Login

तिचे जग भाग 31

Tiche Jag Bhag 31


तिचे जग भाग 31


रेणुकाला महिन्याच्या वर झाले पाळी आली नाही. संबंध एकदाच आला. तरीही भिती होतीच


रेणुका देवेंद्रला म्हणाली- अहो वर दिवस झाले. तरीही आली नाही.

देवेंद्र रेणुकाला म्हणाला- तुझे फारच टेन्शन असते.

रेणुका - माझे?


देवेंद्र रेणुकाला म्हणाला- चल दवाखान्यात. आज संध्याकाळी जाऊन येऊ.

रेणुका देवेंद्रला म्हणाली- मला भिती वाटते आहो.

नवरा म्हणाला रेणुकाला - नको नाटक करू. लवकर जाऊन येऊ.


रेणुका दवाखान्यात चेक अप करायला जाते.
डॉक्टर मॅडम - आधी किट नंतर सोनोग्राफी केली. रेणूका प्रेग्नंट आहे.


डॉक्टर मॅडम - रेणुकाला आधीचे काय आहे?

रेणुका - 2 सीझर झाले. मुलगा 12 वर्षाचा आणि मुलगी 6 वर्षाची.

डॉक्टर मॅडम - तिसरे नको आहे का?


रेणुका डॉक्टर मॅडमना - यांच्या सरकारी नोकरीत दोनच पाहिजे. तिसरे नाही चालत.


डॉक्टर मॅडम रेणुकाला - फॅमिली प्लॅनिंग ऑपरेशन का नाही केले.


रेणुका मॅडम ना - जिथे सिझेरियन झाले तिथे फॅमिली प्लॅनिंग / कुटुंब नियोजन ऑपरेशन करत नाही.


रेणुका मॅडम ना - एकदाच संबंध आला होता. असे होईल वाटले नाही.


रेणुका देवेंद्रला म्हणाली - भारी पॉवर वाढली आहे....


रेणुका मनात - खुप दुःखी झाली. आपल्या डोक्यावर एक पाप. एका लहानसा जीव घेतला.

देवेंद्रला मॅडम म्हणाल्या - सव्वा महिना झाला आहे. काय करायचे.


देवेंद्र डॉक्टर मॅडम ना म्हणाला - नको आहे मॅडम.


डॉक्टर मॅडम - गोळ्या देते. होऊन जाईल.

डॉक्टर मॅडम समोर रेणुका आणि देवेंद्र बसले आहे.


मॅडम रेणुकाला गोळ्या कशा घ्यायला हव्या सांगतात. मॅडम म्हणतात एखाद्या वेळी गोळ्या घेऊन पडत नाही. म्हणून पाळी येऊन गेली की 8 - 9 व्या दिवशी परत यायचे. सोनोग्राफी करायला. चेक करावं लागेल. गोळ्यानी पडले. का नाही. काही वेळा आधी सिझेरियन झालेल्या बायकांचे गोळीने पडत नाही. आतून स्वच्छ करायला लागत.


डॉक्टर मॅडम रेणुकाला - गोळ्या घेण्या आधी जेवण व्यवस्थित करायचे. गोळी घेतल्या वर पोटात कळा, चमका येतील. चक्कर येऊ शकते. जास्त अंगावर जाऊ शकते. जास्त त्रास झाला तर लगेच दवाखान्यात यायचे. रात्री अपरात्री जेव्हा वाटेल तेव्हा. गोळ्या आणि जेवण वेळेवर घ्यायचे.


रेणुका घाबरून गेली. रेणूकाच्या मनात सगळा त्रास बाईला आहे. पुरूषांना काही नाहीच. पुरूष करून सवरून नामानिराळे रहातात. निसर्गाने सुध्दा पुरूषांना काही दिले नाही. पाळी दर महिन्याला नाही. गरोदरपण नाही, बाळंतपण नाही, अ‍ॅबॉर्शन नाही.. सिझेरियन, प्रस्तुती वेदना काही नाही. पुरूषांना त्रास काही महितीच नाही. त्यांना काय कळणार त्यातील. एवढ असून एका एवढ्याशा जिवाला तुम्ही जगात आणले. तर आनंदात सगळे विसरून जातात. पण रेणुका एवढ्याशा जिवाला मारायचे नको वाटतं.. काय पाप उगाच डोक्यावर.


रेणुका दिराला म्हणते - रेणुका घरी गेल्यावर घाबरून जाते. नको वाटते गोळ्या घ्यायला.


दिर रेणुकाला - मी पुरूष आहे. मला काय सांगता? लाज वाटत नाही का?


रेणुका दिराला म्हणते - मग कुणाला म्हणू मी. माझ्याकडे कुठे 50 जण आहेत.


दिर रेणुकाला म्हणतो - मावस नणंदबाईना सांगा.

रेणुका मोठ्या मावस नणंद बाईना फोन वर सांगते. भिती वाटते म्हणून मी फोन केला सांगितले


मावस नणंदबाई रेणुकाला म्हणतात - तुला कळत नाही का. काळजी घ्यायचे. तूला बोलले तर राग येईल. लहान आहे का तु. ऑपरेशन करता नाही आले का तुला.


रेणुकाला भीती वाटत होती.

त्यात रेणुकाची सख्खी चुलत बहीण, तिचा नवरा, मुलगी त्यांच्या बँकेच्या कामाने रेणुकाच्या घरी आले मुक्कामी.


रेणुका चुलत बहीणीच्या मुलीला सांगते - मी जेवत आहे आतल्या खोलीत. तुझे वडील जेवायला बसले हॉल मध्ये त्यांना काय हवे नको ते पहा विचार भावजींना.

चुलत बहीणची मुलगी म्हणाली - आता तु सांगितले मी मुळीच उठणार नाही. जा. आजकालच्या काही लहान मुले अवघड आहे रेणुकाला जाणवले.


चुलत बहीणची मुलगी रेणुकाला म्हणाली - आम्ही गरजवंत आहोत म्हणून आलो. गरजवंताला अक्कल नसते. नाहीतर तुमचे तोंड पाहिले नसते.

रेणुकाला जाणवले लहान मुलगी चुलत बहीणीचे वाक्य बोलत आहे. मुले ऐकून बोलतात.

रेणुकाचा नवरा रेणुकाला रागवला - तुझ्या भावजींना तुला वाढता आले नाही का?

रेणुका म्हणाली मी पण जेवायला बसले नेमकी. त्यांना आधी विचारले होते. तेव्हा ते नाही आता नाही म्हणाले.


देवेंद्र रेणुकाला म्हणाला - तुझी नाटके बंद कर. घरी आल्यावर पाहुण्यांना जेवू घालायची जवाबदारी घरातल्या स्त्रीचीच.


रेणुकानी दिराला सांगितले - 8 - 10 दिवस बाई लाव पोळ्यासाठी. मला होत नाही. कुणाचीच मदत नाही.


दिराने पोळ्यासाठी बाई लावली.


त्यात सासुबाईचे सख्खे चूलत भाऊ वारले. त्यांना तिकडे 25 पोळ्या, पिठलं देणे गरजेचे होते.


रेणुकाला आराम तर नाही जास्तीत जास्त काम पडत होते. रेणूकाने पिठले केले.


घरात पाहुणे नेमके. बाहेर डब्बे देण गरजेचे. रेणूकाच्या अडचणीत वाढ झाली. मदतीसाठी कोणी नाही.


रेणुकाचे डोळे उघडले तेव्हा. जेव्हा मावस मोठी नणंदबाई फोन वर वाटेल तसे बोलली आणि भेटायला सुध्दा आल्या नाहीत. घराजवळच राहून. मोठ्या नणंदबाईच्या व्हॉटस् अँप स्टेट्स मध्ये त्या भिशीची पार्टी मोठ्या हॉटेल मध्ये भिशीच्या भरपूर मैत्रीणी सोबत हसत खेळत करत होत्या. हे रेणुकाने पाहिले.


रेणुकाच्या सासूबाईं इथे आल्या नाहीत. त्यांचे काम असले माहेरी काही कार्यक्रम किंवा सासूबाईंचे दवाखाने त्या दर महिन्याला 8-15 दिवस येतात. किंवा रेणुका, देवेंद्र, मुलगा राज, मुलगी परी, दिर दर महिना काही दिवस सासूबाईना, सासऱ्यांना सोडवायला गावी जात असतात.


रेणुकाच्या अ‍ॅबॉर्शन मध्ये मदत नाही देवेंद्र म्हणाला रेणुकाला बाई कशाला पाहिजे. तू कर पोळ्या घरी. बस्स झाले तुझी नाटके.


सासुबाई चा फक्त एक फोन रेणुकाला आला. गोळ्या घेतल्या का? बस्स.


फोन वर सासुबाई रेणुकाला म्हणाल्या - तिसरे बाळ होऊ दिले असते. तुझ्या नवऱ्याची सरकारी नोकरी नसती तर. दिराचे लग्न झाले नाही दिराला मुलेबाळे नाही. ते तिसरे दिराला देऊन टाकले असते. रेणूका तुझ्या दिराचे चांगले झाले असते. तिसरा मुलगाच झाला असता.


रेणुकाला वाटते कुणाचे काय.. कुणाचे काय..


रेणुकाला कळले आपले कोणी नाही. कोणी कुणाचे नसते. रेणूकाचे डोळे उघडले. रेणूकासाठी वेळेला कोणी आले नाही.


कठीण प्रसंगात आपले कोण परके कोण कळते. कठीण प्रसंगामुळे रेणुकाचे डोळे उघडले.


10 दिवस अंगावर खुपच गेल्याने रेणुकाला अशक्तपणा जाणवत होता. अंधाऱ्या डोळ्यासमोर येत होत्या. कंबर पाठ खुपच दुखत होती. रेणूका दुखण्याने एकटीच रडली. बाळ गेल्याने वाईट वाटले होते. रेणूकाला स्त्री जन्म किती अवघड आहे फारच जाणवले होते.


रेणुका, देवेंद्र परत डॉक्टर मॅडम कडे 10 व्या दिवशी जातात. रेणुकाची परत सोनोग्राफी होते. मग गोळीनी गर्भ पडला कळले. रेणूकाला खुपच शारीरिक व मानसिक त्रास झाला. देवेंद्र किती खर्च झाला सोनोग्राफी, फी, गोळ्या यांचा हिशोब सांगत होता.


रेणुकाला वाटले मनात - एखाद्या ठिकाणी मूल व्हावे म्हणून नवस करतात. श्रीमंती असून मुलांचे शिक्षण सगळे व्यवस्थित करू शकतात त्यांना कित्येक वर्षे मुले होत नाही. श्रीमंत देवाला नवस कर. श्रीमंत दवाखान्यात पैसे खुपच खर्च करतात. तरी मूल पटकन होत नाही. एखाद्याला तिसरे नको तरी राहतात. एखाद्या गरीबाला किती मुले असतात. मुलांच्या मुलभूत गरजा पण पुर्ण करू शकत नाही. त्यांना इतकी मुले.


रेणुका गाणे म्हणते - " उध्दवा अजब तुझे सरकार.. उध्दवा अजब तुझे सरकार.. लहरी राजा.. प्रजा आंधळी.. अधांतरी दरबार.."


रेणुकाचे चुलत बहीण, भावजी, मुलगी त्यांच्या कामाने आलेले पाहुणे. गेले त्यांच्या घरी.


क्रमशः


सौ. भाग्यश्री चाटी सांबरे
©®


हि एक काल्पनिक स्त्रीवादी कथा मालिका आहे. कृपया आवडली तर शेअर आणि लाईक करा. विनंती कमेंट द्यायला अजिबात विसरू नका.

🎭 Series Post

View all