट दोघींचे बोलणे एन्जॉय करत होती.
सासूबाईंनी मैत्रीणीला सांगायला सुरूवात केली - त्यांनी कसे गावी लग्न करून आल्यावर. 20 जणांच्या खटल्याच्या घरात कामे केली. सकाळी 9 वाजता बरोबर सासूबाईं 20 जणांचे कपडे धुण्यासाठी नदीवर जायच्या. घर किती मोठ्ठे शेणाने सारवायच्या. दळण करणे, उन्हाळ्यात आणि दिवाळी आवरायला काढली की गोधडी धुणे, वाळवण किती कुरड्या, खारोड्या 25 - 25 किलो. पहाटे पाच वाजता सडा अन् रांगोळी झाली नाही की मामंजी किती बोलायचे. स्वयंपाक चूलीवर काट्याचे सरपण कायमच. सगळ्या नणंदेच्या, जावेच्या, आपल्या सगळ्या पोरांना नाहू- माखू घाला. पोरांना खाऊ घाला. सणवार, पै पाहुणा चालूच रहायचे. भांडी पितळी, तांब्याची घासा. चिरणे, कुटणे, किसणे, दळणे,पाट्यावर वाटणे घरीच चालूच रहायचे. नांदून निघायचे नाही तर मरून निघायचे सासरहून.
रेणुकाच्या मनात आले - खरचं पुर्वीच्या पिढीत बायकांना खुपच काम आणि सासुरवास सहन करावा लागत होता. पिढ्यानपिढ्या स्त्रीयांनी फक्त सहन केले आहे.
रेणुकाची खुपच छाती दुखते - रेणुका कळवळून नवऱ्याला सांगते.
देवेंद्र रेणुकाला म्हणाला - नाटकं करू नकोस. बैस शांत. चांगल्या डॉक्टर कडे नेले होते. भारी गोळ्या दिल्या होत्या. तू घेतल्या नाही गोळ्या.
रेणुका म्हणाली - त्या भारी गोळ्या परत करून पैसे घेतले तुम्ही. वाया नाही गेले पैसे तुमचे. ती डॉक्टरीण वेगळ्याच कारणाने हार्मोन्स चेंजेस म्हणून गोळ्या देते. खरे कारण वेगळे.
देवेंद्र रेणुकाला म्हणाला - हो त्या डॉक्टरणीला काय कळत नाही. सगळे तुलाच कळते.
रेणुका छाती दुखते रडत कसेबसे पोळ्या, आंब्याचा रस, बटाट्याची भाजी स्वयंपाक करते. तितक्यात राज येतो. रेणुकाचा मूलगा
राज रेणुकाला म्हणाला - आई रडली तू. रेणुका सांगते. अरे माझी छाती दुखते.
रेणुका रडली कारण - रेणुकाचे खरचं अवघडच आहे. दिर कसा वागतो. रात्री झोपेत असताना महिती आहे. समोर दिसतो आहे. पण त्याला काही करू शकत नाही. बोलू शकत नाही. त्याच्या साठी स्वयंपाक करा रोज. तोंड दाबून बुक्क्यांचा मार. देवाला प्रार्थना करते रंगेहात पकडू दे लवकरच दिराला. रेणुका विचार करते की ती रात्री, पहाटे जागते. मग नवरा संडासला जायला उठत नाही. दिर येत नाही हळूच. ती झोपली किच नवऱ्याला जाग येते. दिर गैरफायदा घेतो. नवरा मिळाला असेल दिराला सामील असेल रेणुकाला एकटीच रहावे लागेल. नोकरी करावी लागेल. बाहेर एकट्या बाईला जग सुखाने जगू देत नाही. सुरक्षित कुठे रहायला जागा मिळेल. दिराला काय शिक्षा द्यावी. रेणुकाचा नवरा जर सामील असेल तर तिचा किती मोठा विश्वासघात आहे. तिच्या समोर असंख्य प्रश्न उभे राहतात. रेणुका खुपच रडली.
आंब्याच्या रस, पोळी, उकडलेल्या बटाट्याची भाजी करायला 9.30 उशीर झाला म्हणून देवेंद्र रेणुकाला रागावतो. हि काय वेळ आहे. इतका उशीर जेवायला.
रेणुकाच्या मनात - छाती दुखते त्याचे काही नाही. शेळी जाते जीवानिशी खाणारा म्हणतो वातड....
क्रमशः
सौ भाग्यश्री चाटी सांबरे
©®
हि एक काल्पनिक स्त्रीवादी कथा मालिका आहे. वाचकांना विनंती शेअर करा. आपली कॉमेंट द्यायला कृपया विसरू नका.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा