रेणुका रेडिओ वर सकाळी गाण ऐकत होती.
"घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात..
माहेरी जा सुवासाची कर बरसात.."
रेणुका सकाळी नवऱ्यासाठी आणि दिरासाठी डबा देण्यासाठी पोळी भाजी करत होती. दिराला हि भाजी आवडत नाही. ती भाजी आवडत नाही. सासू, सासरे यांचे वेगळे. त्यांना शुगर मुळे, ऑपरेशन मुळे पथ्य ही भाजी चालत नाही. ती भाजी चालत नाही. 2 पोरांचे वेगळेच. रेणुकाची सकाळची स्वयंपाकाची घाई. रोजचीच. " जन्म बाई चा.. बाईचा.. खुप घाई चा...." स्त्री ना मग यातून एक दिवस सुट्टी नाहीच. बाई म्हणले की पाचवीला पूजलेले.. चटके, कापणे, तासनतास ओट्यापाशी उभे राहून चालूच.... शेवटी करून करून सवय होते. एकीकडे भाजी एकीकडे पोळ्या तासाभरात.... सोबतीला गाणी गुणगुणत चालू काम. माहेरी कधीही एक पोळी न लाटणारी रेणुकाच्या पोळ्यांचे कौतुक खुद्द सासुबाई करायला लागल्या होत्या. रेणूका आता खटल्याच्या घरात 7 जणांसाठी करत होती रोज. सकाळ आणि संध्याकाळी घाण्याला जुंपलेल्या बैलासारखी. एक दिवस सुट्टी नाही. बैलाला तरी एकदिवस पोळ्याला सुट्टी मिळते.
सगळे आवरून रेणुका बसली तेच गाणे तोंडात बसले होते घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात.. माहेरी जा सुवासाची कर बरसात..
रेणुकाला आई, बाबा, माहेर राहिले नाही. याचे दुःख रेणुकाला वाटले. कामाच्या गडबडीत एवढे जाणवले नाही. निवांत बसल्यावर गाणी गुणगुणत असताना डोळे पाणावले.
रेणुका मनात स्वतःला समजावते-
स्त्री म्हणले की आलेच सासर आणि माहेर ...
स्त्री म्हणले की आलेच माहेरची ओढ आणि माहेरचा दुरावा.
स्त्री म्हणले सासरी सासुरवास आणि माहेरीच काय ती माया....
माहेर नाही याचा गैरफायदा दिर रोजच घेतच होता असे वाटले. रेणूकाला तिचे आयुष्य पक्के खंबीर करत होते. तिची दुःख तिला परमेश्वराच्या जवळ घेऊन जात होती. आता ती विठ्ठल आणि रूखमिणी तुच मायबाप आहे मला आणि पंढरी माझे माहेर आहे. एकदा जावे आषाढी वारीला चालत असे ठरवते.
संध्याकाळी देवेंद्र आज रेणुकाला बाहेर पाणीपुरी खायला नेणार ठरले आणि देवेंद्र डबा घेऊन निघाला नोकरीसाठी.
संध्याकाळी पाच वाजताच देवेंद्र आल्यावर रेणुका आणि देवेंद्र बाहेर पडतात. घरी जाताना भाज्या घेऊन जाण्याचे ठरले होते. भाजी मार्केट मध्ये रेणुकाची शाळेतली बालमैत्रीण तिच्या पुढच्या बेंचवर / बाकावर बसणारी राखी रेणुकाला भेटली.
रेणुका म्हणाली - ए तू राखी ना. ओळखू येईना. कशी दिसायला लागली आहे वेगळीच. रेणूका तिच्याकडून नंबर घेते तिला नंबर देते. तिला घरी बोलावते. इतक्या वर्षांनी बालमैत्रीण भेटल्याचा आनंद वेगळाच असतो.
एकदा ठरवून राखी 2 पोरांना खाऊ घेऊन रेणूकाच्या घरी येते.
रेणुका राखीला म्हणाली - तुला काय झाले तु अशी का दिसतेस? डोळ्याखाली काळी वर्तुळे, चापून चोपून वेणी. ऊंची वाढली नाही तिच शाळेतली.
रेणुका राखीला म्हणाली - तुझ्या आयुष्यात पुढे काय झाले? रेणुका विचारते शाळा संपली की आज इतक्या वर्षांनी भेटली.
राखी सांगते - आई आणि वडीलांनी माझे लग्न केले. त्या मुलाचे दुसऱ्याच मुलीवर प्रेम होते. त्याच बळजबरीने त्याच्या घरच्यांनी माझ्याशी लग्न लावून दिले म्हणे. माझी पाळी येईना. मला मुलबाळ नाही म्हणल्यावर त्याच्या घरच्यांनी घटस्फोट घ्यायला लावला. नवऱ्याचे प्रेम नव्हतेच. त्यांनी मागितला मला.
माझ्या आई बाबांना कळले सगळे. ते म्हणाले घेऊन टाका. झाला घटस्फोट. स्त्री म्हणून जन्माला आले. शिक्षा झाली. स्त्री म्हणून जन्माला आले आणि मुलबाळ नाही. मग किती आणि काय बोलणी खाल्ली. शेवटी घटस्फोट मिळाला. खुप डॉक्टर केले. पाळी नाही. मुलबाळ नाही सांगितले. संसार झाला नाही. स्त्री असून मुलबाळ नाही त्या स्त्रीला काय मान? मुलबाळ झाले तरच स्त्रीला पुर्णत्व येते.
मग आई आणि बाबाच्या घरी आले. घटस्फोट होऊन लग्नानंतर परत माहेरी येण फार वाईट. आई बाबा दोघेही मला पहातात. त्यांचे घर मोठे आहे. मोठ्ठी बिल्डींग. घटस्फोटित स्त्री म्हणजे एकटी फारच वाईट आयुष्य आहे. एकदा मुलगी लग्न करून गेली की सासर तिचे घर. माहेरी फक्त पाहुणी 4- 8 दिवस आनंदात या रहा स्वागत होते. कायमसाठी परत आलेली भावजयीला ओझेच होते. भावालाही हळुहळु तसेच वाटू शकते.
रेणुका तूला भाऊच नाही. तर तू म्हणू शकते नाहीच. हळूहळू भाऊ नाही काही वाटत नसेल. सवय होत असेल. पण माझा मोठा भाऊ मी वर्षानुवर्षे राखी बांधली एवढे सख्खे भाऊ आता एक शब्दही बोलत नाही.
राखी आई आणि बाबांना म्हणाली - एक खोली द्या. वेगळी रहाते. ते नाही म्हणतात.
आता भावजयीला कायमची नणंद सांभाळणे जड झाले. भावजय माझ्या विरोधात भावाचे कान भरले. भाऊ एका घरात राहून एक शब्दही बोलत नाही.
त्या भावाचे लग्नाच्या आधी इतके केले. त्याला नवीन किडनी आईची बसवली. त्याच्या दोन्ही किडन्या फेल झाल्यावर. त्याचे खुपच केले मी. भावाची जीवापाड काळजी घेतली मी. केले तेव्हा किती चांगला बोलायचा. आता एक शब्दही बोलत नाही.
राखी घडाघडा बोलून रेणुका जवळ मन मोकळे करत होती. रेणूकाला वाईट वाटले. रेणूका ऐकत होती.
राखी पुढे रेणुकाला म्हणाली - आता भावजयच्या बरोबरीने काम करावे लागते घरी. भावजयीला राग येतो तिने काम केले. मी नाही केले की. ती माझी बरोबरी करते. भावाची 2 पोर मी सांभाळते. घरची रोज काम करते. आई वडीलांच्या नंतर हेच भाऊ आणि भावजय मला पाहतील. त्यामुळे भावजयीचे बोलणे सहन करते.
मी कुठे बाहेर फिरायला गेले. आई बाबा बरोबर की भावजयीला राग येतो हे फिरतात. ती घरी काम एकटीच करते. मग कुठे जात नाही मी घरीच असते. आश्रित आहे मी. राखी रडायला लागते. रेणूकाला वाईट वाटले ती राखीला सावरते.
राखी आता जगायचे म्हणून जगत होती. एक नोकरी करत होती. पाच - दहा हजार कमवत होती.
रेणुका राखीला म्हणाली - नोकरी करते छानच आहे राखी. तू तुझ्या पायावर ऊभी आहे. खरचं फारच छान. अशा विषम परिस्थितीत नोकरी करते मोठी गोष्ट आहे. कोणावर अवलंबून नाही तू. चांगले आहे.
रेणुकाच्या मनात - घटस्फोटित स्त्रीचे दुःख काय आहे ते नव्याने समजले. घटस्फोटित स्त्रीकडे पाहण्याचा जगाचा दृष्टिकोन कसा असतो. किती अवघड आहे.
राखी म्हणते - रेणुका मी तुला हक्काने माझ्या माहेरच्या घरी बोलावू शकत नाही. भावजय मला वाटेल तसे बोलेल. तूला साध पाणी पटकन मिळणार नाही. मी सहन होत नाही. माझ्या मैत्रीणीचे काय स्वागत होणार आहे.
राखी म्हणते - रेणुका माझी भावजय झाली सासू मी झाले सून. उगाच माझ्यामुळे भांडण नको म्हणून मी गप्प बसते. आई आणि बाबांना आपल्यामुळे अजून त्रास नको.
रेणुकाला कळत नाही हिचे सांत्वन कोणत्या शब्दात करावे. रेणूका मनात विचार करते स्त्री म्हणले की किती वेगवेगळे त्रास, दुःख आहेतच. किती स्त्रीयांचे काय काय दुःख आतापर्यंत रेणूकाने पाहिली आहे.
राखी पुढे म्हणते - मला कशात रस वाटत नाही. कुठे जाव वाटत नाही. कुठे यावे वाटत नाही. साधे कशीही रहाते. माझे सोड. तुझे सांग. कशी आहे. काय चालू आहे तुझे. रेणुका....
रेणुका राखीला म्हणते - सगळ्यांना सुख दुःख आहेतच. जगी सर्व सुखी असा कोण आहे? कमी किंवा जास्त. आहेतच.
रेणुका राखीसाठी चहा करते. पोहे करते. दोघींना शाळेतल्या डब्याची आठवण येते. शाळेतले कोण कोण तूझ्या टच मध्ये आहे. विषय निघाला. हसतात दोघी शाळेच्या आठवणीत रमतात जरा.
रेणुकाला आईचे शब्द आठवतात. आपल्यापेक्षा गरीब माणसाकडे पहायचे आणि आपण देवाचे आभार मानायचे आपल्या सुखी ठेवले. धन्यवाद देवा.
क्रमशः
सौ. भाग्यश्री चाटी सांबरे
©®
©®
हि एक काल्पनिक स्त्रीवादी कथा मालिका आहे. कृपया आवडली तर शेअर आणि लाईक करा. विनंती कथा कशी वाटली जरूर सांगा आपला अभिप्राय आवश्य नोंदवा.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा