तिची फरपट भाग 2

koni Premane done Shabha bolun Mayeni Chukashi Keli Mana Mokale bolta Yete Manala dhir milto.
सखुने आपली सगळी कामे उरकून चहा आणि पराठा खात आपली कर्मकहाणी सांगायला सुरुवात केली.

"ताई तुमच्याकडे कधीची मी काम करते. मी कशी काय माझं घरदार, पोरसोरं समदं तुम्हांन्सी माहिती.हो ना!

" हो मग सगळे माहित आहे मला काय झाले? मी विचारले

"ताई लेकराला अनिताला सासूनं घालून दिलं हो!"

काय? मी क्षणभर चिंतीत काय झाले अचानक? असं कसं?

"हो ताई, तिची सासू म्हणाली, वाईट चालीची आहे तुमची लेक."

" काय? माझ्या हातातले दुधाचं पातलं सटकले. बापरे! एवढी गुणाची पोर ती कधी मान वर नाही तिची. झाले तरी काय?"

ताई साहेबांच्या खोलीचं दार लोटून घ्या. बोलते मी.

मी जाऊन श्रीकांतची रूमचं दार बाहेरून ओढून घेतले.

तशी सखू बोलू लागली. ताई अनिताला दिवस गेलेत.

बापरे !अग तीच वय काय लग्न होऊन सहा महिने पण नाही झाले लगेचच हे काय लचांड. तेच तर ताई,इथंच तर सगळे घोड पेंड घातयं ?

पोरीला बरं नाही उलट्या करती. खाल्लेलं पचत नाही म्हणून तिचा नवरा दावखाण्यात घेऊन गेला. वाटले काय बाय खाल्ले असेल पचलं नसेल.हवापाणी गर्मी हाय का बघाव? डॉक्टरनी तपासले.

तिची सासू बी बरोबर गेली होती. डॉक्टरांनी पाळी कधी आली काय सगळे इचारलं.

लेकरांनी समधे खरे सांगीतले.तर ताई अनिताची सासू दवाखान्यातच गरजली.

" पोर लग्नानंतर बाजूला बसलीच नाय म्हणजे माहेराहून पाप घेऊन आली. माझ्या पोराच्या गळ्यात मारती. पोर तिथंच बेशुद्ध झाली हो!"

पोरगी बाजूला बसलीच नाही.लगेच तिला दिवस राहिले.तर आता सासू म्हणते हे कसं शक्य आहे?

कोणाचे तरी पाप आमच्या गळ्यात मारते आमचे नाहीच. आम्हाला फोन केला पोरीला बरे नाही घेऊन जा.

पोरगीची तब्येत बरी नाय म्हणून काल तिचा बा तिला घेऊन आला. आता नवरा हात वर करतोय आणि सासू बी.म्हणते तुमचे पाप तुम्हींच निस्तारा. काय करू सांगा मी आता ताई ?


मी सुन्न झाले.तिला काय समजावयाचं मला काहीच सुचत नव्हते.शेवटी इकडचे तिकडचे बोलून सखू काम आटोपून घरी गेली.

माझ्या मनात मात्र तोच विषय घोळत होता. त्या निष्पाप पोरीवर लागलेला कलंक कसा धुवून काढायचा?

श्रीकांतशी या विषयावर थोडे बोलले.तो म्हणाला, "सोड ग अनू तू कशाला विचार करतेस? त्यांचे ते बघतील.त्यांची विचारांची पातळी तेवढीच."

काही प्रिकॉशन वगैरे किंवा सायन्स काय असते कशाशी खातात हे त्यांना माहीत नाही. तु काय करणार?

पण मी शांत बसणारी नव्हते. दुसऱ्या दिवशी सखुला सांगितले. तुझ्या पोरीला घेऊन ये, मला तिच्याशी बोलायचं.

सखूनं तिच्या स्वभावानुसार सगळी काम उरकून घरी जाऊन लेकिला घेऊन आली.


अगदी निस्तेज झाली होती अनिता, खेळण्या बागडण्याचं वय तिचं पण अगदी कोमेजून गेली होती.

तिला माझ्या जवळ बसवले. काय खायचं विचारले.नको ताई काहीही नको.पण आग्रह केला तेंव्हा तयार झाली.

गरमागरम उपमा हवा म्हणाली. छान उपमा केला. सखू तिच्या ती कामाला लागली.सखू माझ्याकडे अनिता सुपूर्त करून शेजारी कामाला गेली

सखु आसपास नाही याचा कानोसा घेत मी अनिताला बोलते केले.

ती घाबरली होती.मी तिला विश्वासात घेतले. तु बोलली नाहीस तर काहीही होणार नाही.काय ते बोल. तुझ्या पोटातले बाळ आणि तुझं आयुष्य दोन्हीचाही प्रश्न आहे.

जर तु बोललीस तर परीस्थिती समजेल आणि मार्ग निघेल. तिला थोडा दिलासा मिळाला आणि मग अनिता बोलू लागली.

क्रमश :
©️®️सौ. ऊज्वला रवींद्र राहणे

🎭 Series Post

View all