रेणुकानी घरातील सगळ्यांसाठी स्वयंपाक केला. स्वतःच्या साठी काही नाही केले. रेणूकेचा आज वटपौर्णिमेचा दिवसभराचा उपवास. मुलीचे सगळे आवरून दिले, घरची कामे पूर्ण झाली. मग रेणुकानी पूजेची तयारी केली. छान साडी नेसून पूजेचे ताट घेऊन तयार झाली. निघाली. शेजारची नुकतेच लग्न झालेली मेघा तिच्या सोबत निघाली.
मेघा रेणुकाला विचारते - का बरं वडालाच पुजायचे ताई?
रेणुका सांगते मेघाला- खुप जूनी. पौराणिक सत्यवान आणि सावित्रीची गोष्ट आहे.
मेघा रेणुकाला आग्रह करते मला सांगा ना ताई गोष्ट.
रेणुका म्हणाली मेघाला - बरं ऐक मग. एक राजा होता त्याची कन्या सावित्री उपवर झाली होती. खुप सुंदर, हुशार असते. राजा तिला वर निवडण्याचे स्वातंत्र्य देतो. सावित्री सत्यवानाची निवड करते. सत्यवानाचे आंध माता आणि पिता असतात. सत्यवानाच्या वडीलांचे राज्य हरवलेले असते. ते वनात रहात असतात. सत्यवान अल्पायुषी आहे हि गोष्ट नारदमुनीना महिती असते ते सांगतात सावित्रीला येऊन. एका वर्षाने त्या सत्यवानाचा मृत्यू होणार आहे. परंतु सावित्रीचा निर्णय ठाम असतो. मग सत्यवान आणि सावित्रीचे लग्न होते. वर्षाचा कालावधी जातो. सत्यवान वनात लाकडे तोडण्यासाठी जातो. सावित्री त्याच्या सोबत जाते. सत्यवान वडाच्या झाडावर चढून तोडणार इतक्यात त्याला चक्कर येऊन खाली पडतो. त्याचे प्राण घेऊन यम निघतात. सावित्री वडालाच विनंती करते तिच्या पतीच्या देहाचे रक्षण कर. सावित्री पतीव्रता असते. सावित्री यमाच्या मागे निघते.
यम म्हणतात सावित्रीला माझ्या मागे येऊ नको. जा तू माघारी. सावित्री यमाच्या मागेच जाते. यम म्हणतात दुसरे वरदान माग मी देतो. पतीचे प्राण मागू नकोस. सावित्री पहिले वरदान मागते. माझ्या सासू आणि सासऱ्यांना दृष्टी परत येवो. यम म्हणतात तथास्तू. यम म्हणतात आता जा तू माघारी. सावित्री यमाच्या मागेच जाते.
यम म्हणतात दुसरे माग काही मी देतो वरदान. सावित्री मागते यमाकडे माझ्या सासऱ्यांचे हरवलेले राज्य त्यांना परत मिळू दे. यम म्हणतात तथास्तू.
यम म्हणतात सावित्री माझ्या मागे येऊ नको आता जा तु माघारी. सावित्री जात नाही. सावित्री यमाच्या मागेच जाते. यम म्हणतात. तिसरे काही माग मी देतो पण तू माघारी जा. सावित्री यमा कडे तिसरे वरदान मागते. मला छान सुंदर, हुशार पुत्र होऊ दे. यम तथास्तू म्हणून टाकतात. नंतर यमाला लक्षात येते आपली चूक झाली. आपण शब्दात बांधले गेलो. यमाला सावित्रीच्या पतिव्रता असल्याचे कौतुक वाटते. सावित्री हुशार असण्याचे कौतुक वाटते. यम तिच्या पतीचे प्राण परत सावित्रीला देतो.
सावित्री पतीचे प्राण घेऊन वडाच्या झाडांच्या इथे येते. वडाने सत्यवानाच्या देहाचे रक्षण केले. सावित्री पतीचे प्राण परत सत्यवानाच्या देहात टाकते. सत्यवानाला जाग येते.
वडाने पतीच्या देहाचे रक्षण केले म्हणून सावित्री वडाची पुजा करते. वडाचे आभार मानते. वडालाच वरदान मागते सात जन्मी सत्यवानच पती मिळो. सत्यवान - सावित्रीचा सुखाचा संसार सुरू होतो.
मेघा लक्ष देऊन आवडीने कथा ऐकत असते. दोघी चालत वडाच्या झाडापर्यंत पोहचतात. वडाची मनोभावे पूजा करतात रेणुका आणि मेघा दोघी.
रेणुका मेघाला म्हणते - हिंदू धर्म वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून आहे. वडाचे झाड कधीच पडत नाही. वडाला पारंब्याचा आधार असतो. वडाचे झाड हजारो वर्षे टिकून रहाते. पर्यावरण शुध्द ठेवते. या वटपौर्णिमेच्या निमित्ताने वडाचे झाड लावले जाईल. वडाची पूजा केली जाईल. वडाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाईल. हा दूर दृष्टिकोन आहे.
मेघा रेणुकाला म्हणते - खुपच छानच ताई कथा आणि वडाचा महिमा.
रेणुका म्हणाली मेघाला - स्त्रीचा सुध्दा महिमा आहे. तिचा एकदा पक्का निश्चय असेल तर ती यमाकडून प्राण सुध्दा परत आणू शकते. स्त्री पतिव्रता असते.
रेणुका पुढे मेघाला म्हणाली - हि कथा माझ्या आजीने मला सांगितली आहे. आपण स्त्रीया पिढ्यानपिढ्या या वडाची पुजा करतो. आपल्या पतीच्या उदंड आयुष्यासाठी प्रार्थना करतो. आपले अखंड सौभाग्य मागतो. पर्यावरण चांगले ठेवण्याऱ्या वडाची पुजा करून कृतज्ञता व्यक्त करतो. वडाच्या सान्निध्यात आपल्याला शुध्द हवा मिळते. प्रदक्षिणा मारून चालणे होते. आपली तब्येत चांगली रहाते.
मेघा रेणुकाचे आभार मानते खुपच छान सांगितले ताई. सत्यवान आणि सावित्रीची कथा आवडली, वडाचा महिमा समजला. स्त्रीचा महिमा समजला. हिंदू धर्म किती महान आहे समजले. हिंदू धर्म वैज्ञानिकतेवर आधारित आहे हे समजले. खुपच आभार रेणुका ताई.
रेणुका म्हणाली मेघाला - तु मला ताई म्हणाली ना. आभार कशाला मानते. मोठी बहिण किंवा छान मैत्रीणी होऊ या आपण. अशा सणवारामुळे मैत्री होते. हि कथा माझ्या आजीने वडीलांच्या आई अहिल्याबाईनी सांगितली आहे मला. यानिमित्ताने तिची आठवण झाली. खुपच चांगली होती आजी. असो. आपली पूजा वटपौर्णिमेची यथासांग पार पडली. चला आता.
मेघा रेणुकाला म्हणते - आपण वडा सोबत सेल्फी घेऊ या ताई. किती छानच सावली आहे. वडाची घनदाट. हिरवळ आहे. गारवा आहे झाडाखाली.. छानच वाटते मनाला. प्रसन्न.
वटपौर्णिमेची यथासांग पूजा करून. दोघी सेल्फी घेतात. घरी येतात. रेणूका फराळाचे पदार्थ करते. मेघा शेजारची येते काही उपवासाचे पदार्थ घेऊन रेणुकाच्या घरी. दोघी मिळून फराळ करतात. रेणूका मेघाची ओटी भरते. ब्लाऊज पीस, हळदी कुंकू लावते. दोघी साड्या नेसून छानच दिसत असतात. खुश असतात.
मेघा रेणुकाला विचारते - वटपौर्णिमेचा दिवसभराचा उपवास आहे का ताई?
रेणुका म्हणाली मेघाला - हो. आज दिवसभर उपवास. उद्या सकाळी सोडायचा. वटपौर्णिमेचा उपवास. कालनिर्णय मध्ये सगळे व्यवस्थित दिलेले आहे. मी तेच पहात असते.
रेणुका मेघाला विचारते - माहेर कुठे आहे? मेघा तुझी जन्म तारीख काय?
मेघा रेणुकाला सांगते - तिथीने वटपौर्णिमेचा जन्म आहे. माहेरची आठवण आली ताई.
रेणुका म्हणाली मेघाला - अगं. नवीनच लग्न करून आली. येती आठवण माहेरची. येत जा माझ्याकडे. आज वटपौर्णिमेचा वाढदिवस आणि दिवसभर उपवास आज. आता कसे साजरा करणार? दोघी हसतात. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मेघा तूला उदंड आयुष्य, आरोग्य लाभो.
रेणुका मेघाला म्हणते - खरंच विचार केला तर स्त्रीचे आयुष्य काय आहे. जन्मदाते सोडून परक्या घरी यायचे. जन्मदाते मुलीला म्हणतात परक्याचे धन आहे. इकडे सासरच्यासाठी तुम्ही परक्या घरातूनच आलेल्या. त्यांना आपलेसे करा. तिथे आयुष्यभर नांदा. सासुरवास वाटेल ते सहन करा. सासरी कष्ट तर करावेच लागतात.
मेघा रेणुकाला म्हणते - बायका नवऱ्याच्या नावाने भांगात कुंकू लावतात.कपाळावर टिकली लावतात. गळ्यात मंगळसूत्र घालतात. हातात बांगड्या घालतात. बोटात जोडवी घालतात. तेच नवरा बायकोच्या नावाने काही करत नाही. पुरूषाचे लग्न झाले आहे की नाही हे सुद्धा समजत नाही.
मेघा रेणुकाला पुढे म्हणते - आपण लग्नाच्या आधी हरतालिका व्रत नवरा चांगला मिळावा करतो. लग्नानंतर हाच नवरा सात जन्म मिळावा. नवऱ्याला उदंड आयुष्य लाभो. अखंड सौभाग्य लाभो म्हणून वटपौर्णिमा करतो. मंगळागौर करतो. सासरी अन्नपूर्णा प्रसन्न रहावी म्हणून करतो. उपवास करतो. सगळे करतो. पुरूष एकही व्रत करत नाही.
रेणुका मेघाला म्हणते - सगळे असे आहे. आपण आपले कर्तव्य पार पाडायचे. बाकी स्त्री म्हणजे लक्ष्मी, सरस्वती, अन्नपूर्णा, शक्ती आहे. जिथे स्त्रीचा अपमान केला जातो. तिथे लक्ष्मी रहात नाही. स्त्रीचा सन्मान केलाच पाहिजे. तिचा तिच्या संसारात सिंहाचा वाटा असतो. ती तन, मन, धन सगळे देऊन घरासाठी करत असते. ती जर गृहिणी असेल तर घर, मुले, स्वयंपाक, स्वच्छता सगळे पहाते. तेव्हा हे पुरूष निर्धास्त होऊन नोकरी करू शकतात.स्त्रीला खरंच मानाने वागणूक मिळालीच पाहिजे पण हे सांगावे लागते. यातच काय ते समजून घे.
क्रमशः
सौ भाग्यश्री चाटी सांबरे.
©®
©®
हि एक काल्पनिक स्त्रीवादी कथा मालिका आहे. कृपया जास्तीत जास्त शेअर करा. कृपया आपली कमेंट द्यायला विसरू नका. आवडली तर लाईक आवश्य करा.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा