तिची फरपट

Kadhi Kadhi Ekhadai Vakyti Sahan Karat asli Ki tichyavar atyachar ho rahtatt
"तिची फरफट"

"ताई ऊद्या मला जमणार नाही कामाला यायला.लेकीला घेऊन जायचं तिला सासरी सोडायला."सखुने कपडे वाळत घालता,घालता बिचकतच मला सांगितले.

कारण आता सुट्टी मागणं म्हणजे मॅडम चिडणार.
कारण या न् त्या कारणाने या महिन्यात आपल्या खुप सुट्या झाल्या आहेत.आता सुट्टी कशी मागायची हा प्रश्न कदाचित तिला पडला होता.

आता पगारातील पैसे नक्कीच कापणार ताई ती मनाशीच बोलत होती.

इतक्यात मॅडमच्या बोलण्यानी सखुच्या मनातल्या विचारांची लिंक तुटली.

"अग पण परवाच म्हणालीस ना, नाही आता पाठवणार पोरीला सासरी खुप सासुरवास आहे." माझी लेक मला जड नाही आणि लगेचच हे काय? मॅडम सखुला म्हणाल्या.

"ताई कहाणी फारच वेगळया थराला गेली."म्हणजे ग काय? सांगेल नंतर "अग पण काही मदत हावी असेल तर सांग.आहेत ओळखी, करू काहीतरी!उगाच लेकिला आगीत कशाला लोटतेस?"

ताई म्हणून सखूने डोळ्याला पदर लावला.
सखु गेली आठ वर्षे झाली माझ्याकडे काम करते. अगदी विश्वासू बाई. नवरा सफाई कामगार, दोन पोरी एक पोरग. कमवून खातात बिचारे.

कोणाच्या 'अध्यात ना मध्यात'. गरीब आहेत पण स्वाभिमानाने राहतात.

मुलंही तशीत आई वडीलांच्या कष्टाची किंमत ठेवून शिकतात परीस्थितीशी जुळवून घेत.मोठी मुलगी अनिता वयात आली. पै, पै जमवून तिचं लग्न सखूने करून दिलं.

नात्यातलेच स्थळ मिळाले. सगळे मानपान व्यवस्थित म्हणजेच परिस्थिती नुसार झाले.येती,जाती रितभात सणवार सखुने सगळे छान केले. मी देखील गेले होतेच कि लग्नाला!

मी तर म्हणाले देखील सखू किती ग तुला हौस सगळे करतेस!

तेंव्हा ती म्हणायची,"ताई आपल्या लेकराची आपणच तर हौस करायची. दुसरं कोण करणार?"

दिवस सरत होते मुलगी सुखानी काही दिवस सासरी नांदत होती.सखू पण भरभरून कौतुक करत होती.

एके दिवशी सखू सकाळी कामावर जरा उशीराच आली. आल्यावर म्हणाली, ताई उशीर झाला बरका आज! पण करते पटापट कामं आणि कामाला लागली. मी पण काही बोलले नाही.पण आज ती जरा काळजीतच वाटली.

मी विचारले, "अग काय झालं ग? काही प्रॉब्लेम? सगळे ठीक आहे ना?"

नाही ताई ते आपले नेहमीचे, हातातलं काम हातावेगळे करत ती बोलली. म्हणजे परत माझा साशंक प्रश्न?

ताई सगळी कामे आवरल्यावर बोलू नंतर,उगाच कामाला उशीर होतो. तशी ती कामाच्या बाबतीत खुप सिरीयस असायची. हाती घेतलेल्या काम पुर्ण करायची. मोजून मापून काम तिने कधीच केले नाही.

मुख्य काम सोडून टिवल्याबावल्या करणं, मोजून मापून काम करणं तिच्या स्वभावात नव्हते. हाता सरशी तिची नसलेली काम देखील ती उरकून टाकायची.उगाच फाजील बडबड ती करायची नाही.

त्यामुळे तिला माझ्याकडे काम नाही अशी म्हणायची वेळ तिच्यावर यायचीच नाही.

तिच्या या स्वभावामुळे तिने घातलेल्या अटीमुळे मला थांबून राहणे क्रममात्र होते. त्यामुळे माझी उत्सुकता मात्र ताणून राहीली.

सखुची सगळी कामे व्यवस्थित झाल्यावर गरमागरम पराठा आणि चहा तिच्या पुढ्यात मी सरकवला आणि म्हणाले बोल आता!

सखु बोलू लागली. ती काय बोलणार हे पुढील भागात
क्रमशः

©️®️सौ.ऊज्वला रवींद्र राहणे

🎭 Series Post

View all