रेणुकाला पाळी येते आणि सासुबाईना चालत नाही रेणुकाच्या हातचे काही. कारण त्यांचे डोळ्याचे ऑपरेशन झाले आहे.
रेणुका आणि परी दोघीच नोकरीच्या गावी रहातात. बाकी सगळे गावी जातात. सासूबाईना डॉक्टरांनी 8 दिवसानंतर तपासणीसाठी बोलावले असते. त्यांना नेतात 2 मुले.1 नातू आजी सोबत जातात.
रेणुका आणि परी दोघीच नोकरीच्या गावी. रेणुकाला जरा आराम, मानसिक शांती....
रेणुकाची मैत्रीण मे च्या महिनाभर मुली सोबत माहेरी आलेली असते.
रेणुका तिला फोन, मेसेजेस करते. रेणूंच्या घरी भेटायचे ठरते.
ही रेणुकाची अत्यंत जिवलग मैत्रीण दिप्ती ही शाळा, कॉलेज, ट्यूशन सगळी कडे सोबत होती. रेणुकाच्या परीक्षेची फिस आणि रेणुकाची आई सिरीयस असताना पैशाची मोठी मदत हिने केली. नंतर पैसे रेणुकाला जेव्हा जमले तसे रेणूकाने परत तर केले पण वेळेला धावून आल्याने रेणूका मनाने तिच्या ऋणात होती.
दिप्ती येताच रेणुका तिच्या गळ्यात पडून घट्ट मिठी मारते.
रेणुका घरी दिप्तीला घेऊन जाते. रेणूकाची परी झोपलेली असते. दोघी निवांत बेडरूम मध्ये गप्पा मारतात. खुप वर्षांनी भेटल्याचा आनंद दोघींच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता.
दोघींना एकमेकींच्या सगळ्या गोष्टी महिती असतात. आयुष्यात काय चालु आहे सगळे. दिप्ती येणार म्हणून रेणुकाने आईस्क्रीम आणले होते. दोघी कोन खातात. सेल्फी घेतात. गप्पां, गोष्टी, जून्या कटू - गोड आठवणी जाग्या होतात.
रेणुका म्हणाली - दिप डार्लिंग किती वर्षे झाली भेटून. मैत्री आहे तशीच.
दिप्ती म्हणते - जास्त घट्ट होऊन रंग अजून पक्का झाला.
रेणुका म्हणाली - दिप्ती. या तुम्हीच दोघी तिघी म्हणजेच माझ्या मनमोकळ करायच्या हक्काच्या, विश्वासाच्या जागा. तुम्ही माझ्या जवळच्या माहेरच्या म्हणाव्या अशा. रेणुका डोळ्यांच्या कडा पाणावल्या. किती मनापासून बोलत होती. दिप्तीला महिती होते.
रेणुकाच्या स्लॅम बुक वरच्या ओळी रेणुकाच्या लक्षातच असतात. रेणुका मनात म्हणते.
"शब्दांची दुःख शब्दांनाच कळतात..
आठवणीतले शब्द मित्रालाच कळतात...."
रेणुका दिप्ती - रेणुकाच्या दिराचे प्रकरण यावर बोलतात. दिप्ती असे कर तसे कर सांगत होती.
रेणुका आणि दिप्ती - सासुरवास विषयी बोलतात. काही आठवणी जून्या निघतात.
रेणुकाला आठवण होते - दिप्तीला सांगते रेणुका. माझे नवीन लग्न झाले होते. 2- 4 महिने झाले असतील. मी नौकरीहून परस्पर दिप्ती तुला आणि श्रध्दाला भेटायला पैसे परत करायला आले. त्यात एक वडा पाव खाल्ला. सासरी उशीर झाला घरी जायला. सासूबाईना स्वयंपाक करावा लागला. म्हणून सासरे रेणुकाला सूनेला म्हणाले आयते ताट.. आयते भो.. नवरा जोरात दंड दाबत म्हणाला होता - का.. ग.. माहेरपणाला आली का? आयते कसे लागते? गोड लागते का? आ.. आ.... सासरे टाळ्या वाजवून हसत होते. सासूबाई पदरा आड हसत होत्या. रेणुका तशीच ताटावरून उठून त्या मैत्रिणी सोबत खाल्लेल्या वडा पाव वरच राहिली रात्रभर.. पोटभर जेवण न झाल्याने उपाशी झोप येईना. तिला कोणी जेव म्हणाले नाही. ती जेवली नाही. मैत्रीणीना भेटायला बंधने आली. स्त्री म्हणले की सासुरवास आलाच. कमी जास्त पण आहेच.
दिप्ती रेणुकाला म्हणते - जाऊदे. आज भेटलो ना आपण.. आज घरी कोणी नाही.. मस्त गप्पा मारल्या. मान्य आहे काही आठवणी मनात रहातात. सोडून दे त्रासदायक आठवणींना.
दिप्ती रेणुकाला भेटली याचा आनंद होऊन दोघी भेटल्या फोटो शाळेच्या व्हॉटस् अँप गृपवर आणि स्टेट्स वर टाकतात. आनंद झाला भेटून व्यक्त करतात.
दिप्ती रेणुकाला म्हणते - माझ्या नवऱ्याला वेळच नसतो. सतत काम. मी गृहिणी घरचे आणि 2 लहान मुलीचे पहायचे. काही कामाला बाई लावली. धुण्यासाठी वॉशिंग मशीन आहे. नवऱ्याला बोलायला वेळ नाही.
रेणुका दिप्तीला म्हणते - चांगले रोमॅन्टिक नवरे फक्त सिरीयल मध्येच पहायला मिळतात. अगदी पाचशे करोडचे मालक असले तरी बायकोला वेळ देतात. सूनेचे कौतुक करणारे सासू ,सासरे फक्त सिरीयल / डेली सोप मध्ये पहायला मिळतात. (दोघी हसतात. टाळ्या देऊन.)
रेणुका आणि दिप्ती - आठवणी चाळताना.. वाढदिवसाच्या, गिफ्ट्स, पार्टी, सहलीच्या, परीक्षेच्या, भरपुर मुव्ही पाहिलेल्या, शाळेच्या, शिक्षकांच्या, ट्यूशनच्या, कॉलेजच्या एक एक धमाल आठवणी आठवून सांगून खुप हसतात. गेले ते दिन गेले....
रेणुका दिप्तीला म्हणते - हे म्हणतात ना फ्रेंडशिपचे व्हिटॅमिन "एफ" असेच हवेच. मुड फ्रेश करायला. मित्र- मैत्रीणी जवळचे आयुष्यात हवेच. त्यांना भेटले पाहिजे अधूनमधून.
रेणुकाला आज असे वाटते देवाची कृपा झाली आहे आपल्यावर. देवाचे आभार मनापासून मानते.
दिप्ती रेणुकाला विचारते बाकी नवरा चांगला आहे ना - रेणुका म्हणाली वेळ देत नाही. रोमॅन्टिक नाही नवरा. कधीही माझ्या बाजूने ऊभा रहात नाही. कायमच सासू, सासरे, दिर बरोबरच. बायको कायमच वाईट. फक्त एक गोष्ट आहे. माझी आई सिरीयस असताना फक्त नवऱ्यानेच दवाखान्यासाठी पैसे खर्च केले. बाकी सख्खे म्हणवणारे नातेवाईक, सख्खे गर्भश्रीमंत नातेवाईक यांनी पैसे उसने सूध्दा दिले नाही.
दिप्ती म्हणते रेणुकाला - जशी तुझ्या आईच्या वेळी तूझ्या नवऱ्याने दवाखान्यात पैसे, कष्ट लावले. त्यांनी तूला साथ दिली. तसेच त्यांचा पगार वर्षानुवर्षे येत नसताना तू सूध्दा नोकरी करून घर चालवले आर्थिक हातभार लावला आहे. फरार असताना, जेल मध्ये असताना तू सुद्धा खुपच साथ दिली आहे. चांगल्याच गोष्टी लक्षात ठेव.
रेणुका दिप्तीला म्हणाली - पण नवरा कधी तुला काय कळते? मूलासमोर म्हणून जातो. सहज. कधी आपण त्यांना काय हवे म्हणून विचारलं संध्याकाळी काय करू भाजी? काय करू मेनु? तर उलट उत्तर येत काय मुर्खासारखी विचारते. तुझ तू कर. तुला कळत नाही का? मनानी केले. तूला हे करता नाही आलं. तुला ते करता नाही आलं.
रेणुका पुढे दिप्तीला म्हणाली - नवरा वेळ देत नाही. मनासारखी शॉपिंग आम्ही दोघे करत आहोत. कुठे छान फिरायला गेलो नवरा, बायको आणि 2 पोरं असे नाहीच. मुव्हीला पण सासू, दिर असतातच. बरं हौस मौज नाही तर नाही. साधे दोघंच कधीच गप्पा मारत बसलो चांगल्या विषयावर तेही नाही. नवरा बोलायला तोंड उघडतो तर काही काम सांगतो. लागेल असेच बोलतो. ऊणी - दुणीच काढतो. नाहीतर घरात असला नवरा तर मोबाईल वर व्हिडिओ किंवा कॅन्डी क्रश गेम खेळत बसतो. टि. व्ही. पहातो. झोपा काढत असतो. नाहीतर काम - नोकरी कारणाने बाहेरच असतो. नात्यात संवाद हरपला आहे.
दिप्ती रेणुकाला म्हणते - तु चांगली रहात नाही. जाड झाली आहे. गाऊन घालते. केस विंचरायला वेळ नाही. मुल - स्वयंपाक - घरकाम अडकून गेली.
रेणुका म्हणाली दिप्तीला - मानसिक स्थिती चांगली रहात नाही. दिर रात्री छातीला हात मार, चाटणं. हा खुपच मोठा मानसिक त्रास सतत चालू आहे. दिर करून चांगला. मी खरे बोलून वाईट. नवरा माझ्या बाजूने नाही कधीच. नंतर आई, बाबा, भाऊ, माहेर नाही. हि एक गोष्ट. आई, बाबाची आठवण पाठ सोडत नाही. यांच्या नोकरी मध्ये कधी पगार होत नाही. आता आता पगार होत आहे. कोर्ट कचेरी, वकील, पोलीस, जेल, फरार चालू आहे. मुलगा गावी रहातो.सुट्टीत.आजीचा मोबाईल खेळत रहातो रात्र दिवस. आजी आणि आजोबा आणि काका अति लाड करतात. ऐकत नाही. हि भाजी नको ती नको आता सैनिकी शाळेत टाकले बघू आता. तिथे रहाणे, खाणे पिणे.. त्यात सासुरवास असतोच.. बोलणी कूचकट, अपमान, ऊणी - दुणी रोज सतत काढणे. काम करून कोणाला काही नसते. तू तर घरीच असते काय काम आहे तुला? किंमत सूनेला गृहिणी ला पायपुसणी इतकीही नसते. एकटेपणा जाणवतो खुपच. सासू, सासरे, नवरा शुगर, बीपी आहे. इन्सुलिन आहे. काचबिंदू, मोतीबिंदू शस्त्रक्रिया सासू आणि सासऱ्यांची झाली. सासूबाईंचे खांदे दुखतात. सासऱ्यांचे अँजिओप्लास्टी झाली. पायात आता काटा मोठा गेला होता. कापले बोटा एवढा काटा काढला. चिरला तळपाय. सणवार सगळे करायला एकटीने करून कोणाला काही नाही. हे काय आयुष्य आहे बाईचे?
रेणुका दिप्तीला म्हणते - फक्तं तुम्ही 2 - 3 जणी मैत्रीणी ज्यांना मनमोकळ बोलू शकते सगळे. तर आपली भेट होण दूर्मिळ. फोन, मेसेज एवढे नाही. तुम्ही तुमच्या संसारात व्यस्त.
क्रमशः
सौ. भाग्यश्री चाटी सांबरे
©®
©®
हि एक काल्पनिक कथा आहे. वाचकांना विनंती तुमची कमेंट द्या. आवडली तर लाईक, शेअर करा प्लीज.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा