राजची मुंज करण्यासाठी रेणुका देवेंद्रच्या मागे लागते. 16 संस्कारापैकी मुंज हा महत्त्वाचा संस्कार. पुर्वीच्या काळी बटू विद्या प्राप्त करण्यासाठी गुरूकडे आश्रमात जात होते. आता राज ही सैनिकी शाळेत जातो आहे. राज हॉस्टेल मध्ये रहाणे, शाळेत मेस मध्ये जेवण, तिथे शिक्षण घेणे. याआधी राज आजी, आजोबा सोबत गावी आई, बाबा, बहिण, काका यांना सोडून पूर्ण सुट्टी मध्ये मजेत रहात होता. आजी आजोबा लाड करत होते. शाळा सुरू झाली की इकडे आई, बाबा, काका, बहिण सोबत रहात होता. पण एकटाच शाळेत हॉस्टेल मध्ये रहाणे नको म्हणत होता. नवीनच शाळा सुरू झाली होती. अजून अॅडमिशन चालू असल्याने तिथे अजुन खेळ सुरू झाले नव्हते. नुकतीच शाळा सुरू झाली.
देवेंद्र, आजी, आजोबा, काका सगळे भावनिक विचार करून म्हणत होते - राज रडतो खूप. त्याला एकट्याला ठेवणे पटत नाही. तिथे पटकन फोन वर बोलणे होत नाही. शेवटी घर घर असते. होस्टेल मध्ये एकटे राहणे यात जमीन अस्मानाचा फरक आहे. एकदम त्याला सवय नाही. एकटे रहाण्याची..
रेणुका एकटीच देवेंद्रला म्हणत होती - नको आणायला राजला. तिथे एकट्याने स्वावलंबी होईल. खेळात आवड आहे तर एखाद्या खेळात पक्का झाला त्यात चांगले करीअर करेल. शिक्षण चांगले झाले पुढे करीअर होईल. घरी सगळे अति लाड करतात. आजीचा मोबाईल रात्रंदिवस खेळत रहातो. अभ्यास करतच नाही घरी. हि भाजी नको. ती भाजी नको. मग हट्ट श्रीखंड आणि आम्रखंडच पाहिजे मगच जेवतो. मग लाड आण बाबा. परीक्षेत चांगले गुण नाही. लहान बहिणी सोबत मारामारी. एक शब्द ऐकत नाही राज.
देवेंद्र रेणुकाला म्हणाला - तू कशी आई आहेस. तुला काही नाही. एकदा रडली नाही. इथे आणू नको म्हणते. तू चांगली आई नाही.
रेणुका देवेंद्रला म्हणाली - उगाच भावनिक होऊन काय आहे. रडून काही होत नसतेच. तिथेच त्याचे चांगले करीअर होत असेल तर त्याच्या भविष्यासाठी कठोर निर्णय घ्यावा लागेल. नका आणू घरी त्याला. तूम्ही चांगले वडील नाहीत. भविष्याचा विचार करत नाही भावनिक विचार करता.
देवेंद्र रेणुकाला म्हणाला - तू चांगली आई नाही. म्हणून राज तुला दुरावला आहे.
रेणुकाच्या मनात - खरचं आहे. राजला 4 महिन्याचे सोडून नोकरी करावी लागत होती. देवेंद्रचा पगार नव्हता मिळत तेव्हा. मग नोकरीसाठी आई बाहेर पडल्यावर राज / मुलाला वेळ देऊ शकले नाही. आजी गावी त्याला घेऊन गेली. राज आईला दूरावला. त्याला आजही आजी आणि गावीच आवडते. झोपायला बाबा आणि काका लागतात. आईला हात सुद्धा लाऊ देत नाही. आई फक्त 9 महिने पोटात सांभाळायला. पोट फाडून जन्म द्यायला , लहानपणी लंगोट धुवायला , शी, शू काढण्याकरता, हॉस्टेल मध्ये रहाणार म्हणून त्याच्या आवडीचे लाडू करून द्यायला. बाकी आई राजला लागतच नाही. साधा आई जवळ येत नाही. गावी राहिला तर आईला कधीच एक फोन नाही. आई अभ्यास कर म्हणते. आई सगळ्या भाज्या खा म्हणते. कडक रहाते म्हणून. त्रास दिला की चोप देते. आई वाईट आहे.
देवेंद्र या रविवारी राजला परत घरी आणणार हे ठरवून मोकळे झाले. रेणुकाचे कोणी काही ऐकायला तयार नाही.
रेणुकाच्या मनात - सासरी फक्तं सकाळ संध्याकाळ स्वयंपाक करणे. भाजी - पोळी करणे. घर झाडणे, केर टाकणे, गॅस - ओटा धुणे, जिने झाडणे, सणवाराला स्वयंपाक करणे, सणवाराला पुजा, विधी काय ते करणे एवढेच. बाकी ती एकटीच मनाने, शरीराने रेणुका एकटीच बेडरूम मध्ये झोपते. देवेंद्र, दिर आणि मुलगी बाहेर झोपतात. मुलीसाठी घरी राहून. तिच्यासाठी करीअरचा त्याग करून रेणुकाला दुरावत चालली आहे. परीचे अजून शी धुणे. वडील नोकरीसाठी दिवसभर बाहेर गेले की परीला खाऊ घालणे, परीला दूपारी झोळीत झोपवणे याकरता आई लागते. रात्री बाबा घरी असले की परीला बाबाच लागतात खाऊ घालायला. मग आई नकोच. सरळ म्हणते ती. रेणूकाला एकटेपणा कधी सोयीचा. एकटेपणा कधी सुखाचा वाटायला लागतो. तर कधी एकटेपणा खायला उठतो.
देवेंद्र काही वाईट झाले तर सरळ रेणुकाच्या डोक्यावर खापर फोडून मोकळा तुझ्या मुळेच झाले आहे. मुलाला हॉस्टेल मध्ये तुझ्यामुळेच टाकायला लागले. मुल काही वाईट वागली. मूले ऐकत नसली की देवेंद्र रेणुकाला म्हणतो न ऐकणे कुणाचा गुण आहे? रेणूकाचा. मूले वाईट वागली की ती रेणुकावरच गेलेली असतात. तेच परी काही चांगली वागली की ती लगेच देवेंद्रवरच गेलेली असते.
रेणुका देवेंद्रला म्हणाली - सासरे, सासुबाई, दिर, नवरा, दोन्ही मूले एका गटात सगळे एकमेकांची वकीली करतात. एकमेकांची बाजू घेतात. रेणूका 14 वर्ष झाले एकटीच आहे. टार्गेट करायची वेळ आली की घरातली स्त्री म्हणून, सून म्हणून, आई म्हणून , बायको म्हणून रेणुकाला कायमच कॉर्नर केले जाते. एकटे पाडलेच जाते. बाकी सगळे एक होतात. बऱ्याचदा घरच्या इर्टिगा मधून सगळे गावी जातात. रेणूका एकटी नोकरीच्या गावी रहाते. तेव्हा तिला स्वयंपाक, कामापासून सुट्टी मिळाली म्हणून, कूचकी बोलणी, दिराचा त्रास नाही म्हणून आनंदाने रेणुका एकटी रहाते.
वस्तुस्थिती - ( रेणुकाला बऱ्याच वेळा नवरा गावी चल म्हणत नाही. आम्ही निघालो म्हणून सांगतो. रेणूका हो म्हणते. रेणूकाला गावी सासरी जाऊन खुपच काम आणि खुपच बोलणी, वाईट अनुभव यापलीकडे काही नाही मिळत. परीला फोर व्हिलर, गावी जायचे खेळायला भरपूर मोकळी जागा आणि मैत्रीणी भेटतील म्हणून आनंदाने जाते. रेणूका आणि परी दोघीच असल्या की परीला बोर होते.)
रेणुका म्हणाली देवेंद्रला - माझ्या स्वप्नात राज आला. टाटा करत होता. आनंदाने.
रेणुका म्हणाली देवेंद्रला - राज साठी काय करून घेऊ. चिवडा, लाडू. देवेंद्र काही नको. त्याला इकडेच आणायचे आहे.
रेणुकाच्या मनात दोन गाणी येतात -
"तुमी एकला चालो. एकला चालो. एकला चालो रे...." हे एक गाणे बंगाली आणि दुसरे मराठी " गुंतूनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा...."
रेणुकाला जाणवले मुलांना जन्म देणे यासाठी आपण निमित्त मात्र आहोत. मूलांना त्यांचे शिक्षण त्यांचे विचार आहे. स्वतंत्र आहे. मुलांना त्यांचे करीअर आहे. फारतर आपल्या पोटचे म्हणून आपण जीव लावणे, पैसा लावणे, त्याच्या करता काही करणे इतकेच आहे. बाकी त्यांनी तुमच्याशी कसे वागायचे हे सर्वस्वी त्यांच्या हातात आहे. आई जन्माची धनी आहे. कर्माची नाही. चांगले शिकवण्याचा प्रयत्न करायचा. त्यांना संस्कार लावणे, वळण लावणे प्रयत्न करायचा. हाताला धरून कोणी काही शिकवत नसते. मूल पाहूनच शिकतात. पंख फुटले की एक दिवस उडून जातात. मूलगी मोठी झाली की सासरी जाते. मूलगा शिक्षण, नोकरी किंवा लग्न झाल्यावर वेगळे निघूच शकतात.
रेणुकाच्या मनात - रेणुकाच्या पत्रिकेत प्रीती षडाष्टक योग आहे. कुणाचे किती करा. कुणाला जाणीव नाही. कुणाला रेणुका बद्दल विशेष ओढ नाही. रेणुकावर कोणी प्रेम करत नाही. रेणुकाची आठवण कुणाला नाही. रेणूकाला माहेर नाही. सासरी जवळच कोणी नाही. कोरडे आयुष्य. मायेचा ओलावा नाही. एकटेपणा हाच सोबती. त्यातल्या त्यात नवरा जवळचा तो तसा कधीही बाजूने ऊभा नाहीच. एकटेपणा स्वातंत्र्य, आनंद, देऊन जातो. एकटेपणा मध्ये तुम्ही परमेश्वराच्या जवळ जाता. जगाचा फोलपणा कळतो. एकटेपणा मध्ये तुम्ही स्वतःला वेळ देता. एकटेपणा एन्जॉय करता आला तर शांती देऊन जातो. एकटेपणा एक प्रकारचा ठेहराव देतात विचारांना, तुम्हाला. गर्दीत एकटे असल्याचा एक फायदा कुणाला बांधील नाही. अडकून रहाण्यात मजा नाही. आयुष्यात आलो ही एकटे आणि जाणार ही एकटेच. आपले कर्मच आपल्या बरोबरच जाणार बाकी काही नाही. कर्तव्य पुर्ण करायची. कर्म चांगली करत रहायचे. बस्स.
क्रमशः
सौ. भाग्यश्री चाटी सांबरे
©®
हि एक काल्पनिक स्त्रीवादी कथा मालिका आहे. आवडली तर शेअर आणि लाईक करा. कृपया तुमची कमेंट द्यायला विसरू नका
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा