Login

तिचे जग भाग 30

Tiche Jag Bhag 30


तिचे जग भाग 30


रेणुका सगळे आवरून झोपायला बेडरूम मध्ये दमून भागून गेली. एकटीच बेडरूम मध्ये झोपली होती. पडल्या पडल्या लगेच डोळा लागला. अचानक झोपेतून जागी झाली. मोबाईल वाजत होता त्यात अलार्म वाजला 11 वाजून 50 मिनीटे दिसली. बंद केला. डोळे मिटून पडणार.


बेडरूम बाहेरून नवरा देवेंद्र दार वाजवत होता.


काय आहे रेणुकाने विचारताच.


देवेंद्र रेणुकाला म्हणाला - अर्जंट दार उघड.

रेणुकाने आपले बेडरूमचे दार उघडले आता देवेंद्र तिला बाहेरच्या खोलीत घेऊन गेला.


एकदम ती जाताच लाईट लागले. सगळीकडे इतका प्रकाश. खास लाईट लावले होते. लाल हार्ट शेपचे फुगे होते. समोर केक. केक दिल शेपचा रेणुका लिहिले सजवलेला. गुलाबाच्या लाल पाकळ्या डेकोरेशन. औक्षणाचे ताट तयार होते. रेणूकाला देवेंद्रनी नवीन छानच लाल ड्रेस आणला. देवेंद्रनी घालून यायला सांगितले. रेणुकाने नवीन ड्रेस घालायच्या आधी त्याला कुंकू लावले. रेणूकाला ड्रेस त्याचा रंग खुपच आवडला.


देवेंद्रनी बरोबर 12 वाजता केक कट करायला लावला रेणुकाला. रेणूकाने केक कट करताच परी, राज, देवेंद्र, दिर म्हणाले " हॅप्पी बर्थडे टू यू. हॅप्पी बर्थडे डिअर रेणुका. हॅप्पी बर्थडे टू यू. मे गॉड बेल्स् यू.... "


केक देवेंद्रनी रेणुकाला भरवला. देवेंद्रनी रेणुकाला औक्षण केले. रेणूकाला गिफ्ट दिले सोन्याची अंगठी. जी गुडघ्यावर येत रेणुकाला घातली. अंगठी जड होती आणि सुंदर डिजाईनची होती. नवऱ्याचे आज इतक्या वर्षात नवीन रूप रेणुका पहात होती. रेणूकाला आज सुखद धक्का बसला होता. देवेंद्रनी रेणूकेचा वाढदिवस साजरा केला पहिल्यांदाच आणि थाटामाटात केला. रेणूका विचारत होती अंगठी कितीला? अंगठी किती ग्रॅम? आज कसे ठरवले? देवेंद्रनी अंगठीचा बॉक्स आणि अंगठीचे बील रेणूकाला दिले म्हणाला बदलून आणायची असेल तर बदलून मिळेल. रेणूका म्हणाली नको हिच डिझाईन छानच आहे. इतक्यात डेअरी मिल्कची मोठी कॅडबरी रेणुकाला देवेंद्रनी दिली. मग काय फोटो, सेल्फीला उधाण. रेणूकाने नवीन ड्रेस बदलला रात्री उशिरापर्यंत वाढदिवस साजरा झाला. 2 पोर झोपी गेले काकाच्या जवळ. देवेंद्रला रेणुका आज खुप खुश पहायला मिळाली. एक वेगळाच आनंदी आनंद घरात झाला. आणि तीन गोष्टी देवेंद्रनी केल्या वाढदिवस साजरा करण्याचे सरप्राईज, सोने घेतले, केक खुपच छान होता. कॅडबरीनी तर बहार आणली.


रेणुकाने हि गोड आठवण कायम मनाच्या कोपर्‍यात जपून ठेवली. रेणुकाच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. रेणूकाला आज आनंदी पाहून देवेंद्रही आनंदी झाला. पोरही केक, फुगे यात रमली होती. रेणूकाला वाटले लक्षात ठेवून प्लॅन केला आणि रेणूकाला काहीही माहिती नाही. अचानक झोपेतून जागी झाली होती. आता झोपच येईना. देवेंद्र सोबतच्या 15 वर्षाच्या प्रवासात किती सुख आणि दुःख पाहिली होती. किती चढ उतार पाहिले पण दोघांनीही एकमेकांची साथ न सोडता एकमेकांना साथ वेळेला दिली होती. परमेश्वराला आभार मनापासून रेणुका मानत होती आजच्या वाढदिवसाच्या साजरा झाला म्हणून आणि देवेंद्रचेही आभार रेणुकाने मानले.


देवेंद्र आणि रेणुका बोलत दोघे बेडरूम मध्ये गेले. बेडरूमचे दार देवेंद्रनी बंद केले. देवेंद्रनी रेणुकाला बेडरूम मध्ये जवळ ओढले. तिच्या गालावरच्या सौंदर्य बटा देवेंद्रनी हाताने हळूच बाजुला केल्या. रेणूचा गोरागोमटा चेहरा आनंदाने खुलला होता. आज देवेंद्र आणि रेणूका बऱ्याच वर्षांनी खुप जवळीक आले. देवेंद्र चा स्पर्श रेणुला होत रेणुका नवऱ्याच्या मिठीत लाजेने मिटत गेली. नवीन ड्रेसच्या मागच्या दोरी गाठी देवेंद्रनी सोडून हळूहळू हुक काढले. बेडरूम मध्ये दोघेच. दोघेही एकमेकांना असे बघत बिलगले होते.... दिवे बंद केले.. मोठ्या दिवाणावर देवेंद्रनी रेणुकाला उचलून ठेवले.
आज रेणुका आणि देवेंद्र एक होऊन गेले. बऱ्याच वेळाने भानावर येत दोघेही सावरले. देवेंद्र बाहेर मुलांच्या जवळ बाबा लागतातच झोपायला. 2 पोर राज आणि परी बाबांच्या, काकाच्या कुशीत झोपतात म्हणून बाहेर गेला.


रेणुका एकटीच बेडरूम मध्ये झोपली. सकाळी रविवारी मावस मोठ्या नणंदबाईकडे पुरणपोळी पार्टी ठरलीच होती. सगळ्या घराला बोलवले होते. भरपुर नातेवाईक मंडळी तिथे जमणार होती. सासूबाईना माहेरी खुपच नातेवाईक आणि सगळे भेटतात. एकमेकांना धरून आहेत. रेणुकाच्या माहेर सारखे नाही म्हणून सासूबाई माझ्या माहेर कसे चांगले. तूझे माहेर कसे यावरून रेणुकाला खुप ऐकून घ्यावे लागते सासूबाईंचे कायमच.

सकाळी दहा वाजता नणंदबाई कडे सगळे गेले. रेणूकेचा खुश चेहरा पाहून नणंदबाई विचारत होत्या. आज रेणुका खुश दिसते आहे. काय स्पेशल आज.


दिर सांगतो - ताई आज वहिनीचा वाढदिवस आहे.

रेणुकाने अंगठी दाखवली वन्सांना.

वन्सांना आवडली अंगठी छानच आहे.

नणंदबाईनी - वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा रेणुकाला दिल्या. रेणूका नणंदबाईच्या पाया पडली. नणंदबाईनी अनायासे पुरणपोळी पार्टी ठेवली होती. नणंदबाई म्हणे तुझ्या वाढदिवसाची पार्टी समज. रेणूकाला मावस नणंदबाईनी केलेल्या पुरणपोळी जीवापाड आवडत होती. नणंदबाईनी केलेली पुरणपोळी मऊसूत, टंब फुगलेली, त्यावर साजूक तुपाची धार, अगदी ओठाने खावी इतकी छान. मावस नणंदबाई म्हणजे अगदी अन्नपूर्णाच. रेणूकाला मावस नणंदबाई आणि त्यांची पुरणपोळी दोन्ही अतिप्रिय. या मावस नणंदबाई रेणुकाच्या दूसऱ्या सिझेरियनला बाहेर उभ्या होत्या. घरून डबा करून आणत होत्या.
रेणुकाच्या वेळेला धावून कायम येत होत्या. रेणूकाला वाटायचे त्यांचे पूर्वीचे काही ऋणानुबंध नक्कीच असावेत.

जेवणाच्या पंगती झाल्या. सगळे पोट भरल्यावर पूरणपोळी मधले जायफळामुळे पुरणपोळी चांगली चढली. सगळे जमेल तसे पडले. थोड्या वेळ लोळत पडले. पुरणपोळी सार्थकी लागली. बायका बायका एका रूम मध्ये पुरूष वेगळ्या रूम मध्ये गप्पा रंगल्या संध्याकाळी सगळ्यांचे चहा पाणी, कुणाला कॉफी, मुलांना दुध झाले. उशी पास करायचा गेम झाला. गाण्याच्या भेंड्या झाल्या. डान्स झाला. गाणे म्हणणे झाले. ऊखाणे झाले. विनोद सांगून झाले. फूल एन्जॉय झाले.


रेणुकासाठी केक आणला नणंदबाईनी. केक कट केला. रेणूकाला सगळ्यांनी केक भरवला. मावस नणंदबाई, मामे नणंदबाई, त्यांच्या मुली पाच जणींनी रेणुकाला औक्षण केले. रेणूकेचा आज वाढदिवस खुपच मोठा साजरा झाला. आजचा रेणुकाचा वाढदिवस म्हणजे मोठी लॉटरीच रेणुकाला जणू लागली. आज इतका छान दिवस तिचा गेला.


रेणुकानी सगळ्या मोठ्यांचे आशीर्वाद घेतले पाया पडली. फोटो, सेल्फी, व्हॉटस् अँप स्टेटस झाले. देवेंद्र आणि रेणू, कुटूंबीय घरी निघाले.


रेणुकाला आज जाणवले आपल्या आयुष्यात 2 प्रेमाच्या, आपली काळजी घेणाऱ्या व्यक्ती आहे. त्यांना जपलेच पाहिजे. एक नवरा आणि दुसरी मावस नणंद. अशा व्यक्ती आपल्या आयुष्यात असतील तर त्यांना जपा त्या व्यक्ती देवाच्या आशिर्वाद आहे. देवाचे आभार मानले की तिच्या आयुष्यात नवरा आणि मावस नणंद आहे. आपल्या सुख आणि दुःखात आपल्या सोबत कायम असणाऱ्या व्यक्ती लाख मोलाच्या आहेत.


रेणुका देवेंद्र ला म्हणाली - रेणुकाच्या शाळेच्या व्हॉटस् अँप गृप वर शाळेतल्या मित्र, मैत्रीणीनी भरपूर दिवसभर शुभेच्छांचा पाऊस पाडला. बालमैत्री ती बालमैत्री याला शब्दच नाही. काही शुभेच्छा मिळाल्या की विशेष आनंद होतो. काही शुभेच्छा मनापासुन मनापर्यंत पोहचतात. त्यात आपलेपणाचा ओलावा असतो. बालमैत्री आजकाल सोशल मिडीयामुळे डिजिटली टिकून आहे. हेही नसे थोडके.


रेणुकाच्या मनात - वाढदिवस म्हणजे वयाने, शिक्षणाने, ज्ञानाने, अनुभवाने शहाणे होऊन मोठे झाले पाहिजे. याकरता आपले प्रयत्न आणि परमेश्वराचे आशिर्वाद लागतात. रेणुकाच्या कमी वयात चांगले, वाईट अनुभव, परिस्थिती चांगले शिकवत होती. खंबीर झाली होती. ध्येय आता दोन मूलाचे चांगले करायचे. मुलाचे शिक्षण आणि करीअर आणि लग्न याच गोष्टी वर फोकस करायचे. आपले कर्तव्य करत रहायचे. वाढदिवसाच्या निमित्ताने असे निश्चय केले. रेणुकाच्या कोरड्या आयुष्यात आजचा दिवस प्रेमाचा पाऊस, मायेचा ओलावा घेऊन आला. आज सुखात नाहून निघालेली रेणुका. आजचा दिवस म्हणजे पाचो उमलियाँ घी में.... असा गेला. सगळ्या गृहिणींना, सर्व स्त्रीयांना असा छान दिवस नक्की मिळावाच.


क्रमशः


सौ. भाग्यश्री चाटी सांबरे
©®


हि एक काल्पनिक स्त्रीवादी कथा मालिका आहे. आवडले शेअर आणि लाईक आवश्य करा. कमेंट करायला कृपया विसरू नका.

🎭 Series Post

View all