©® स्मिता भोस्कर चिद्रवार.
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025
टीम श्रावणी
"सगळ्यांनी मला माफ करा.मी खूप चुकले. हो हो मीच चुकले.आधीपासून स्वतःचा विचार न करता फक्त तुम्हा सगळ्यांचा विचार केला.प्रसंगी मुलीकडे , नवऱ्याकडेही दुर्लक्ष झालं.पण आता मात्र नाही.मी आई बाबांची जबाबदारी घेऊ शकत नाही.कोणाला काय करायचं ते करा." आरोही निर्वाणीच बोलली.
"अग काय हे बोलतेस?काही वाटतं की नाही तुला? सासू सासरे म्हणजे तुझीच जवाबदारी नाही का?घरची एकुलती एक सून आहेस ना?" नीता आरोहीची नणंद चिडून बोलली.
"खरं आहे ताई तुझं. सून या नात्याने तुझंच कर्तव्य आहे ते.हवं तर एखादी बाई लाव अजून कामाला.पण या वयात आता त्यांनी कुठे जायचं?" आरोहीची दुसरी नणंद गीता सुद्धा चिडून बोलली.
"खरं आहे ताई तुझं. सून या नात्याने तुझंच कर्तव्य आहे ते.हवं तर एखादी बाई लाव अजून कामाला.पण या वयात आता त्यांनी कुठे जायचं?" आरोहीची दुसरी नणंद गीता सुद्धा चिडून बोलली.
"आरु, अग काय झालं तुला अचानक?हे काय बोलते आहेस?आजवर इतकं सगळं करत आलीस आणि आई बाबांचं तर माझ्यापेक्षा जास्त तू करतेस आणि आज असं काय झालं की हे बोलते आहेस आणि ते ही सगळ्यांसमोर." रोहित म्हणाला.आजवर कोणासाठी कधी कुठलाही वाईट शब्द तोंडातून न काढणारी आपली बायको आज ही असं बोलते आहे त्याचा त्याला धक्का बसला होता.
"देवा! उचल आता लवकर आम्हाला...वय झालं की गरज संपते म्हणतात ना तसं झालं आहे हिचं.आता या वयात आम्ही जड होणारच.आणि रोहित तू ही असा प्रेमाने बोलतो आहेस तिच्याशी?बायकोच्या ताटाखालचं मांजर आहेस अगदी." शीलाबाईंनी डोळ्याला पदर लावला.
"आरोही,हे जे काय चाललंय ना ते तू का आणि कोणाच्या शिकवण्यामुळे बोलते आहेस ते काही कळत नाही.पण आजवर इतकी काळजी घेणारी आमची सून या वयात हा धक्का देईल हे कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं." विश्वासराव सुद्धा दुःखात होते.
आरोहीच्या बोलण्याने सगळ्यांनाच धक्का बसला.घरात आरोही,रोहित,त्याच्या दोन्ही बहिणी आणि आई बाबा यांची बैठक बसली होती.आल्या आल्या आरोहीने बॉम्ब फोडला आणि सगळेच चिडले,वैतागले आणि तिला वाईट साईट बोलायला लागले.ती सगळ्यांना चडफडत ठेवून आत निघून गेली.
रोहित आरोहीच्या लग्नाला चांगले सत्तावीस वर्ष झाले होते.या इतक्या वर्षात आरोहीने घरची,आई बाबांची,मुलांची सगळी जबाबदारी अगदी छान पार पाडली होती.दोन्ही नंदाचा सुद्धा ती अगदी प्रेमाने पाहुणचार करायची.त्यांची मुलं,घरचे यांनाही तिने आपलंस केलं होतं.तिच्यामुळे रोहितला कधीच कुठली काळजी करायची गरज नव्हती.तिचा त्याला अभिमान होता.एकटीने सगळं करण्याची कला तिला छान साध्य होती.सासू सासरे म्हणजे आई वडील म्हणून तिने कधीच काही कमी पडू दिलं नाही.आपली दोन मुलं वाढवताना सुद्धा तिने त्यांना नेहेमीच जपलं होतं.मग आता अचानक असं काय झालं म्हणून तिने हा असा टोकाचा निर्णय घेतला ?
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा