तिची फरपट भाग 3

Shevti manane ubhari Getali apoap ladhayala bal milte
अनिताने आधी पोटभर रडून घेतले. मी देखील तीला मनमोकळे रडू दिले. मग तिनं बोलायला सुरुवात केली.

ताई लग्नाच्या आधीच दहा, बारा दिवस मला माझी पाळी आली होती.

पुढे सगळे त्यांच्या मर्जीनेच तो कसाई नवरा, घरात कोणी नसले कि मला नुसता ओरबाडतो.

सासू म्हणते गुमान सोसायचे. बाईचा जन्म त्याच्यासाठीच असतो.नवरा दे म्हणले कि द्यायचे कधी, किती वेळा का हे इचारायचं नाही.असे बोलते आणि फिदीफिदी निर्लज्जपणे हसते.

ताई किळस येते सगळ्यांची. आईला नका बोलू हे सगळं. कारण ती दुखावली जाईल.
ती काळजी करेल.

कारण आई बाबांनी दोघांनी खुप सोसले आहे. या सगळ्यात मी काहीच करू शकत नाही.

"आता या नवऱ्याला स्कुटर हावी माझ्या बापाकडून!" कोठून देणार ते?आजवर खुप दिलयं अदंनात.तुम्हाला माहित आहेच.

ताई ऐपतीपेक्षा जास्त केले आहे माझ्याआईबापानी.कुठेच कमी पडले नाहीत.

आता मला हे दिवस राहिलेत तर, ताई हा नवरा म्हणतो, तु कुठेतरी लग्ना आधी शेणं खाल्लेस! लगेच कोणाला दिवस राहतात का हे असे थोडेच होत ?

आता माहेरी खप म्हणून सांगतोय.स्कूटर घेऊन ये, नाहीतर तुझं पाप आमच्या माथी नको मारू?या प्रश्नाचे उत्तर माझ्याकडे नाही. वर मला धमकावतोय् निट लक्ष देऊन ऐक, 'हे तुझ्या बापाला सांग, मला स्कुटर हावी आहे कामावर जायला.ताई आता काय बोलणार?

आजून काय हावे आहे यांना? सतत काहीतरी मागणी असतेच. आईला मी फोन करत नाही.त्यांनी केलेली मागणी सांगत नाही म्हणून हे असले गलिच्छ आरोप माझ्यावर करतात.काय करू मी?

ताई पोटातला अंकूर त्याचाच आहे. पण हा का मानत नाही? तो चक्क धमकावतोय मला!

आता मलाच आवाज उठवायचा आहे. फक्त मला मदत हावी आहे ती फक्त हिंमत देणाऱ्या उभारी देणाऱ्या मनांची. "आडून वार करण्यापेक्षा समोरून वार मलाच करायचाय".

ताई पण आई बाबा घाबरतात. म्हणतात, नातेवाईकात इज्जत जाईल.कसली आली हो इज्जत?कोण हे नातेवाईक? फक्त फुक्के झोडायला येतात. संकटसमयी कड्या किलपं लावून बोट दाखवत तमाशा बसतात.

ताई आता मी आवाज उठवणार आणि स्वतःहाच्या हिमतीवर. पोटातलं गर्भ मी वाढणार आणि त्याला जन्म देणार.

समाजात मानाने त्याला नाव देणार आणि स्पष्ट सांगते माझा हुंडाबळी नक्कीच होणार नाही. तो मी होऊ पण देणार नाही.

फक्त आशीर्वाद आणि हिंमत हावी आहे.कराल मला मदत ताई? म्हणूनच तुम्ही आईकडे निरोप धाडल्याबरोबर मी आले आणि सगळी गरळ ओकले.

सखू तिच्या कामावरून परत आली होती. दाराआडून माझ्यातला आणि अनिता मधला संवाद ऐकत होती.

आपली लेक ऐवढी मोठी झाली. सगळे दु:ख एकटीच सहन करत बसली होती. एक अवाक्षर बोलली नाही.

आता आपण आपल्या लेकीचं हित पाह्यचे.आपला समाज गेला उडत.लगबगीने आत गेली आनिताला घट्ट मिठीत घेत म्हणाली. "बाय नको काळजी करू आम्ही आहोत तुझ्या बरोबर.उचल पाऊल तुला आता भिती कुणाची."

आजपर्यंत तु आमच्या प्रेमापोटी आपल्या जिवाची फरपट करून घेतलीस, वय तुझं केवढे आभाळाएवढे सोसलेस.

आता थांबवते मीच या दोन जिवाची फरपट म्हणत सखुनं अनिताला जवळ घेतलं आणि अश्रू ला वाट मोकळी करून दिली.

मी मात्र आज खुश होते.कारण एका कोवळ्या जिवाची फरफट वाचवण्यात मी यशस्वी झाले होते.

समाप्त

©️®️सौ. ऊज्वला रवींद्र राहणे

🎭 Series Post

View all