Login

तिचे जग भाग 27

Tiche Jag Bhag 27


तिचे जग भाग 27


रेणुका, देवेंद्र, मुलगा राज, मुलगी परी, सासुबाई, दिर, एका संध्याकाळी छान निसर्गाच्या सान्निध्यात फिरायला जातात. सुंदर पांढरा शुभ्र, खळखळाट करत धो धो धबधबा कोसळत होता. सगळीकडे हिरवळ मधील छटा पोपटी, गडद हिरवा, डोळ्याला आणि मनाला सुखावणाऱ्या , शांत करणाऱ्या हिरवळीच्या छटा. कोकीळ गात होता. तुषार असे अंगावर उडत होते. सगळे भिजत आनंद घेत होते. पावसाची थोडी रिमझिम त्यात सुरू झाली. आकाशात सप्तरंगी इंद्रधनुष्य दिसायला लागले. काळ्या ढगांच्या आड सुर्य लपून हे पहात असावा. सुर्याच्या पिवळ्या किरणांच्यामुळे काळ्या ढगाला जरीची सोनेरी किनार लाभली. निसर्गाचे रूप इतके सुंदर होते. सेल्फी आणि फोटो मध्ये सगळे येण अशक्यच.


रेणुका तिथे जमलेल्या पर्यटक नवीन ओळख झालेल्या मुलीला सांगत होती - निसर्गा इतका आनंद कुठेही मिळणार नाही. निसर्गाला जपलेच पाहिजे. या पावसाळ्यात एक झाड लावा आणि त्या झाडाला पोटच्या मुलासारखे जपाच.


धबधब्याच्या खाली चिंब भिजून मनसोक्तपणे आनंद घ्यायचा मनात बेत रेणुका नुसते आखत होती. स्त्री आणि त्यात सून म्हणजे मन आणि जग यांची बंधने काही संपतच नाही. जग काय म्हणेल याची भिती काही पाठ सोडत नाही.


इतक्यात मुसळधार पाऊस सुरू झाला. सगळे जण आडोसा शोधत उभे राहिले. जवळच शंकराचे मोठे मंदिर दगडात कोरलेले आखीव रेखीव फार जुने पण मजबूत मंदिर होते. रेणूका आणि देवेंद्र, दोन्ही पोर धावत मंदिरात पोहचले. रेणूकेनी मोठ्या भक्तीने नंदी आणि शंकराच्या पिंडीचे दर्शन घेतले. महादेवाला मनःपूर्वक कळकळीची प्रार्थना केली. दिराला रंगेहात पकडणे. शक्य होऊ दे. न्याय दे शंकरा. तूच आहेस मायबाप मला. खरी मनापासून हाक मारली देवापर्यंत पोहचतेच. म्हणतात.



रेणुका देवेंद्रला म्हणाली - चला पाऊस थांबला.. निघूया म्हणाली. सगळे घरी निघतात.


रेणुकाने पाहिले - एक बाई तिथे आत्महत्या करायला आली होती. त्याच पाण्यात उडी मारून जीव देणार इतक्यात रेणुका तिचा हात धरून तिला काठावरून मागे ओढते.


रेणुका तिला कारण विचारले.


ती स्त्री रेणूकाला म्हणाली - माझा दोष इतकाच मी स्त्री म्हणून जन्माला आले. आमच्याकडे मुलीना शिक्षण जेमतेम दहावी किंवा बारावी झाले की झाले लग्न. मला शिक्षणाची आवड. मी दहावी आणि बारावी परीक्षेत चांगले 90 - 95 % पाडले. नोकरी करून आपल्या पायावर उभे राहून दाखवण्याची इच्छा. काही चांगले करून दाखवण्याची इच्छा. आई बाबांनी लग्न करून टाकले. माहेरी म्हणाले सासरी शिक आणि नोकरी कर. सासरी पण पुढे शिकू देत नाही. नोकरी करू देत नाही. का बरं? स्त्री आहे चूल आणि मूल पहा सासू आणि सासरे म्हणतात. सासुरवास, बंधने खुपच, सगळे करून कितीही करा कोणाला काही नाही. उलट सारखी सासू, सासरे, दिर, मोठ्या जावा, नणंदा, नवरा यांची रोज सारखी कुचकट बोलणी, अपमान, उणी - दूणी काढणे, माझ्या आई आणि बाबाचा उध्दार येता जाता, नवरा काही बाजूने नसतो कधी, वेळ देत नाही. माझ्या आई बाबांनी खुपच दिले पण हाव सासरच्या लोकांची संपतच नाही. नवरा दारू पिऊन रोज मारतो. कंटाळून आत्महत्या.


रेणुका त्या बाईला म्हणाली - लढ शेवटच्या क्षणापर्यंत. का तू तुझे आयुष्य संपवायचे. म्हणणे सोपे असले. तरी मनुष्य जन्म मिळाला आहे. जग चांगले करून दाखव. ईथे सीता आणि द्रौपदी ना वनवास झाला. सीतेला अग्निपरीक्षा द्यावी लागली. आपण तर सामान्य स्त्रीया आहोत. ईथे झाशीची राणी लक्ष्मीबाई बनून लढत रहायचे स्त्रीचे आयुष्य. काहीही झाले हार मानायची नाही. श्रीकृष्ण येईल आणि सुरक्षा करेल आता कलियुगात असे नाही. आपण स्वतः ला पक्के करायचे बाई आता. सगळ्यांना सासुरवास कमी जास्त आहे. आता फक्त तोंड द्यायचे. मनाला इतके खंबीर करायचे.त्या बाईला आत्महत्या करण्या पासून परावृत्त केले रेणुकानी तिला घरी पाठवले.



घरी रात्र होऊन जाते जायला. प्रवासात दमणूक होऊन जाते. खुप दमतात. रस्त्याने हॉटेल मध्ये जेवतात. घरी गेले की दमून झोपतात.


रेणुका आणि देवेंद्र यांच्यात भांडण होते. देवेंद्र रेणुकाला म्हणाला - तुझ्या पोटात संशयाचा गोळा आहे. रेणूका बेडरूमच्या दाराला आतून खुर्च्या लावते. आवाज होईल जाग येईल म्हणून. नवरा म्हणाला - मला हे पटत नाही. मी इथे झोपणार नाही.


देवेंद्र, परी, दिर बाहेर हॉल मध्ये झोपतात. रेणुका एकटीच बेडरूम मध्ये झोपते. आतून बंद करून सुरक्षित वाटते. झोप चांगली लागते. रेणूकेला वाटते आपल्या नवऱ्या मध्ये आणि रेणुका मध्ये दुरावा आहे तो दिरामुळेच. रेणुका एकटी पडली जाणवते.


रेणुकाच्या स्वप्नात - प्रचंड मोठे शिव, रूद्राक्ष, डमरू, त्रिशूळ, चंद्र कोर डोक्यावर, नीलवर्ण, माथ्यावर गंगा त्या रूपाचे दर्शन घेतले. सकाळी रेणुका खुश होती स्वप्नाचा अर्थ चांगला असणारच वाटून.


रेणुका सकाळी एका राजकारणी स्त्रीचे भाषण टिव्हीवर ऐकते रेणुकाच्या मनात चालू असते - त्यात एक मुद्दा होता. स्त्री पुरुष यांचे प्रमाण निम्मे निम्मे म्हणले तरी स्त्रीयांना राजकारणात, मंत्री, खासदार, आमदार यांचे प्रमाण किती कमी आहे. बोटावर मोजता येतील इतके. स्त्रीयांना आजही निम्मा अधिकार आहे? समानता सोडा. स्त्री आजही किती कमी आहे. शिक्षणात हुशार असली तरी शिक्षण मिळत नाही. नोकरी करू देत नाही. नोकरी न करण्यात कारणे मूलांकडे लक्ष देणे, घराकडे लक्ष देण. स्त्रीचे कर्तव्य चूल आणि मूल यात पिढ्यानपिढ्या अडकून जाते. घर आणि मुलासाठी करीअरचा त्याग करते. नैसर्गिक दृष्टीने सुध्दा
स्त्री पुरूषापेक्षा कमी ताकदवान आहे. त्यात पाळी, गरोदरपण, बाळंतपण, सिझेरियन, रजोनिवृत्ती सगळ्यात स्त्रीची शक्ती किती क्षीण होत असते. दरमहिन्याला किती त्रास असतो. निर्मितीची शक्ती मोठी आहे स्त्रीची. पुरूषाला जन्मच स्त्रीच देते पण स्त्रीला मात्र स्थान दुय्यम....


रेणुका राज मूलासाठी हॉस्टेल मध्ये द्यायला त्याच्या आवडीचे लाडू करण्याचे ठरवते. त्याला काही 2-4 वस्तू द्यायला हव्यात म्हणून पोरीला घेऊन मॉल मध्ये जाते. राज मूलाकरता खरेदी करून बाहेर येते. मॉलच्या बाहेर दारात येते इतक्यात एक मूलगा गाडीवर येतो आणि रेणुच्या जवळ उभ्या असलेल्या मुलीच्या चेहऱ्यावर अ‍ॅसिड फेकून निघून गेला. इतक्या लवकर हे सगळे घडले. परी रेणुकाची लहान मूलगी घाबरून जाऊन रडते. परीला पोटाशी धरते. घाबरू नकोस आई आहे म्हणून समजावून सांगते.


ती चेहरा भाजलेली मूलगी जोरात ओरडते, रडते, खाली पडते. रेणूका त्या मूलीला एका दुसऱ्या माणसाच्या कार मध्ये हॉस्पिटल मध्ये नेते. त्या मुला विरोधात केस फाईल करते. रेणूका पोलिसांना सांगते त्या मॉल चा सिसिटिव्ही पहा त्यात तो माणूस दिसेल.


ती भाजलेली मुलगी पोलिसांना दुसऱ्या दिवशी साक्ष देते - एकतर्फी प्रेमातून त्या मुलीवर अ‍ॅसिड टाकले कळते. तो मुलगा प्रेम आहे म्हणाला होता. या मूलीने नकार दिला. त्यामुळे त्याने असे केले.


रेणुकाला प्रश्न पडतो खरंच याला प्रेम म्हणतात? काय स्त्रीयांवर किती अन्याय आहे. स्त्रीयांना किती त्रास आहे. आता त्या मुलीचा चेहरा किती कुरूप होईल. किती मानसिक, शारीरिक त्रास आहे स्त्रीला.


रेणुका त्या मुलीला जाऊन भेटून तिला जमेल तसा धीर देण्याचा प्रयत्न करते. तिला नव ऊमेद देण्याचा प्रयत्न करते. तिच, तिच्या आई आणि बाबांचे सांत्वन करून. निरोप घेते.


रेणुका देवेंद्रला म्हणते - या अ‍ॅसिड प्रकरणावरून स्त्रीयांची कलियुगातील सत्य स्थिती किती वाईट आहे. हे पाहून फार दुःखी होते. स्त्री जन्म किती वाईट आहे, अवघड आहे. जाई त्याच्या वंशा तेव्हा कळे.. फक्त एवढेच कळकळीने सांगते. स्त्रीयांना मान द्या. त्यांचा अपमान करू नका. आपली आई, बहिणी आजी सारखे इतर स्त्रीयांकडे पहा. गृहिणी असो, नोकरी व्यवसाय करून घरचे करणारी असो. स्त्रीयांना सन्मान, प्रेम, सुरक्षितता द्या. बघा त्या घरी किती आनंदी आनंद असेल


क्रमशः


सौ. भाग्यश्री चाटी सांबरे.
©®



हि एक काल्पनिक स्त्रीवादी कथा मालिका आहे. कृपया जास्तीत जास्त शेअर करा. आवडली तर लाईक करा. विनंती तुमची कॉमेंट द्यायला विसरू नका.

🎭 Series Post

View all